चषक जिंकल्यानंतर “कॅप्टन कुल” धोनी अचानक कुठे गायब होतो? वाचा कौतुकास्पद उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या संयमी आणि परिपक्व नेतृत्वाने भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवणारा खेळाडू म्हणजे भारताचा माजी कर्णधार, आपला “कॅप्टन कुल” महेंद्रसिंग धोनी. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करताना त्याने अनेक आदर्श, अनेक वस्तुपाठ घालून दिले.

त्याच्या कित्येक गोष्टी नवोदित खेळाडूंना शिकण्यासारख्या आहेत. फिटनेस, सातत्य, संघभावना, नम्रता आणि अजूनही बरंच काही..

पण धोनीचा त्याच्या चाहत्यांना सर्वात जास्त भावणारा गुण म्हणजे त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा. जिंकल्यानंतरच्या देखाव्यापेक्षा खेळतानाच्या कामगिरीवर त्याचे असलेले सच्चे प्रेम! याच गुणामुळे त्याचे कर्तृत्व इतर देशांच्या कर्णधारांपेक्षा उठून दिसते.

 

dhoni-marathipizza01
sportskeeda.com

धोनीच्या विशिष्ट नेतृत्वगुणांबद्दल बोलले जाते की धोनी बाकी खेळाडूंच्या अंगी असलेली उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या कडून करवून घेतो.

या मुलाखतीत धोनीने मान्य केले की त्याच्यासाठी काही खेळाडूंचा अहंकार वा स्वाभिमान न दुखवता त्यांच्यातील साध्या गोष्टींचा विकास करणे सर्वात जास्ती आव्हानात्मक होते.

क्रिकेट मध्ये कॉमन सेन्स?

धोनी म्हणतो,

“कर्णधार असताना माझ्यासाठी सगळ्यात मोठी शिकवण ही होती की, मी विचार करायचो की हा तर कॉमन सेन्स आहे, ही तर अत्यन्त साधी गोष्ट आहे. पण कॉमन सेन्स अशी काहीच गोष्ट नसते. तुम्ही असाच विचार करता की ‘अरे, मी हे बोलायला पाहिजे होतं, सांगितलं पाहिजे होतं’.

मला नेहमी जाणवतं की मी कर्णधारपदी असताना सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर, तुम्ही समजा कर्णधार असाल, मी तुमच्याजवळ येऊन बोलतो, ‘मी मॅच नाही खेळत, तुम्हाला काय वाटतं मी का खेळत नसेल. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, पण मला उत्तर अपेक्षित नाही’

 

Mahendra singh dhoni.Inmarathi4
sportzwiki.com

या संभाषणात त्याने आणखी एक कौतुकास्पद गोष्ट बोलून दाखवली. पत्रकारांनी त्याला विचारले की,

‘तू येतोस आणि चषक स्वीकारून तिथून गुपचूप कुठेतरी निघून जातोस, हा एक पायंडा पडत चाललाय.. एक ट्रेंड झाला आहे. असं का?

तेव्हा तो सहजपणे म्हटला,

“तुम्हाला असे वाटत नाही का, की हे बरोबर नाही, सामना तर पूर्ण संघ जिंकतो पण चषक घेण्यास मात्र फक्त कर्णधारच जातो?”

“हे एक प्रकारचे अतिप्रदर्शन आहे, आपण आधीच १५ सेकंदांचा प्रदर्शनाचा भाग असता, मला नाही वाटत तिथे तुमची काही गरज असते. आपण सर्वांनाच जिंकल्याचा उत्सव साजरा करायला आवडते, तुम्ही त्याचा भाग असता, तुम्ही पूर्ण वेळ चषकासोबतच असले पाहिजे असे नाही. त्यामुळेच मी म्हणतो की शक्य तितका या गोष्टीला सरळ सोपे करायचा प्रयत्न करूया.”

दोनचार ट्रॉफीज जिंकून आपण खूप मोठे असल्याच्या अविर्भावात वागणारे कित्येक खेळाडू आपण पाहिले. क्रिकेटच्या क्षितिजावर असे अनेकजण येतात. तेवढ्यापुरते मैदान गाजवतात, आणि पार्ट्याही!

 

Mahendra singh dhoni.Inmarathi
ndtvimg.com

पण धोनीसारखे क्रिकेटमध्ये आल्यानंतर फक्त क्रिकेट खेळण्याला महत्व देणारे खेळाडू दीर्घकाळ खेळतात.. क्रिकेटरसिकांच्या मनात घर करून राहतात. त्यांचे स्थान आढळ असते ते त्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेमुळे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?