धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसतोय.. कारण वाचून अभिमान वाटेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 


” महेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. तो मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र तो त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही. तो ज्या कंपन्यांच्या बॅट्स वापरत होता त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो ही कृती करत आहे”.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याचे व्यवस्थापक अरुण पांडे एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगत होते.

हा खुलासा करण्यामागील कारण एकच ते म्हणजे सोशल मीडियावर चालू असलेली चर्चा की धोनी सध्या चालू असलेल्या विश्वचषक करंडक स्पर्धेत अचानक बॅट बदलतोय.

 

ms dhoni bat 1 inmarathi
Sportskeeda

सामन्याच्या सुरवातीला त्याच्या हातात एका कंपनीचा लोगो असलेली बॅट असते तर उत्तरार्धात दुसऱ्याच कंपनीचा लोगो असलेली बॅट त्याच्या हातात असते.

आता खेळपट्टीवर तसेच सर्वत्र इतके कॅमेरे बसवलेले असतात की खेळाडूंच्या अंगावरील जर्सी वर कोणकोणत्या कंपन्यांचे लोगो लावलेले असतात किंवा एखाद्या क्रिकेटपटू ची हेअर स्टाईल कोणती आहे?

त्याने हातावर कोणता टॅटू गोंदवून घेतला आहे इत्यादी माहिती प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर सहजरित्या बघायला मिळतेय. याचीच लगेच चर्चा सुरू होते.

विश्वचषक स्पर्धेपूर्वी धोनीने त्याच्या गल्व्हज वर भारतीय सैन्याचे बलिदानाचे प्रतीक मानले गेलेले त्रिशूल हे चिन्ह वापरले होते.


त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघाने बराच गदारोळ उठवला होता व “कोणीही क्रिकेटपटू राजकीय अथवा धार्मिक चिन्ह सामना चालू असताना वापरू शकत नाही”. असे विधान केले होते.यावर सोशल मीडियात बरीच उलटसुलट चर्चा चालू झाली.

 

ms dhoni inmarathi

 

मात्र धोनीने हे चिन्ह उतरवण्यास साफ नकार दिला होता. धोनीला भारतीय सैन्य दलात कर्नल हे अधिकाराचे व मानाचे पद देऊन त्याचा गौरव केला होता.

सध्या धोनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेला आहे आणि त्याला सैन्याची पेन्शन मिळत आहे त्यामुळेच तो त्रिशूलचा बॅज वापरू शकतो असे सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितल्यावर चर्चा थांबल्या.

आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात धोनी संथ खेळला असा त्याच्यावर टीकेचा भडिमार होत असतानाच आणखी एक गोष्ट नव्यानेच समोर आली ती म्हणजे धोनी सामन्यात आपली बॅट बदलताना दिसतोय.

काय असेल या मागील कारण?

शोध घेताना लक्षात आले की प्रत्येकवेळी बॅट वरील लोगो बदललेला असतो. धोनी अगदी क्रिकेटमध्ये नवखा होता तेव्हापासूनच BAS कंपनीच्या बॅट्स वापरत होता.

Beat All Sports या कंपनीच्या बॅट्स दर्जेदार समजल्या जातात आणि धोनी अगदी सुरवातीच्या काळापासून याच कंपनीच्या बॅट्स वापरून धावा काढत आहे.

धोनीच्या सुरवातीच्या संघर्षाच्या काळात BAS कंपनीने त्याला खूप मदत केलेली आहे. धोनी अजून दोन कंपन्यांच्या बॅट्स वापरतो त्या आहेत SS आणि SG. या दोन्ही कंपन्यांच्या बॅट्स त्याने अनेक सामन्यांच्या दरम्यान वापरलेल्या आहेत.

धोनी अलीकडील सामन्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅट्स का वापरत असावा या चर्चेला उत्तर देताना त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे म्हणाले की, केवळ कृतज्ञता एवढीच भावना धोनीच्या मनात आहे. बाकी काही नाही.

