प्रभू येशूचा जन्म आणि मृत्यू : आजही बुचकळ्यात टाकणारं रहस्य !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


पवित्र बायबल मधील संत मॅथ्थ्यु यांच्या शिकवणीमधील प्रसंग हा जगभरात प्रभू येशूच्या जन्माचा खरा प्रसंग मानला जातो. अभ्यासकांच्या मते संत मॅथ्थ्यु यांनी त्यांची शिकवण ख्रिस्तवर्ष ७०-८० च्या काळात लिहिली होती.

म्हणजेच प्रभू येशूच्या जीवनकाळाच्या अगदी जवळच्या काळात ही शिकवण लिहिली गेल्याने संत मॅथ्थ्यु यांनी सांगितलेली प्रभू येशूच्या जन्माची कथा आणि तारीख ही ग्राह्य धरली जाते.

परंतु अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे की प्रभू येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व १ मध्ये २५ डिसेंबर रोजी झाला नव्हता.

संत ल्युक (२.२) यांची शिकवण सांगते की राजा हेरॉडच्या आदेशाप्रमाणे रोमन कर आकारणीच्या उद्देशाने सुरु असलेल्या जनगणनेसाठी, नावे नोंदवण्याकरिता प्रभू येशूच्या माता-पित्यांनी बेथलेहेम पर्यत प्रवास केला होता.

 

jejus-inmarathi
indiatoday.in

ऐतिहासिक नोंदी असे दर्शवतात की त्यांनी हा प्रवास ख्रिस्तपूर्व ८ मध्ये केला होता. परंतु राजा हेरॉड मात्र ख्रिस्तपूर्व ४ मध्ये मृत पावल्याची कागदपत्रे आहेत.

दुसरीकडे बायबल नुसार प्रभू येशूच्या जन्मावेळी राजा हेरॉड जिवंत होता आणि एक ज्यू राजा गादीवर बसणार ही भविष्यवाणी कळल्यावर राजा हेरॉड घाबरला होता.

त्यामुळे त्याने बेथलेहेम आणि आसपासच्या परिसरातील २ वर्षांखालील प्रत्येक मुलाला मारून टाकण्याचा आदेश दिला. तर मग प्रभू येशूचा जन्म नेमका कधी झाला होता?

वरील माहिती प्रमाण धरली तर प्रभू येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व ४ आणि ख्रिस्तपूर्व ७ च्या दरम्यान झाला असावा असे मानण्यास हरकत नाही.


 

king-herod-order-marathiizza

स्रोत

प्रभू येशूच्या जन्मकथेनुसार, प्रभू येशूच्या जन्मावेळी आकाशात एक तारा चमकला. त्याने लोकांना सूचक संकेत दिला की तुमचा ज्यू लोकांचा राजा म्हणजेच त्यांचा तारणहार जन्माला आहे आणि या ताऱ्याने त्यांना बेथलेहेमच्या दिशेने जाण्याचा संदेश दिला.

या ताऱ्याला स्टार ऑफ बेथलेहेम किंवा ख्रिसमस स्टार असे म्हणतात.

मॅथ्थ्यु २:९ म्हणतो की,

त्यांनी आकाशात पूर्व दिशेला पाहिलेला तारा त्यांच्यासमोरून पश्चिम दिशेला भरकन निघून गेला. काही वेळाने पुन्हा परत आला आणि जेथे प्रभू येशूचा जन्म झाला होता त्या जागी येऊन स्थिरावला.

आता समस्या ही आहे की हे ताऱ्याचं प्रकरण केवळ मॅथ्थ्युच्या शिकवणी मध्येच सापडतं. इतर ग्रीक, रोमन किंवा बेबीलोनियन इतिहासामध्ये किंवा उपलब्ध नोंदीमध्ये हा असला प्रकार घडल्याचं कुठेच आढळत नाही.

ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण या ताऱ्याला पाहूनच ते तीन राजे/हुशार माणसे (Biblical Magi) यांना कळले की प्रभू येशूचा जन्म झाला आहे आणि त्याला भेटण्यासाठी ते पार्थिया पासून बेथलेहेमचा प्रवास करत त्याला भेटायला आले होते.

त्यामुळे असा प्रश्न उभा राहतो की प्रभू येशूचा जन्म जर खरंच ख्रिस्तपूर्व ४ आणि ख्रिस्तपूर्व ७ च्या दरम्यान झाला होता का?

परंतु या विचाराला देखील खोटे पाडणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.

 

jesus-born-marathipizzaस्रोत

बेथलेहेमचा तारा म्हणजे हॅले धुमकेतू होता का?

आधी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशूचे माता-पिता रोमन कर आकारणीच्या उद्देशाने सुरु असलेल्या जनगणनेकरिता नावे नोंदवण्यासाठी बेथलेहेमला गेले होते. रोमन पत्रकांतील नोंदीनुसार ख्रिस्तपूर्व १२ मध्ये राजा हेरॉड याने बेथलेहेम मध्ये एक जनगणना आयोजीत केली होती, परंतु ती रोमन कर आकारणीसाठी नव्हती तर स्थानिक कर आकारणीसाठी होती.

तसेच याच ख्रिस्तपूर्व १२ मध्ये हॅले धुमकेतू आकाशात अगदी स्पष्ट दिसला होता आणि हा धुमकेतू आकाशातून पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला होता.

