बियर ही नेहेमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या बाटलीतच का ठेवली जाते?

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

बियर… बस हे वाचूनच बियर लव्हर्सच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली असेल. बियर हा जरी अमली पदार्थ असला तरी तो अनेकांच्या आवडीचा आहे.

InMarathi Android App

म्हणजे सर्वांना माहित आहे की मद्यपान हे आरोग्याच्या दृष्टीने वाईट आहे तरी देखील करणारे ते करतातच. पण हे सर्व होत असताना कधी तुम्ही त्या बियरच्या बाटली कडे निरखून बघितले आहे. जर नसेल बघितले तर पुढच्या वेळी नक्की बघा.

 

beer-effects-inmarathi

 

तुमच्या लक्षात असेल की बियरच्या बाटलीचा रंग हा एकतर हिरवा किंवा तपकिरी असतो. वाईन सोडून जवळपास इतर सर्वच मद्यांच्या बाटल्या ह्या पारदर्शक काचेच्या बाटलीत असतात. मग ही बियर हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या बाटलीत का बरं असते?

 

beer-bottles-inmarathi
meadist.com
===
===

तर सुरवातीच्या काळात जेव्हा बियर नुकतीच लोकप्रिय झाली होती तेव्हा ती देखील ह्या पारदर्शक काचेच्या बाटलीतच यायची. पण काही काळाने बियर बनवणाऱ्यांच्या लक्षात आले की, जेव्हा ही बियरची बाटली सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा बियर मधील आम्ल आणि सूर्याच्या UV किरणांमध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडते.

 

beer-bottles-inmarathi02
meadist.com

ह्यामुळे त्या बियरमधून एक वेगळ्याचं प्रकारचा वास यायचा तसेच त्याची चव देखील बदलायची. त्यामुळे ती बियर आधीसारखी राहत नसे. ह्यामुळे बियरची लोकप्रियता कमी होण्याचा आणि परिणामी त्याच्या खप कमी होण्याचा धोका होता. म्हणून ही समस्या सोडविणे अतिशय गरजेचे होते.

त्यासाठी त्यांनी बाटलीचा रंग बदलून बघण्याचा निर्णय घेतला. बियरच्या बाटलीला तपकीरी रंग देण्यात आला.

कारण तपकीरी रंग हा UV-किरणांना शोषून न घेता त्यांना रीफ्लेक्ट करतो. त्यामुळे UV-किरण हे बाटलीतील बियर पर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांच्यातील रासायनिक क्रिया देखील घडत नाही. आणि त्यामुळे ही बियर खराब होण्यापासून बचावते.

 

===
===
beer-bottles-inmarathi03
beerandbrewing.com

हिरव्या रंगाच्या बाटल्या ह्या दुसऱ्या महायुद्धा दरम्यान चलनात आल्या. ह्याचं कारण म्हणजे विश्वयुद्धा दरम्यान बियरच्या ह्या तपकिरी बाटल्यांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली. त्यामुळे विक्रेत्यांनी ह्याला पर्याय म्हणून कुठला दुसरा रंग वापरण्याची गरज भासू लागली. पण तो रंग देखील असा हवा होता, जो सूर्याच्या UV- किरणांपासून बियारला वाचवू शकेल. म्हणून मग हिरव्या रंगाची निवड करण्यात आली.

 

beer-bottles-inmarathi04
scmp.com

आणि अश्या प्रकारे पारदर्शक बाटल्यांची जागा ह्या हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या बाटलींनी घेतली. आणि म्हणूनच बियर ही आज हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या बाटलींत मिळते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *