बहिण असलेली मुले चांगले प्रियकर का असतात? समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्या प्रियकराकडून सगळ्याच मुलींच्या काही अपेक्षा असतात. त्या त्याने मी न सांगता ओळखुन पुर्ण कराव्यात ही सुद्धा त्यातलीच एक अपेक्षा आहे. पण सर्वच मुलांना हे जमत नाही. असे का?

याचे उत्तर दडलेय ते त्या मुलाला बहिण आहे की नाही यात. होय…

मुलाला बहिण असणे इथे खुप महत्त्वाचे ठरते. बहिणीसोबत वाढलेली मुले ही जास्त चांगले प्रियकर बनतात. या मुलांना लहानपणापासून बहिणीसोबत राहिल्याने तिच्याशी कसे वागावे, तिला कसे समजुन घ्यावे, तिच्या आवडी-निवडी, तिचे हट्ट यांची सवय झालेली असते.

याच गोष्टी त्यांना पुढे मदतीच्या ठरतात.

एवढेच नाही तर ज्या मुलांच्या आयुष्यात मैत्रिणी आहेत त्यांनाही त्याचा खुप फायदा होतो. पुरेशा मैत्रिणींचा सहवास लाभला की पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

ते स्त्रियांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यांना स्त्रियांबद्दल सहानुभुती वाटते. याउलट ज्या पुरुषांना स्त्रियांचा पुरेसा सहवास लाभत नाहीत त्यांना स्त्रियांचे अधिक कुतुहूल असते. ते शारिरीकदृष्ट्या अधिक आकर्षित होतात.त्यामुळे स्त्रियांची भावनिक बाजु समजुन घेण्यास कमी पडतात.

आज आम्ही चांगला प्रियकर बनण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला बहिण असेल तर आधीपासुनच अवगत असतील.

१.स्त्रियांसोबत कसे वागावे याचे ज्ञान :

 

srk-anushka-INMARATHI
financialexpress.com

कोणताही प्रियकर चांगला प्रियकर ठरतो ते तो प्रेयसीसोबत कसे वागतो यावरुन. पण जर तुम्हाला बहिण असेल तर या गोष्टीचा विचार करण्याची अज्जिबात गरज नाही.

कारण एखाद्या मुलीला कशी वागणुक हवी असते, तिला कसे समजुन घ्यावे हे तुमची बहिण तुम्हाला नकळत सतत शिकवत असते.

बहिणीला खुश करण्यासाठी काय करावे, ती उदास असल्यावर तिच्याशी कसे वागावे याचे उत्तम ज्ञान तुम्हाला असते. याच गोष्टी पुढे प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी मदत करतात.

२. माफी मागण्याची सवय :

 

sorry-inmarathi
expertnoamor.com.br

नाते म्हटले की वाद आलेच. बरेचदा एका सॉरीने समस्या सुटतात असे म्हणतात. पण ते म्हणायचे कुणी? आणि जरी म्हणायची इच्छा असेल तरी कसे म्हणावे? हे प्रश्न पडतात. परंतु बहीण-भावामध्ये ही नेहमीची गोष्ट असते. सतत वाद होतात त्यामुळे सतत माफी मागावी लागते व हा सवयीचा भाग बनतो.

आपल्या चुका मान्य करायला हव्यात, त्यांबद्दल माफी मागायला हवी, नाराजी दूर कशी करावी याची समज या नात्यातुन आलेली असते. अशी मुलं प्रेयसीची नाराजी दुर करण्यात यशस्वी होतात व यशस्वी प्रियकर बनतात.

३.मुलींना काय भेट द्यावी याची उत्तम समज :

 

surprise-inmarathi
hamaraevent.com

घरात बहिण असेल तर नेहमी तिच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. शिवाय रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तर गिफ्ट देणे बंधनकारकच ठरते. वर्षानुवर्षे या मागण्या करून बहिणीला काय आवडते? काय गिफ्ट दिल्यावर ती खुश होते याची कला मुलांना अवगत होते.

म्हणुन प्रेयसीला गिफ्ट देताना इतरांचे सल्ले घेण्याची गरज पडत नाहीत. अशी मुले अगदी सहज मुलीला इम्प्रेस करतात.

४.स्त्रियांचा वावर असण्याची सवय :

 

srk-inmarathi01
indiatvnews.com

घरात बहिण असली की तिच्या मैत्रीणींचे येणे- जाणे आलेच. मग त्यांच्याशी बोलणे, वेळप्रसंगी समस्या सोडवणे या गोष्टीही ओघाने आल्याच. यामुळे आपल्या अवती भोवती मुलींचा वावर असण्याची त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याची सवय होते.

