रात्री का चमकतात प्राण्यांचे डोळे? जाणून घ्या यामागचं रंजक उत्तर!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

तुम्ही रात्रीची मांजर बघितली असेल,अंधारात काळ्या मांजरीचे शरीर दिसत नाही,परंतु तिच्या काजव्यांसारखे चमकत असणाऱ्या डोळ्यांना बघून प्रत्येकजण घाबरतो. मांजरी सारखेच सिंह, वाघ, चित्ता, बिबळ्या वाघ यांसारख्या कित्येक इतर प्राण्यांचे डोळे रात्रीचे चमकतात. हे चमकणारे डोळे पाहून तुमच्याही मनात कधी न कधी असा प्रश्न आला असेल की या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये अशी काय विशेषता आहे की त्यांचे डोळे रात्री चकाकतात? अजूनही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं नसेल तर आज मात्र तुमचा तो शोध इथे संपला, कारण या लेखाद्वारे तुम्हाला वरील प्रश्नाच उत्तर मिळणार आहे.

animal-eye-marathipizza01
randomfactoid.com

ज्या प्राण्यांचे डोळे चमकतात,त्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशेष प्रकारच्या मणिभीय पदार्थाचा (Crystalline Sb-stance)  पातळ थर असतो. हा पातळ थर डोळ्यांवर पडणारा प्रकाश प्रतिबिंबित करतो. हा थर ठीक तसेच काम करते जसे आरशावर सूर्याचे किरण पडल्यावर तो चमकायला लागतो.

animal-eye-marathipizza02
goneoutdoors.com

मांजरीच्या डोळ्यांवर केलेल्या एका प्रयोगावरून हे समजले आहे की, तिच्या डोळ्यांच्या पडद्यामागे एक चमकदार पदार्थाचा थर असतो, ज्याला ल्यूमिनीयस टेपटम (Luminous tepetum) म्हणतात. हा पदार्थ प्रकाशाला प्रतिबिंबित करतो. ह्या थरामुळे खूप कमी प्रकाशात सुद्धा मांजर कोणतीही गोष्ट अगदी सहज बघू शकते. ज्या प्राण्यांचे डोळे रात्रीचे चमकतात, ते अंधारात चांगल्या प्रकारे बघू शकतात.

animal-eye-marathipizza03
guides.library.harvard.edu

ह्याव्यतिरिक्त अजून एक विशेष गोष्ट म्हणजे, ज्या प्राण्यांचे डोळे रात्रीचे चमकतात, त्या सर्वांची चमक एकसारखी नसते. ह्याचे कारण हे आहे की, ज्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये रक्ताची नसे जास्त असतात, त्यांच्या डोळ्यांची चमक लाल रंगाची असते. दुसरीकडे ज्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये रक्ताची नसे कमी असतात, त्यांचे डोळे पांढरे किंवा थोडे पिवळ्या रंगांचे असतात.

animal-eye-marathipizza04
australianmuseum.net.au

आहे की नाही उपयुक्त माहिती..अहो मग जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांनाही सांगा!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?