शारीरिक संबंधांचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष? वाचा पुराण काय सांगतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम   

===


अनेकदा सेक्स केल्यावर “विचारी” लोकांना प्रश्न पडत असतो की सेक्स ची खरी मजा कोणाला येते? पुरुषाला का स्त्री ला?

 

what women wants after sex-inmarathi08
pinterest.co.kr

तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आधीच एका ग्रीक लोककथे मध्ये देण्यात आले आहे.

ही कथा फार मजेशीर आहे, एकदा वाचाच…!

तर ही कथा सुरू होते प्राचीन ग्रीसमध्ये.

टायरेसियस नावाचा एक तरुण होता, तो एके दिवशी जंगलातून पायी निघाला होता, रस्त्यात त्याचा पाय चुकून प्रणय क्रीडेत व्यस्त असलेल्या सापांच्या जोडीवर पडला आणि क्षणार्धात त्याचे रूपांतर एका स्त्री मध्ये झाले. (ग्रीक लोक मानतात की प्रणय मिलन करणाऱ्या सापांच्या कार्यात व्यत्यय आणल्यास माणसाचे लिंग परिवर्तन होते).

तर स्त्री मध्ये रूपांतर झालेला हा टायरेसिस पुन्हा काही वर्षांनी जंगलात गेला आणि त्यांने पुन्हा प्रणय मिलनात व्यस्त सापाच्या जोडप्यावर पाय दिला आणि चमत्कार झाला व त्याचे रुपांतर परत पुरुषात झाले.

टायरेसिस सोबत घडलेल्या या दुर्दैवी प्रकारानंतर एके दिवशी ग्रीक देवांचा राजा झुस आणि झुस ची पत्नी हेरा यांच्यात या विचित्र प्रकरणावर संवाद झाला.


मग त्यांनी टायरेसिस ला एका वैवाहिक जीवनातील भांडणाला सोडवण्यासाठी बोलावले व तिथे हा प्रश्न उपस्थित केला की

“सेक्स करताना सर्वाधिक आनंद कोणाला होत असतो ? स्त्री ला की पुरुषाला?”

त्यावर टायरेसिस ने एकदम तत्काळ व अचंबीत करणारे उत्तर दिले

“स्त्रियांना सर्वाधिक आनंद होतो. कारण त्या पुरुषांपेक्षा नऊ पट जास्त सेक्स करतात !”

 

Tiresias-striking-the-snakes-inmarathi
mythology.net

हे ऐकून हेरा ने एवढी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली की तिने जाऊन सरळ टायरेसिस ला अंधत्वाचा शाप दिला!

सेक्स दरम्यान अत्यंत अल्प आनंद मिळाल्यामुळे हेरा ने हा वाद घातला होता आणि ती स्वतःची बाजु वाचवायचा जोरकस प्रयत्न करत होती पण शेवटी ती अपयशी ठरली.

हेराच्या शापाने कुठलीही चूक नसताना अंध झालेल्या बिचाऱ्या टायरेसिसला मग झुसने “संत” पदवी बहाल केली आणि पुढे जाऊन हाच टायरेसिस ग्रीक पुराणात अजरामर झाला.

जगाच्या विविध भागातील पौराणिक कथांमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यात स्त्री व पुरुष हे एकत्र करून निर्माण झालेले पात्र आहेत.

याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे भारतातील हिंदू पुराणातील “अर्धनारिनटेश्वर” ही शिव मूर्ती.

 

ardhanarishwar-inmarathi
dollsofindia.com

यात अर्धा भाग भगवान शंकराचा असतो व अर्धा भाग पार्वतीचा. जगभर अशी अनेक चित्रे आहेत ज्यात स्त्रीपुरुषांचे एकत्रित रूप दाखवण्यात आले आहेत.

मलेशिया आणि आफ्रिकेतल्या काही जनजाती प्रजाती “The Half Women Lord” नावाच्या एका देवाची पूजा करतात, ज्याचे अर्धे अंग स्त्री च्या अवयवांनी आणि अर्धे अंग पुरुषाच्या अवयवांनी तयार झालेले असते.

या दैवताच्या शरीरावर “स्तन” हे स्त्री च अवयवा ही असतं आणि “लिंग” हे पुरुषाचं अवयव देखील असतं. पण त्याला असलेली दाढी त्याचा वीरतेच प्रतीक असते.

प्युब्लो ऑफ झुनी चा प्रमुख देव असलेला अवोनाविला, सर्व चराचराचा निर्माता म्हणून पूजीला जातो. तो सुद्धा “मर्दानी” म्हणून ओळखला जातो. पण तो मुळात एक तृतीयपंथी आहे…!

