जाणून घ्या – पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


अनेकांना हा प्रश्न पडतो की पुथ्वी फिरते, तर मग ते आपल्याला जाणवत का नाही? शेवटी हे विज्ञान आहे आणि विज्ञानाकडे ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे तसेच या भंडावून सोडणाऱ्या प्रश्नाचे देखील उत्तर आहे. ते देखील स्पष्टीकरणासह. चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाच्या दृष्टीकोनातून!

earth-rotation-marathipizza01
wn.com

विज्ञान या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतं की,

पृथ्वी ज्या वेगाने भ्रमण करते तो वेग आपल्याला यासाठी जाणवत नाही कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाशी जोडले गेलो आहोत आणि त्यामुळे पृथ्वी आणि आपल्यामध्ये कोणतही थेट relative motion नाही. आपण देखील त्याच वेगाने फिरत आहोत ज्या वेगाने पृथ्वी फिरत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की relative motion म्हणजे काय?

पाहायला गेलं तर सर्वच motion हे relative असतात. परंतु आपलं शरीर देखील पृथ्वीसोबत फिरत असल्याकारणाने आपलं शरीर स्थिर असतं. म्हणजेच पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने आपलं शरीर देखील फिरत असतं आणि हेच कारण आहे की आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जाणवत नाही.

earth-rotation-marathipizza02
youtube.com

आपण एका उदाहरणासह ही प्रक्रिया समजून घेऊ म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल,


समजा तुम्ही चालत्या बसमध्ये कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात तर तो पुन्हा तुमच्या हातातच येऊन पडेल. कारण तुम्ही बसच्या गतीने जात आहात त्यामुळे त्या गतीचा कॉईन वर कोणताच परिणाम होणार नाही. पण समजा रस्त्यात एक मोठे वळण आले आहे आणी बस ज्यावेळेस शार्प टर्न घेत असेल आणि त्याचवेळेस तुम्ही कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र त्याचा कॉईनवर परिणाम होईल आणि तो इतरत्र जाऊन पडेल. कारण बसने वेगळ्या दिशेमध्ये गती घेतल्यामुळे कॉईनची स्थिर स्थिती बदलली आणि कॉईन देखील बसच्या गतीबरोबर जाऊ लागला.

earth-rotation-marathipizza03
reporterindia.com

त्याचप्रकारे, आपण देखील पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहतो, त्यामुळे आपल्याला पृथ्वीची गती जाणवत नाही. आपल्याला पृथ्वीची गती तेव्हाच जाणवले, जेव्हा पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल, तिला हादरा बसेल किंवा जेव्हा पृथ्वी तिची दिशा बदलेल.

शांघाई माग्लेव ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिचा वेग आहे ताशी ४३१ किमी! पण आपल्या पृथ्वीचा वेग त्याहून कितीतरी जास्त म्हणजे ताशी १६७० किमी इतका आहे. जर तुम्ही कधी या ट्रेनने प्रवास केलात तर त्यावेळेस ट्रेनमध्ये जोरात उडी मारून पहा, जेव्हा तुम्ही हवेत असाल तेव्हा तुमचा पृथ्वीशी असलेल्या गतीसोबतच संपर्क तुटेल आणि तुम्ही चांगलेच धडपडाल! (पण हा साहसी प्रकार जरा जपूनच ट्राय करा)

earth-rotation-marathipizza04
pinterest.com

आणि मग तुमच्या अगदी नीट लक्षात येईल की पृथ्वी ही जगातील सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा ही जास्त वेगाने फिरते, तरी आपल्याला तो वेग का जाणवत नाही.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?