झाडांवर पांढरा रंग का दिला जातो? जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं खरं कारण!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अनेकदा भटकताना तुम्हाला रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे दिसत असतील. हायवे म्हणा, एखादा खाजगी रस्ता म्हणा, शहराच्या आतील एखादा रस्ता म्हणा….या रस्त्यांवर लावलेल्या झाडांबदल एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल की त्यावर रंग लावलेला असतो. कधी पांढरा, तर कधी लाल….बरं तर तुम्हाला या रंगाचं महत्त्व माहिती आहे का? तुम्ही कधी विचार केलाय का की झाडांवर असा रंग का लावला जातो? नसेल माहित तर आज या मागचं कारण जाणून घ्या.

painted-trees-marathipizza01
kingofromania.com

झाडांच्या खोडांना पांढरा रंग देण्यामागचं खरं कारण हे आहे की, झाडांच्या सालीमध्ये असलेल्या भेगा किंवा फटी भरल्या जातात. याचा फायदा असा होतो की कीटक, किडे वा बुरशी झाडाकडे आकर्षित होत नाहीत, कारण रंगाच्या सहाय्याने सालीमधील भेगा किंवा फटी भरल्या गेल्याने त्यांना वाढीस पूरक अशी जागा मिळत नाही. त्याचा अंतिम फायदा असा होतो की कीटक, किडे आणि बुरशीपासून झाडाचे रक्षण होते.

painted-trees-marathipizza02
walkingalmaty.com

आणि तरीही झाडाला एखादा कीटक, कीड किंवा बुरशी लागली तरी पांढऱ्या रंगामुळे ती सहज दिसून येते आणि त्यावर वेळीच बंदोबस्त केला जाऊ शकतो. तसेच काही संरक्षित भागांमध्ये झाडाला लावलेला पांढरा रंग हे दर्शवतो की ती झाडे वन-विभागाच्या अखत्यारीत आहेत.

painted-trees-marathipizza03
publicdomainpictures.net

पण सगळीकडेच झाडांवर पांढरा रंग लावला जातो असे नाही, काही ठिकाणी जागेनुसार रंगामध्ये झालेला बदल देखील जाणवतो. काही झाडांवर पांढरा, काही झाडांवर निळा आणी पांढरा तर काही झाडांवर लाल आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण दिसून येते.

झाडांना रंग देण्यामागचं अजून एक कारण म्हणजे झाडांच्या संवेदनशील सालींचे सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही संरक्षण होते. हायवे वर असणाऱ्या झाडांना पांढरा रंग यासाठी दिला जातो जेणेकरून रात्रीच्या वेळी झाडे नजर यावीत.

painted-trees-marathipizza04
clubpimble.com

तर आता तुमच्या लक्षात आलेच असले की हा रंगाचा उपद्व्याप झाडांच्या भल्यासाठीच आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?