पैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे? वाचा.. समजून घ्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एटीएमने भलेही आपले जीवन अधिक सोपे केले आहे, ह्यामुळे आपल्याला जेव्हा हवे तेव्हा पैसे काढता येतात. त्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज भासत नाही. पण एटीएम ही एक मशीन आहे जी कधीही खराब होऊ शकते.

अनेकदा असं होत की आपण एटीएम मधून पैसे काढायला जातो, आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यावर जेव्हा पैसे निघायची वेळ येते नेमकं तेव्हाच –

मशीनला काहीतरी होतं आणि ती बंद पडते, आणि आपले पैसे मध्येच अडकून जातात.

अश्या स्थितीत आपण घाबरून जातो, कारण ते पैसे त्यात अडकलेले असतात आणि प्रोसेस झाल्यामुळे ते आपल्या बँकेच्या खात्यातून देखील कापण्यात आलेले असतात.

मग आता हे अडकलेले पैसे परत कसे मिळवावे?

 

atm-inmarathi05.jpg
freepik.com

तर त्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी कराव्या लागतील.

१. लगेच बँकेशी संपर्क साधा :

 

PNB-punjab-national-bank-inmarathi
moneycontrol.com

जर कधी एटीएम मधून पैसे काढताना जर तुमचे पैसे अडकले असेल पण तूमच्या खात्यातून ते कापण्यात आले असतील. तर अश्या स्थितीत सर्वात आधी तुमच्या बँकेच्या कुठल्याही जवळच्या शाखेशी संपर्क साधा. जर बँक बंद असेल तर बँकेच्या कस्टमर केयरवर ह्याची माहिती द्या.

ही समस्या सोडविण्यासाठी बँकेला १ आठवड्याचा वेळ मिळतो.

२. ट्रॅन्झॅक्शन स्लीप सांभाळून ठेवा :

 

atm-inmarathi08
scoopwhoop.com

जेव्हाही एटीएममध्ये तुमचे पैसे अडकतील तेव्हा त्याची ट्रॅन्झॅक्शन स्लीप नेहेमी सांभाळून ठेवा. बँकेत तक्रार करताना तुम्हाला त्या स्लीपची फोटोकॉपी एक पुरावा म्हणून सादर करता येईल.

कारण त्या ट्रॅन्झॅक्शन स्लीपमध्ये एटीएमची आयडी तसेच लोकेशन हे सर्व दिलेलं असते.

३. एका आठवड्याच्या आत पैसे वापस नाही तर प्रत्येक दिवशी बँकेला १०० रुपये द्यावे लागेल :

 

hsbc-atm-inmarathi
gazabpost.com

जे एका आठवड्याच्या आत बँकेने तुमचे पैसे परत केले नाही तर बँकेला प्रतिदिन १०० रुपयाचा दंड भरावा लागतो.

तसेच जर का आठवड्यात तुमच्या ह्या समस्येवर बँक तोडगा काढण्यात अयशस्वी ठरली तर तुम्ही बँकिंग लोकपालमध्ये देखील ह्याची तक्रार करू शकता.

४. २४ तास वाट बघावी :

 

atm-inmarathi07
valourdigest.com

जर कधी एटीएममध्ये ट्रॅन्झॅक्शन फेल झाले असेल तर अश्या स्थितीत २४ तास वाट बघावी. कारण बँक आपली चूक मानत २४ तासाच्या आत ग्राहकाच्या खात्यात त्याचे पैसे ट्रान्स्फर करते.

५. सीसीटीव्ही फुटेज :

 

atm-inmarathi09
http://eberita.org

अश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?