झोपेतून उठल्यावर “तो” मोठा झालेला असतो? तुमच्याबरोबर असं का आणि कधी घडतं? वाचा
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लिंग उद्दीपन ही तशी सामान्य क्रिया आहे. जेव्हा कामोत्तेजन करणारे संकेत मिळतात तेव्हा लैंगिक उद्दीपन होते. परंतु बऱ्याचदा सकाळी उठल्यावर आपल्याला लिंगाचा आकर वाढलेला दिसत असतो. त्यावेळी आपल्याला कुठलेही कामोत्तेजन नसते तरी देखील असे होते.
ज्यामुळे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे असं का होतं?
बऱ्याचदा नको त्या वेळी लिंगाच्या आकारात वाढ का होत असते? तर आज आपण जाणून घेणार आहोत लिंग उद्दीपन म्हणजे नेमकं काय आणि ते केव्हा होते ?
लिंग उद्दीपन ह्याचा संबंध जरी सेक्स हार्मोन्सशी असला तरी लिंगाच्या नसतील रक्त पुरवठ्यामुळे त्याच्या आकारमानात वाढ होत असते.
हा रक्त पुरवठा टेस्टस्टेरॉनच्या उत्सर्जनावर अवलंबून नसतो, त्यामुळे लिंग उद्दीपन हे सर्वसामान्यतः जरी प्रणयाशी संबंधित असले तरी संपूर्णपणे त्याच्याशी निगडित नाही आहे. अनेक दुसरी कारणं आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक उद्दीपन आणि त्याची कारणं काय ते आपण जाणून घेऊयात.
१. लघवी करतांना होणारे लैंगिक उद्दीपन :

हे काही उद्दीपन नसते पण जेव्हा तुम्ही अधिक काळासाठी लघवी ला थांबवून ठेवलं असतं तेव्हा अश्याप्रकारच उद्दीपन होत असतं. अगदीच एक दम कंट्रोल केल्यावर.
२. सकाळी उठल्यावरचं उद्दीपन :

सकाळी उठल्यावर लिंगाचा आकार मोठा झालेला दिसतो. फक्त मूत्रविसर्जन केल्यावर नाही तर इतर कुठ्ल्याप्रकाराने लैंगिक उत्सर्जन केल्यावरच त्याचा आकार कमी होत असतो. याला एग मफिन बोनर म्हणतात.
हे सकाळी उठल्यावर प्रणय करण्याची प्रेरणा देत असतं.
३. घोस्ट लैंगिक उद्दीपन :

हे अत्यंत कमी कालावधी साठी येतं आणि क्षणार्धात निघून जातं. कुठल्याच प्रकारचं उत्तेजन त्याला नसतं तरी देखील असं होत असतं. त्यामुळेच याला घोस्ट बोनर म्हटलं जातं. अगदीच भुताटकी आणि विचित्र असतं.
४. जिम मधील लैंगिक उद्दीपन :
जेव्हा जिम मध्ये आपण व्यायाम करत असतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्तपुरवठा वेगाने होऊ लागतो.

हा रक्त लिंगातून हि होत असतो. त्यामुळे लैंगिक उद्दीपन होत असते. त्यामुळे जिम मध्ये चांगली अंतर्वस्त्रे घालून जाण्यातच भलाई आहे नाही तर तुमच्या उद्दीपणाचं दर्शन इतरांना होण्याचा धोका निर्माण होतो.
५. चुकीच्या वेळी होणारे लैंगिक उद्दीपन :
ह्या प्रकारचे लैंगिक उद्दीपन अत्यंत अवेळी होत असते. कुठलाही उद्दीपणाचा स्रोत नसतांना असे होत असते.

अगदी अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा चालू असतांना देखील असं होतं असत. आपल्याला माहिती असतं कि हे जाईल फक्त त्यासाठी दुसरीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं.
६. सेक्सआधीचे लैगिक उद्दीपन :

हे मात्र अवेळी होत नसतं. हे अगदी तेंव्हाच होतं जेव्हा आपल्या मनात प्रणय करण्याची भावना असते अथवा आपण प्रणय करणार असतो.
हे प्रणयाआधी येते आणि त्याचं कार्य ज्यासाठी ते आहे, अगदी व्यवस्थितरित्या पार पाडत असते.
७. रात्रीचं उद्दीपन :

हे उद्दीपन अगदी तेव्हाच होते जेव्हा आपल्याला झोपायला जायचे असते. हे अगदीच सर्वसाधारण आहे. दिवसभराच्या थकवा नंतर हे उद्दीपन आपल्याला नवी ऊर्जा देत असतं.
हे फक्त प्रणय करून, हस्तमैथुन करून अथवा सरळ झोपी जाऊन घालवलं जाऊ शकतं.
८. लक्षवेधक उद्दीपन :
जेव्हा आपण आपल्या कामात बिझी असतो. ऑफिस मिटिंग मध्ये असतो. अथवा मित्रांशी गप्पा मारत असतो.

फॅमिली सोबत बसलेलो असतो तेव्हा अचानक हे उद्दीपन येत असते आणि लोकांचं लक्ष वेधून घेत असते. आपण शाळेत असतांना आपण गुप्त पणे आपल्या मित्रांसोबत कोणाचं लिंग मोठं अशी स्पर्धा करायचो त्यावेळी अश्याप्रकारचं उद्दीपन लक्षवेधी ठरायचं !
९. मॅरेथॉन उद्दीपन :

हे उद्दीपन मात्र तुमच्या प्रणयशक्तीचं प्रतीक असतं. जेव्हा तुम्ही प्रणय केला असतो आणि काही क्षणात पुन्हा लिंग उद्दीपित होते त्यालाच मॅरेथॉन उद्दीपन म्हणतात. तुम्हाला बऱ्याचदा ते आश्चर्याचा धक्का देऊन जाते.
सार्वजनिक स्वछता गृहात जेव्हा आपण संडासाच्या सीट वर बसलेलो असतो तेव्हा आपला लिंग अचानक पणे उद्दीपित होत असतो. आपल्याला नेमकं माहिती नसतं असं का होतं आहे पण तसं होतं अश्यावेळी शांतपणे बसून राहण्यातच समाधान असते.
अश्याप्रकारे लैंगिक उद्दीपनाला काळ वेळ नसते. ते व्हायचं तेव्हा होत असतं. त्याला गरजेचं नाही की कामोत्तेजन भेटलंच पाहिजे.
पण ते होत असते. अश्यावेळी संयम ठेवणे अथवा उत्सर्जन करणे हेच पर्याय आपल्या समोर असतात. त्यामुळे काय तो निर्णय आपणच घ्यायचा असतो.
पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. यांमुळे बऱ्याचदा आपल्याला लाजावं लागतं. पण ‘इतना तो चलता है, कूछ पाने के लिये कूछ खोना पडता है.’
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.