अशा मुलांना प्रेंमाच्या बंधनात जुळवुन घ्यायला बहिण नसलेल्या मुलांच्या तुलनेत कमी वेळ लागतो. ते मुलींशी बोलताना, वेळ घालवताना अगदी सहजतेने वावरतात. .

५. संरक्षकाची भूमिका :

 

barack-obama-michelle-inmarathi
time.com

भाऊ लहान असो वा मोठा बहीण नेहमीच आपल्या समस्या त्याला सांगते. भाउसुद्धा बहिणीच्या समस्या सोडवण्याचा, तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला तिच्या समस्या माहिती असतात, समाजात वावरताना तिला कशा कशाला तोंड द्यावे याची जाणीव असते.

त्यामुळे असा भाऊ मुलींना आदर देण्यास, त्यांची काळजी घेण्यास त्यांच्या समस्या समजुन घेण्यास शिकतो.

काहीही झाले तरी आपण बहिणीच्या पाठीशी उभे राहायला हवे याची भावना त्यांच्यात निर्माण होते. ही मुले प्रेयसीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलींना अशा प्रियकराजवळ अधिक सुरक्षित वाटते.

६.’त्या’ गोष्टींबद्दल बोलताना वा ऐकताना लाज वाटत नाही :

अनेक मुलांना मुलींचे PERIODS, MOOD SWINGS व अशा इतर गोष्टींबद्दल बोलण्याची लाज वाटते. ते याबद्दल एकतर मोकळेपणाने न बोलता ते टाळतात वा अज्ञानापोटी अशा गोष्टींवर हसतात. अशा मुलासोबत राहणे मुलींना गैरसोयीचे वाटते.कारण अशा मुलांना मुलींच्या या समस्या नीटपणे हाताळता येत नाहीत.

 

money destroys sex-inmarathi03
nelive.in

त्यामुळे या गोष्टी नात्यातील वादाचे कारण ठरतात.घरात बहीण असेल तर त्याला या गोष्टींची अधिक जाणीव असते.परंतु जर मुलगा याबद्दल मोकळेपणाने बोलत असेल तर नात्यात अवघडलेपणा येत नाही.

शिवाय मुलींमधील या बदलांची जाणीव असणारा मुलगा अशावेळी प्रेयसीची अधिक काळजी घेतो, तिला समजुन घेतो. प्रेयसीला अशा समस्या असताना ती परिस्थिती अशी मुले व्यवस्थित हाताळतात.

७. नैसर्गिक स्पर्शातुन आधार देण्याची कला :

अनेक प्रसंगांत फक्त बोलुन, समजावुन सांगुन उपयोग होत नाही. समोरची व्यक्ती अत्यंत खचलेली असते. अशावेळी तुमचा एक स्पर्श जादु घडवुन आणु शकतो. या स्पर्शाचा आधार वाटुन त्या व्यक्तीला खुप हलके वाटू शकते. मानसशास्त्रात तर अशा स्पर्शातुन व्यक्तीला मोकळे होण्यास प्रवृत्त केले जाते.

 

varun-alia-inmarathi
ndtv.com

केवळ स्पर्शाने आधार देता येणे ही एक कला आहे. जी मुले बहिणीशी सुख-दु:खे वाटुन घेतात त्यांना ही कला अवगत असते. ही मुले प्रेयसीला अशा स्पर्शाने आधार देण्याचा प्रयत्न करतात. शिवाय कधी असा आधार त्यावा याचीही उत्तम जाण त्यांना असते. अशाप्रकारची शारिरीक जवळीक साधण्यात त्यांना भीती वाटत नाही.

थोडक्यात तुम्हाला जर बहिण असेल तर तुम्ही इतर मुलींसोबत अगदी सहजतेने वेळ घालवू शकता. तुमच्या बहिणीसोबत वागताना शिकलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबतचे नाते घट्ट करण्यास खुप मदतीच्या ठरतात.

एक चांगला भाऊ हा चांगला प्रियकर नक्कीच बनु शकतो.तसेच तुम्हाला पुरेशा मैत्रिणी असतील तर एखाद्या मुलीसोबत बंधनात अडकताना फारसे वेगळे वाटत नाही.

एकंदर फक्त बहिणच नाही तर पुर्वायुष्यात असलेल्या इतर स्त्रियांसोबतच्या अनुभवामुळे तुम्ही चांगले प्रियकर बनता. त्यामुळे जरी बहिण नसेल तरी तुमच्या मैत्रिणींची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “बहिण असलेली मुले चांगले प्रियकर का असतात? समजून घ्या

 • August 27, 2018 at 7:30 pm
  Permalink

  good

  Reply
 • December 15, 2018 at 7:27 am
  Permalink

  Nice Thoughts

  Reply
 • August 18, 2019 at 7:15 pm
  Permalink

  Chhan

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?