एवढंच नव्हे तर इंडोनेशिया च्या बाली द्वीपावरील “स्यांग ह्यांग” हा देव “लिंग परिवर्तन ” करू शकतो. गरजेच्या व युध्द समयी तो पुरुष होऊ शकतो आणि गरज नसताना स्त्री च रूप ही घेऊ शकतो.

 

syang-hyang-inmarathi
MotionElements.com

आफ्रो अमेरिकन कंडोम्बाले प्रजातीचा देव असलेला ऑक्सउमारे हा दर सहा महिन्याने लिंग परिवर्तन करतो असा उल्लेख आहे.

चीन मधील प्रसिद्ध पवित्र स्त्री “ताई युवान” हिच्यात मर्दानी “यांग” आणि स्त्रीत्वाचे प्रतीक असलेलं “यिन” हे दोघी गुणसूत्र आहेत…

ग्रीकांमध्ये Hermaphrodite आणि इरोस ही दोन्ही दैवते , पुरुष व स्त्रीचे गुण बाळगून आहेत.

 

america-god-inmarathi
youtube.com

जेव्हा आपण पौराणिक पत्रातून वर्तमानात येतो तेव्हादेखील आपल्याला जगभर अनेक अशी उदाहरणं सापडतात ज्या मध्ये पुरुष व स्त्रीचं रूप एकत्र करून जीवन व्यतित केलं जातं , यातलं सर्वाधिक जवळचं उदाहरण म्हणजे “तृतीयपंथी” लोक.

आज आपल्या आजूबाजूला असलेले तृयीयपंथी लोक हे त्यांच्या सात दिव्य श्रेणीत पोहचण्यासाठी जगापासून अलिप्त राहून स्त्री – पुरुषांच एकत्रित आयुष्य जगत असतात.

असंच अजून एक उदाहरण आहे.


उत्तर गोलार्धातील काही उत्तर अमेरिकन आदिवासी प्रजाती अर्थात Two Spirited One ( दुआत्मी ) लोक जे “बरडाचे” म्हणून देखील ओळखले जातात.

हे लैंगिकतेने जरी स्त्री पुरुष म्हणून वेगवेगळे असले तरी ते पुरूष व स्त्री यांच्यापैकी कुठलंच आयुष्य जगत नाहीत. त्यांचा लैंगिकतेला पुज्यनिय मानले जाते.

अल्बानियाच्या काही स्त्रिया स्वतःच स्त्रीत्व त्यागून पुरुषांसारखं जीवन व्यतित करतात. हा निर्णय त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी घ्यावा लागतो नंतर त्या त्यांचे लैंगिक अवयव बदलतात किंवा स्वतःला वांझ करून घेतात.

त्या स्त्रिया आयुष्यभर माणसांचे कपडे घालून राहतात व त्यांना अल्बानिया च्या समाजात “पुरुष” म्हणूनच स्वीकारले जाते. असं जगण्यामागचं कारण विचारलं असता “पुरुषी समाज व्यवस्थेकडून त्यांची हत्या होऊ नये” हे उत्तर दिलं जातं.

रक्तरंजित इतिहास असलेल्या या समाजात स्वतःच जीव वाचवण्यासाठी ते संपुर्ण आयुष्य पुरुषी होऊन जगतात.

या पुरुष व स्त्रिच्या मधल्या समाजाचं शेवटचं उदाहरण आहे – पापुआ न्यू गिनी द्वीपावरील “हुवा” ही प्रजाती.

 

hua-inmarathi
crashtravel.com

ह्या प्रजातीचे लोक स्वतःला वेगळं स्त्री पुरुषा मध्ये शारीरिक नव्हे तर सामाजिक स्थिती वरून विभागतात. नू नावाचा विशिष्ट पदार्थ स्त्री कडून उत्सर्जित केला जातो.

तो पदार्थ नंतर पुरुषांना लैंगिक संबंधांच्या व जेवणाच्या वेळी प्रदान केला जातो व त्यांचे लिंगपरिवर्तन होते असा तिथला समज आहे!

आज जगात स्त्री व पुरुषाला सेक्स मधून मिळणाऱ्या आनंदाला बाजूला सारत, अशी अनेक लोक आहेत जी हे दुहेरी आयुष्य जगत आहेत. गंमत ही की आपल्याला त्यांचा अस्तित्वाची कल्पना देखील नाही!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on “शारीरिक संबंधांचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष? वाचा पुराण काय सांगतात!

 • January 24, 2019 at 1:55 pm
  Permalink

  शीर्षकातील मुख्य मुद्द्या पासून पुरताच भरकटलेला लेख.

  Reply
  • October 30, 2019 at 6:18 am
   Permalink

   Hi.
   Please send me all details link my email

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?