“यात्रीगण कृपया ध्यान दे…”, रेल्वे platform वर नेहमी ऐकू येणारा हा आवाज कुणाचा आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लहानपणी ‘झुक झुक अगीनगाडी’ हे गाणं गाताना आणि ऐकताना खूप आनंद वाटत असे. त्या गाडीत बसल्यावर किती मज्जा येईल याची कल्पना करूनच अंगावर रोमांच उमटतं. अशी ही रेल्वे मोठे झाल्यावर मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

कोणत्याही ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास, पहिल्यांदा रेल्वेचाच विचार मनामध्ये येतो.

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

 

train-tracks-inmarathi05
dailyhunt.in

रेल्वे ही गतिमान प्रवासाचे साधन म्हणून ओळखली जाते. औद्योगिक क्रांतीमध्ये रेल्वेचा प्रमुख वाटा आहे.

आताच्या फास्ट जगात आरामदायक तसेच जलद प्रवासाचे साधन म्हणून जवळपास सगळेच लोक रेल्वेला पसंती देतात.

आपण नेहेमी रेल्वेने प्रवास करत असतो. रेल्वे स्टेशनवर उभे असताना आपली गाडी कधी येणार हे भलेही त्या इंडिकेटर वर लागलेलं असेल तरी आपला पूर्ण विश्वास असतो तो स्टेशनवर होणाऱ्या अनांउसमेंटवर.

 

railway-anauncement-inmarathi03
financialexpress.com

‘यात्री गण कृपया ध्यान दे…’ जेव्हा हा आवाज कानी पडतो तेव्हा आपल्या सर्वाचे लक्ष त्या घोषणेकडे जाते. संपूर्ण प्रवासादरम्यान आपण तो आवाज ऐकत असतो. पण कधी विचार केला आहे, की ह्या घोषणेची सुरवात कुठन झाली असणार? कोणी दिली असेल पहिली अनांउसमेंट.

 

railway-anauncement-inmarathi
jagran.com

रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या त्या अनांउसमेंटचा आवाज आहे सरला चौधरी ह्या महिलेचा. ह्याच आहेत त्या ज्यांचा आवाज आपल्याला रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या अनांउसमेंटमध्ये ऐकायला येतो.

 

pixabay.com

सरला चौधरी ह्या मागील २० वर्षांहून अधिक काळापासून रेल्वेत अनांउसर म्हणून कार्यरत आहेत. १९८२ साली सरला ह्यांनी रेल्वेत अनांउसर ह्या पदासाठी टेस्ट दिली होती. ही टेस्ट पास केल्यानंतर सरला ह्यांना रेल्वेत दैनिक वेतनावर अनांउसर म्हणून नोकरी मिळाली.

सरला यांना त्यांच्या कामाप्रती प्रामाणिकपणा आणि त्यांची मेहनत बघून १९८६ साली रेल्वेत अनांउसर ह्या पोस्ट वर त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली.

सरला ह्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,

“त्या काळी कॉम्पुटर नव्हते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या स्टेशन्सवर जाऊन अनांउसमेंट करावी लागयची. एक अनांउसमेंट रेकॉर्ड त्यांना करण्यसाठी ३-४ दिवसांचा वेळ लागायचा. एवढच नाही तर ही रेकॉर्डिंग वेगवेगळ्या भाषेत करावी लागायची.”

 

railway-anauncement-inmarathi01
khaleejtimes.com

त्यानंतर काही काळाने रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या सर्व अनांउसमेंट ची जबाबदारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम ला सोपविण्यात आली. त्यासोबतच स्टॅण्डबाय वर सरला यांचा आवाज मॅनेजमेंट विभागाने कंट्रोल रूममध्ये सेव्ह करून ठेवला.

१२ वर्षांआधी काही खाजगी कारणांनी सरला ह्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आणि आता त्या OHE विभागात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सरला चौधरी सांगतात की, त्यांना खूप आनंद होतो हे बघून की, लोक त्यांना न बघता त्यांच्या आवाजाला एवढं महत्व देतात. आजही रेल्वे स्टेशनवर स्वतःचा आवाज ऐकून त्यांना खूप आनंद होतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““यात्रीगण कृपया ध्यान दे…”, रेल्वे platform वर नेहमी ऐकू येणारा हा आवाज कुणाचा आहे?

  • February 28, 2019 at 9:37 pm
    Permalink

    सुन्दर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?