‘संभोगवेड्या’ माणसासाठी – अरे वेड्या तू चुकीच्या गोष्टीत अडकला आहेस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


प्रणय किंवा इंग्रजीमधल्या लोकप्रिय नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध असणारा “सेक्स” ही तसं पाहायला गेलं तर मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. निखळ आनंद देणारी, दोन व्यक्तींमधील नाते फुलवणारी, प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणारी. तरीही जिथे शारीरिक संबंधांचा प्रश्न येतो तिथे बऱ्याच गोष्टींपासून प्रेमीजन अनभिज्ञ असतात.

सेक्स करण्याच्या आवडीनिवडी व्यक्ती परत्वे भिन्न असतात. आपल्या पार्टनर बरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवायचे आणि ते फुलवायचे हा सर्वस्वी जोडप्यांच्या संमतीचा भाग असतो.

तरीही अनेकदा याच कारणावरून जोडप्यांमध्ये भांडणे होत राहतात. सेक्समधला विसंवाद हा घटस्फोटाचे कारण देखील बनतो.

 

unsatisfied-sex-inmarathi
Huffingtonpost.com

याच्या मुळाशी जावून पाहिलं तर फक्त hardcore sex आणि love making या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यामधील फरक अनेक जोडप्यांना न समजल्या मुळे तो त्यांच्यातील विसंवादाचं कारण बनतो. जाणून घेवूया सेक्सच्या काही अशाच अनाभिज्ञ पैलूंबद्दल..

१. स्वत:च्या जोडीदाराला समजून घ्या :

शरीराचं मिलन हे केवळ फक्त शारीरिक पातळीपर्यंत मर्यादित नसतं. माणूस आणि पशुमध्ये हा एक महत्वाचा भेद असतो. पशु हे केवळ निसर्गानियमानुसार प्रजाती वाढवण्यासाठी ते ही विशिष्ट मौसमात त्यांच्या शारीरिक क्रीडा करतात. माणसाच्या बाबतीत हीच गोष्ट सर्वस्वी भिन्न असते.

स्वत:ला आणि स्वत:च्या जोडीदाराला समजून घेणे, त्याच्या शारीरिक बाबींचा विचार करणे, शारीरिक संबंध बनवताना जोडीदाराच्या इच्छेचा विचार करणे, स्त्री जोडीदाराला फुलवणे, शृंगार करणे या गोष्टी प्रेम फुलवण्यास मदत करीत असतात.

 

live-in-relationship-inmarathi
telegraphindia.com

शारीरिक संबंधात स्त्रीच्या मनाचा विचार करणे आवश्यक ठरते कारण तिला केवळ लैंगिक कृतीपेक्षा प्रेम, सहवास, स्पर्श या गोष्टींची भूक असते. तिला फुलविल्याविना केवळ स्वत:च्या सुखाचा विचार जिथे केला जातो तिथे शारीरिक संबंध प्रणयक्रीडा न राहता फक्त एक बळजबरी होवून जाते.

असा प्रणय निव्वळ उपभोग बनून जातो ज्याचा आनंद फार काळ टिकत नाही आणि त्यातून प्रेमाचा बंध ही निर्माण होत नाही.

२. दोघांमधील कनेक्शन :

खरे पाहता प्रणय क्रीडेमध्ये ज्याला peak-point किंवा orgasm असं म्हटलं जातं, तो एक छोटा हिस्सा असतो. बऱ्याचदा हे लोकांच्या लक्षात येत नाही.

शरीर संबंध करणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये प्रेम असेल, त्यांची केमिस्ट्री जुळलेली असेल तरच तृप्ततेचा अथवा पूर्णत्वाचा आनंद मिळतो.

केवळ फक्त तृप्ती मिळवण्यासाठी केला जाणारा शरीरसंबंध हा खूप वेळा मानसिक दरीचं कारण बनतो. शरीरसंबंधामध्ये एकमेकांसाठी दिला जाणारा वेळ, स्पर्श, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेण्याची मानसिकता या गोष्टी तृप्ती होण्यासाठी आवश्यक असतात.

 

live-in-relationship-inmarathi09
lajmi.net

या गोष्टींचा जर अभाव असेल आणि फक्त एक pick point मिळवण्याच्या हेतूने प्रणयाच्या नावाखाली यांत्रिक क्रिया केली जात असेल तर अशा संबंधामधून प्रेम वाढीस लागत नाही.

३. चुंबन

खर तर हा शारीरिक संबंध फुलवण्याच्या प्रक्रियेमधला महत्वाचा भाग असतो. जी जोडपी प्रेमात असतात किंवा प्रेमात पडलेली असतात त्यांच्यामधील प्रेम फुलवण्यासाठी चुंबन ही पहिली पायरी असते. प्रणयक्रीडेमध्ये चुंबनाचे अनन्यसाधारण महत्व आहे.


खूप वेळा जोडप्यांना किंवा जोडप्यामधील कुणाही एकाला यामध्ये रस नसतो. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मात्र प्रेमात आणि संबंधामध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्याला पहिल्या प्रथम जोडीदाराची संमती नसते पण अशा गोष्टी केल्या तर एकमेकांमधील प्रेम फुलण्यासाठी मदत होवू शकते.

 

kiss-inmarathi
gujjurocks.in

चुंबन क्रिया प्रणयामधील आनंद आणि गोडवा वाढवते त्यामुळे ही पायरी वजा न करता प्रत्येक  जोडप्याने स्वत:चा आणि स्वत:च्या जोडीदाराचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी केली पाहिजे.

४. प्रणया नंतरची उत्तरक्रिया :

हा सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला भाग. बऱ्याचदा शरीरसंबंधामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुरुष समाधानी होवून झोपी जातो. बऱ्याचदा अशा वेळी स्त्रीला पुरुषाने आपल्याला असे तटकन तोडून टाकावे या गोष्टीचा कुठेतरी राग येत राहतो.

 

dipika-vin-inmarathi
deccanchronicle.com

प्रणया नंतरच्या उत्तरक्रियेमध्ये आपल्या जोडीदाराबरोबर हितगुज करणे, त्याच्याशी बोलणे, त्याला कुरवाळणे, कुशीत घेवून झोपणे अशा गोष्टी शरीरसंबंधामधील रंगत वाढवतात. प्रेम वाढवतात.

अशा रीतीने जोडप्यांना शरीरसंबध हे केवळ एक शारीरिक क्रिया अथवा उपभोगाचा प्रकार न राहता त्याला संस्मरणीय प्रणय क्रीडा बनवायचे असेल तर वर दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा अंमल करावयास हरकत नाही.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?