जसे की बेथलेहेमचा तारा गेल्याचे येशूजन्माच्या कथेमध्ये सांगण्यात येते. म्हणजेच या धुमकेतूला लोक येशू जन्माचे संकेत देणारा तारा समजले असतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

अजून एक विशेष गोष्ट म्हणजे धुमकेतूला असणाऱ्या शेपटीमुळे त्यांना वाटले असेल की हा तारा पश्चिमेकडे म्हणजेच बेथलेहेमच्या दिशेने जाण्याचे संकेत देतोय.

या तर्कावरून एक गोष्ट सहज सिद्ध होते की ते तीन राजे/हुशार माणसे (Biblical Magi) त्या हॅले धुमकेतूला पाहून, त्याला दैवी संकेत समजून पश्चिमेच्या दिशेने बेथलेहेम मध्ये आले असतील.

 

birth-of-jesus-marathipizza

 

ही सगळी मांडणी ग्राह्य धरली तर प्रभू येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व १२ मध्ये झाला असे मानावे लागेल.


जेव्हा प्रभू येशू यांचे देहांत झाले तेव्हा ते किती वर्षांचे होते?

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोमन आणि नवीन मृत्युपत्रातील नोंदी असे दर्शवतात की रोमन लोकांनी प्रभू येशूला ख्रिस्तवर्ष ३४ नाही तर ख्रिस्तवर्ष ३६ च्या कालखंडात वधस्तंभावर खिळे ठोकून चढवले होते.

अनेक जण असे मानतात की जेव्हा प्रभू येशूला वधस्तंभावर खिळे ठोकून चढवण्यात आले तेव्हा त्यांचे वय जास्त नव्हते. ते अगदीचं तरुण होते. परंतु पुरावे म्हणतात की ते वृद्ध होते, कारण प्राचीन ज्यू संस्कृतीनुसार धर्माची शिकवण देणारा व्यक्ती हा किमान ५० वर्षे वयाचा असावा.

ख्रिस्तवर्ष २ ऱ्या शतकामध्ये बिशप इरेनेयस सांगतात की मी जेव्हा धर्माची शिकवण घेत होतो तेव्हा प्रभू येशू जवळपास ५० वर्षांचे होते.

इथे बिशप इरेनेयस यांचे म्हणणे योग्य वाटते कारण बिशप इरेनेयस हे त्या लोकांच्या छत्रछायेत शिकत होते जे खरोखर प्रभू येशूला ओळखत होते.

संत जॉन (८:५७) यांची शिकवण सांगते की प्रभू येशू अजून ५० वर्षांचे झालेले नाहीत. संत जॉन (२:२०) यांच्या शिकवणीच्या दुसऱ्या एका भागामध्ये असे विधान आहे की प्रभू येशू स्वत:च्या वयाची तुलना जेरुसलेमच्या मंदिराशी करतात. जे मंदिर तेव्हा ४६ वर्षे जुने होते.

म्हणजेच प्रभू येशूचे वय देखील तेवढेच असायला हवे. या मंदिराची उभारणी राजा हेरॉड याने ख्रिस्तपूर्व १२ मध्ये केली होती याचा अर्थ हा की ख्रिस्तवर्ष ३४ मध्ये प्रभू येशू नक्कीच ४६ वर्षांचे असले पाहिजेत, जेव्हा त्यांनी स्वत:च्या वयाची तुलना मंदिराच्या वयाशी केली होती.

 

jesus-christ-death-marathipizza

 

यावरून असे दिसते की त्यांचे वय ४८ वर्षे असताना ख्रिस्तवर्ष ३६ मध्ये त्यांना वधस्तंभावर खिळे ठोकून चढवण्यात आले होते.

(इथे ख्रिश्चन धर्मीय वा बायबल यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसून उपलब्ध माहितीच्या आधारे नाण्याची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा !)


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 68 posts and counting.See all posts by vishal

6 thoughts on “प्रभू येशूचा जन्म आणि मृत्यू : आजही बुचकळ्यात टाकणारं रहस्य !

 • January 17, 2017 at 10:31 pm
  Permalink

  Very Good…
  KEEP it up n
  BEST luck…

  Reply
 • April 16, 2017 at 11:09 am
  Permalink

  Nice work… keep going. (y)

  Reply
 • December 25, 2018 at 11:33 am
  Permalink

  धार्मिक इतिहासाची जुळवणी करतांना फार तारांबळ उडते.वैचारिक गोंधळ पण उडतो . त्यामुळे त्या त्या धर्माचे अनुयायी जास्त खोलात न शिरता त्याचे अनुपालन करतात. आणी तेच योग्य आहे?

  Reply
 • December 25, 2018 at 12:03 pm
  Permalink

  काहीही असो…पण भविष्यपुराणानुसार प्रभू येशू परमेश्वराचा पुत्र आहे

  Reply
 • December 26, 2018 at 10:50 am
  Permalink

  मुळात येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना श्रीकृष्ण जन्माच्या सारखी वाटते, त्यामुळे येशू हे श्रीकृष्ण यांचे अवतार आहेत, असे दिसून येते…

  Reply
 • December 27, 2018 at 10:56 am
  Permalink

  इन मराठी सारखे मोबाइल अॅप कसे तयार करावे.कृपया nacc269@gmail.com वर कळवा .

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?