गौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा खरंच काही संबंध आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
गौतम बुद्धांनी पूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. एका राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा बुद्धांनी सर्व सुख सोयींचा त्याग केला आणि ते आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गस्थ झाले. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांचे जीवन आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. तर अश्या या महान गौतम बुद्धांशी बरेच जण लाफिंग बुद्धाची तुलना करतात. अनेकांना वाटतं कि गौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा काहीतरी संबंध आहे. पण हे असत्य आहे.

चीनी इतिहासानुसार, Liang साम्राज्याचा कालखंडात बुदाई नावाचे एक चान भिक्षु होते. त्यांचे खरे नाव Quicei होते, पण सर्व त्यांना बुदाई सुद्धा म्हणत असत. ते नेहमी हसत आणि खुश राहत असतं, त्यामुळे त्याने लाफिंग बुद्धा म्हटले जाऊ लागले.
भगवान बुद्धांसारखेच बुदाई सुद्धा गावोगाव फिरून, मुलांना मिठाई आणि खेळणी वाटत असे. सँताक्लॉज सारखाच त्यांच्याकडे एक मोठी झोळी असायची, ज्याला ते आपल्या पाठीवर टांगून चालत असत. त्यांची झोळी कधीही खाली नसायची. गरजू लोकांसाठी नेहमी त्यामध्ये काही ना काही असायचे. बुदाईच्या जीवनाचे एकच उद्धिष्ट होते,ते म्हणजे लोकांमध्ये सुख वाटणे. याच कारणामुळे बुदाईला ‘पू-ताई’ सुद्धा म्हटले जाते असे.

लाफिंग बुद्धाला मैत्रेया (Maitreya),म्हणजे भविष्यातील बुद्धाचे प्रतिक देखील मानले जाते. असा समज आहे की, लाफिंग बुद्धा भविष्यात मैत्रेयाच्या रुपात जन्म घेणार आणि बुदाई त्यांचेच अवतार होते.
बुदाईचे हास्य एवढे मनमोहक होते की, कोणीही त्यांना बघून स्मित न करता राहू शकत नसे. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपले मरण जवळ आले आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या साथीदारांना अशी सूचना दिली की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीराला अग्नी द्यावा. त्यांची ही इच्छा ऐकून त्यांच्या भिक्षु साथीदारांना आश्चर्य वाटले, कारण झेन मान्यतेनुसार, मृत्यूनंतर शरीराचे अग्नी संस्कार करण्यास परवानगी नव्हती, परंतु त्यांनी बुदाईच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला.
जेव्हा बुदाईच्या शरीराला अग्नी देण्यात आला, तेव्हा दुसऱ्याच क्षणी चितेतून फटाके फुटण्यास सुरुवात झाली. फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी पाहून सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि बुदाईच्या जाण्याचे दु:ख थोडे कमी झाले. बुदाईनी जाता-जाता सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले.

भगवान बुद्धांनी अध्यात्मिक ज्ञान हाच अंतिम सुख मिळवण्याचा मार्ग आहे सांगितले होते, पण बुदाईने हा संदेश दिला की, दुसऱ्यांना सुख वाटून सुद्धा सुख मिळते. जपान मध्ये Ho-Tei देवाला अर्थात याच लाफिंग बुद्धाला Good Luck आणणाऱ्या सात देवांपैकी एक मानले जातात.
फेंगशुईनुसार कुठे ठेवावी लाफिंग बुद्धाची मूर्ती?
लाफिंग बुद्धाला ‘बुद्धा ऑफ वेल्थ’ सुद्ध म्हटले जाते. लोकांचा हा विश्वास आहे की लाफिंग बुद्धाला घरी ठेवल्याने सुख आणि समृद्धी येते. फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घराच्या मुख्य दरवाजाच्या बरोबर विरुद्ध दिशेला ठेवला पाहिजे. लाफिंग बुद्धाला अश्या जागेवर ठेवले पाहिजे जिथून तुम्ही नेहमी त्यांना पाहू शकता.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page