बिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात? वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बिअरचा अतिनाद हा फार वाईट! तरीही बऱ्याच जणांचा बिअर पिण्याने काही होत नाही असा गैरसमज अजून टिकून आहे. दारू पेक्षा बिअर स्वस्त, त्यामुळे तरुणाईला ती आपल्या विळख्यात ओढून घेण्यात अगदीच यशस्वी झाली आहे. तरुणच नाही तर तरुणी देखील आता सर्रास बिअरची मनसोक्त मजा लुटायला मागे पुढे पाहत नाहीत. कोणत्याही समारंभाची पार्टी असो त्यात बिअर असयलाच हवी असा जणू नियमच पडला आहे. असो, तर मित्रहो तुम्हीही बऱ्याच जणांना बिअरच्या नशेमध्ये धुंद होताना पाहिलं असेल, पण तुमचं अजून एका गोष्टीने लक्ष वेधलं आहे का?

InMarathi Android App

तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सामन्यत: बिअरच्या बॉटल्सचा रंग हा हिरवा किंवा तपकिरी असतो. चला जाणून घेऊया काय आहे यामागचं कारण!

 

beer-marathipizza01
storiesfeed.net

बिअर जास्त काळ फ्रेश राहावी म्हणून काचेच्या बॉटल्सचा वापर करण्याची सुरुवात ही १७ व्या शतकापासूनच झाली आहे, पण त्यामध्ये एक तोटा असा होता की काचेची बॉटल जास्त वेळ उन्हात ठेवल्याने सूर्यप्रकाशाच्या परिणामामुळे आतील बिअरला घाण वास यायचा आणि त्याची टेस्ट देखील बिघडायची. यातूनच शोध लागला तपकिरी रंगाच्या बिअर बॉटल्सचा!

तपकिरी रंगाच्या बॉटलमुळे सूर्यप्रकाशाचा आतील बिअर वर काहीही परिणाम होत नाही. तपकिरी रंगाच्या बॉटलच्या वापरामुळे बिअरची टेस्ट अजिबात बिघडत नाही तसेच ती खराब होत नाही आणि दीर्घकाळ उत्तमरीत्या टिकून राहते.

 

beer-marathipizza02
daily.social

पण दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र तपकिरी रंगाच्या बिअर बॉटलची तुट भासू लागली. त्यामुळे मोठ्या मोठ्या बिअर ब्रँडसच्या प्रोडक्शनवर परिणाम होऊ लागला. म्हणून तपकिरी रंगाला पर्याय म्हणून बड्या बड्या ब्रँडसनी हिरव्या रंगाच्या बॉटल्स वापर करण्यास सुरुवात केली. पण या हिरव्या रंगाच्या बॉटल्स तपकिरी रंगाएवढ्या उपयोगी नव्हत्या.

या बॉटल्सवर सूर्यकिरणांचा परिणाम होत असे, त्यामुळे बिअर लवकर खराब होण्याची भीती असे. हि कमतरता दूर करण्यासाठी आणि सूर्यकिरणांपासून बिअर खराब होऊ नये म्हणून त्यांवर कोटिंग चढवण्यात येऊ लागली. तपकिरी रंगाच्या बॉटल्स या पारदर्शक असतं,  बिअरची बॉटल जेवढी पारदर्शक तेवढी ती स्वत समजली जाई. त्यामुळे तपकिरी रंगाच्या बॉटल मधील बिअर रेग्युलर बिअर म्हणून ओळखली जात असे.

याच गोष्टीचा फायदा उचलत बड्या बिअर कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या बॉटल मधील बिअर ब्रँडेड आहे असे मार्केटिंग करण्यास सुरुवात केली. त्याचा ग्राहकांच्या मनावर म्हणावा तसा परिणाम झाला.  पुढे पुढे तपकिरी रंगाच्या बॉटल मधली बिअर रेग्युलर बिअर म्हणून ओळखली जाऊ लागली, तर हिरव्या रंगाच्या बॉटल मधील बिअर ब्रँडेड म्हणून ओळखली जाऊ लागली.

 

beer-marathipizza03
lowgluten.org

हिरव्या रंगाची बिअर बॉटल्स एक स्टेटस् सिम्बॉल झाल्याने बहुतेक बिअर कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बॉटल मध्ये बिअर विकण्यास सुरुवात केली.

सध्या मात्र कोणत्याही रंगाच्या बॉटलमध्ये बिअर विकली जाऊ शकते कारण सर्वच काचेवर युव्ही प्रोटेक्शन कवच असते, तरीही Heineken आणि Tuborg सारखे काही मोठे ब्रँडस आजही हिरव्या रंगाच्या बॉटल्समध्येच बिअर विकतात, कारण एकच –

या स्पर्धात्मक युगात आपला ब्रँड टिकवून ठेवणे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *