विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जगभरात जवळपास सर्वच प्रवासी आणि मालवाहक विमाने ही पांढऱ्या रंगाची असतात. खुप कमी अशी विमाने असतात जी रंगीबेरंगी असतात. पण कधी तुमच्या डोक्यात हा विचार आला आहे की ही विमाने नेहेमी पांढऱ्या रंगातच का असतात एअरलाईन्स सर्व गोष्टींवर एवढा खर्च करू शकते तर मग ते आपल्या विमानांना चांगल्या रंगाने पेंट नाही करू शकत?

 

airplanes-inmarathi01
sarcasmlol.com

पण विमान पांढऱ्या रंगाचा असणे ह्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाच कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाला सर्वात चांगल्या प्रकारे परावर्तीत करू शकतो. जे इतर गडद रंग करू शकत नाही. जसे की काळा किंवा इतर कुठला गडद रंग सूर्याच्या प्रकाशाला आणि उब शोषतो.

 

airplanes-inmarathi08

जसे आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे घालणे पसंत करतो कारण तो सूर्याच्या उष्णतेला परावर्तीत करतो, हेच तथ्य येथे वापरले जाते. जर विमानाला कुठल्याही गडद रंग असेल तर तो रंग सूर्याची उष्णता जस्त प्रमाणत शोषून घेईल ज्यामुळे त्या विमानातील मशिनरी खराब होण्याची संभावना असते.


 

airplanes-inmarathi04

 

विमानांना पांढरा रंग देण्यामागे केवळ हे एकच कारण नाही आहे. पांढरा रंग यासाठी देखील फायद्याच असते कारण, ह्या रंगामुळे जर विमानावर कुठेही क्रॅक, डेंट आले तर ते सहजपणे दिसते. पांढऱ्या रंगामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान लवकर दिसून येते. कारण विमानातील एखादा छोटासा क्रॅक देखील दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. म्हणून हे स्पष्टपणे दिसणे अतिशय महत्वाचे असते.

 

airplanes-inmarathi
allindiaroundup.com

तसेच जर कधी कुठले विमान दुर्घटनाग्रस्त झाले तर त्याच्या पांढऱ्या रंगामुळे त्याला समुद्र, जंगल, जमिनीवर स्पष्टपणे बघितल्या जाऊ शकते. रात्रीच्या काळोखात देखील पांढऱ्या विमानाला बघणे सहज सोपे आहे. तसेच जर विमानाच्या कुठल्या भागातून तेल वगैरे सांडत असले तर ते देखील ह्याच्या पांढऱ्या रंगामुळे सहज नजरेस पडते.

ही तर झाले वैज्ञानिक कारणे, पण त्यासोबतच विमानच रंग पांढरा असण्यामागे काही व्यावहारिक कारणे देखील आहेत. ज्यामुळे विमानांचा रंग पंधरा असणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते.

 

airplanes-inmarathi05
businessinsider.in

विमान हा खूप विशाल असतो, त्यामुळे त्याला पेंट करणे म्हणजे काही खायचे काम नाही. कुठल्याही जम्बोजेट प्लेनला पेंट करण्यासाठी विमान कंपनीला खूप खर्च करावा लागतो. तसेच ह्यासाठी खूप वेळ देखील लागतो.

रंगबिरंगी रंगत रंगलेला आणि विविधी कलाकृती असलेला विमान जर विकायला काढला तर त्याची किंमत पांढऱ्या विमानाच्या तुलनेत कमी असते. म्हणून विमान कंपनी विमानाचा रंग पांढराच ठेवतात.

 

airplanes-inmarathi02
diretodapista.blogspot.in

विमानाला सतत ऊन, वारा, पाऊस ह्यांचा मारा सहन करावा लागतो. ह्यात जर विमानाला इतर कुठला रंग दिला गेला तर तो खूप लवकर फिक्कट पडायला लागतो. कारण कुठलाच रंग उन, वारा आणि पाऊस ह्यांचा मारा सहन करून जास्त काळ टिकू शकत नाही. मग अश्यात त्याला वारंवार पेंट करण्याची गरज पडते. ह्याउलट पंधरा रंग हा बराच काळ टीकून राहतो.

आता जेव्हा केव्हा तुम्ही विमानात बसाल तेव्हा त्या विमानाच्या पांढऱ्या रंगामागे इतकी सगळी कारणे असतात हे तुमच्या नक्की लक्षात येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *