पत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा!

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

प्रवासात म्हणा, किंवा कुठे निवांत वेळ मिळाला तर टाईमपास म्हणून बहतेक जण एकाच खेळाला प्राधान्य देतात तो खेळ म्हणजे पत्त्यांचा खेळ!

ज्याला आपण कॅट म्हणतो, बरेच जण पत्ते खेळणे म्हणजे जुगार असंच समजतात, भले त्यात पैसा लावलेला असो वा नसो!

आपल्या पोराच्या हातात पत्ते दिसले की बऱ्याच पालकांच्या माथ्यावर आठ्या उमटल्याशिवाय राहत नाहीत, त्यामुळे बहुतेक वेळा मित्रमंडळींसोबतच पत्ते खेळावे लागतात.

 

cards-game-marathipizza01
u3ajavea.org

पण हा पत्त्यांचा खेळ खेळायला मजा येते हे मात्र खरं. ५२ पत्त्यांच्या सेटसोबत कितीतरी असंख्य खेळ खेळले जाऊ शकतात, त्याची गणती नाही.

हा पत्त्यांचा डाव तुम्ही देखील कधी न कधी रंगवला असेल, पण काय हो, तुम्हाला पत्त्यांमधील चार राजे, चार राण्या आणि चार गुलाम कोण आहेत माहितीये का? नाही माहित?

चला तर आज या मागचं रंजक गुपित जाणून घेऊया.

इस्पिकचा राजा म्हणजे बायबल मध्ये उल्लेख असलेला “डेवीड”

 

cards-game-marathipizza02
pinterest.com

चौकटचा राजा म्हणजे रोमन राजा “सिझर”

 

cards-game-marathipizza03
theweddingtiara.com

किलवरचा राजा म्हणजे जगप्रसिद्ध राजा ” अलेक्झांडर”

cards-game-marathipizza04
egyptsearch.com

 

बदामचा राजा म्हणजे फ्रान्सचा राजा “चार्लस दुसरा”

 

cards-game-marathipizza05
biography.com

बदामच्या राजाला ” Suicide king” म्हणतात कारण हा पत्ता तुम्ही नीट बघितला तर राजाच्या मस्तकात तलवार घुसलेली दिसेल.

पत्त्यांच्या चार राजांमधे चार्लस दुसरा हा एकमेव राजा आहे ज्याच्या हयातीतच त्याला त्याच्या चित्राचा पत्ता पहायला मिळाला.

चार्लस दुसरा खुप आजारी पडला तेव्हा तिथुन पुढील आयुष्य अंथरूणातच काढण्याची वेळ त्याच्या वर आली आणि तेव्हा तो पत्त्यांचा black jack हा प्रकार खेळत असे.

आपल्या दुर्दैवामागे पत्त्यांमधे राजाचा क्रमांक तेरावा आहे हेच कारण असल्याचे त्याच्या मनाने घेतले होते. त्याचे वेड वाढतच गेले आणि एक दिवस त्याने तलवार डोक्यात खुपसून आत्महत्या केली.

cards-game-marathipizza06
blogblowfish.com

बदामची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं “ज्युडीथ”

 

cards-game-marathipizza07
en.wikipedia.org

चौकटची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं “रेचल”

 

cards-game-marathipizza08
biblestudyconnection.blogspot.in

 

इस्पिकची राणी म्हणजे ग्रीक देवता “अथेना”

 

cards-game-marathipizza09
greek-mythology-pantheon.com

 

किलवरची राणी म्हणजे “argine” आणि या लॅटीन शब्दाचा अर्थ होतो “राणी”

 

cards-game-marathipizza10
bluethumb.com.au

गुलामाचे पत्ते प्रसिद्ध सरदारांचे प्रतिनिधीत्व करतात.

इस्पिकचा गुलाम म्हणजे “ogier the dane”

 

cards-game-marathipizza11
en.wikipedia.org

 

बदामचा गुलाम म्हणजे “La Hire”

 

cards-game-marathipizza12
pinterest.com

 

चौकटचा गुलाम म्हणजे “Hector”

 

cards-game-marathipizza13
swords24.eu

 

किलवरचा गुलाम म्हणजे “Lancelot”

 

cards-game-marathipizza14
timelessmyths.com

असे आहेत पत्त्यांमधील “खरे” चेहरे!

कधी वाटलं होतं का या पत्त्यांना इतक्या प्राचीन इतिहासाचा वारसा असेल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा!

  • August 5, 2017 at 10:38 pm
    Permalink

    Mla yekhada juna lekh vachayacha asel tr vachu Sakto ka mi

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?