 

ms dhoni bat 2 inmarathi
marketingmind.in

 

सध्या धोनीचा करार ज्या स्पर्टन या ऑस्टिलियाच्या कंपनीशी झालेला आहे त्या कंपनीने जाहिरातीचे पैसे वेळेत न दिल्याने धोनीने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

ज्या कंपन्यांशी खेळाडूचा करार होतो त्या कंपन्यांची जाहिरात खेळाडू करत असतो व खेळचलू असताना त्या कंपनीचा लोगो खेळाडूने वापरणे बंधनकारक असते. हा लोगो वापरण्यासाठी कंपनी वार्षिक दीड दोन करोड ते आठ किंवा नऊ करोड रुपये खेळाडूला देत असते.

धोनी SS म्हणजेच सरीन स्पोर्ट्स या क्रिकेटचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीशी बराच मोठा काळ जोडला गेलेला होता. तसेच SG या क्रिकेट साहित्य बनवणाऱ्या कंपनीशी देखील करारबद्ध होता.

त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढउतार चालू असताना SS, SG, आणि BAS या कंपन्यांनी त्याच्या सोबतचे करार रद्द न करता चालू ठेवले तसेच नवीन करार देखील केले.

बऱ्याचदा खेळाडू जखमी झाल्याने खेळू शकत नाहीत किंवा बॅड पॅच म्हणजे वाईट काळ सुरू असताना बऱ्याच कंपन्या आपले करार मोडतात किंवा नवीन करार करत नाहीत. अशावेळेस खेळाडू आर्थिक संकटात सापडू शकतो.

ऐन उमेदीच्या काळात खेळाडू फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करू शकतात. इतर गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो.

तसेच काही वेळेस गंभीर दुखापती झाल्यास उपचारांसाठी येणारा खर्च अफाट असतो. काही दुखापती जन्मभराच्या असतात. निवृत्तीचे वय ३२ ते ३५ इतके म्हणजे अगदी तारुण्यातील असते.

त्या नंतर नोकरीच्या संधी कमी होतात. तेव्हा खेळ चालू असतानाच त्यांना पैसा जमवून गुंतवणूक करून साठवून ठेवायचा असतो.यासाठी जाहिरातीत काम करणे हा मोठा आधार असतो.

 

ms dhoni bat 3 inmarathi
Gulf News

धोनीच्या पडत्या काळात वरील कंपन्या त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यामुळेच धोनी आर्थिक आघाडीवर मजबूत राहू शकला.
आत्ता धोनी याच कंपन्यांच्या बॅट्स बदलून वापरत आहे आणि त्यांचे आभार मानत आहे.


आता पैशांची कमतरता नाहीय त्यामुळे तो कोणतेही शुल्क न आकारता अशा वेगळ्या पद्धतीने त्यांचे आभार मानत आहे.

आता प्रश्न हा उरतो की तो आत्ताच हे का करत असावा?

यावर देखील उलटसुलट चर्चा झडत आहेत. बहुतेकांच्या मते धोनी विश्वचषक स्पर्धा संपली की क्रिकेटमधून बाहेर पडणार म्हणजेच निवृत्ती जाहीर करणार.

अलीकडे तो संथगतीने खेळतो असा त्याच्यावर आरोप केला जातोय. त्याचे रिफ्लेक्सेस कमी झालेत असे देखील म्हटले जाते. त्याचे वय झालेय असा देखील मतप्रवाह आहे.

परंतु तो ज्या चपळाईने यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावतोय त्याला तोडच नाही. इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीने बॅटिंग संथ झालेली होती. परंतु वाघ हा वाघच असतो आणि कोणत्याही क्षणी तो आपली ताकद दाखवू शकतो हे धोनीने सिद्ध केलेले आहे.

 

ms dhoni bat 4 inmarathi
News18.com

 

कारण काहीही असो पण जर धोनीने निवृत्ती जाहीर केलीच तरीही क्रिकेटरसिकांच्या मनावरील त्याचे गारुड सहजी उतरणारे नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडल्यावर देखील आयपीएल सारख्या क्रिकेट लीग मधून तो आपल्याला भेटत राहणारच.

माही, तू कोणताही निर्णय घेतलास तरी क्रिकेटरसिक तुझ्या सोबतच असतील याची खात्री बाळग.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.




One thought on “धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसतोय.. कारण वाचून अभिमान वाटेल!

  • July 29, 2019 at 2:47 pm
    Permalink

    माही

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?