टीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

वर्तमानपत्रात अथवा टेलिव्हिजन वर आपण नेहमी वाचत, ऐकत असतो की एखादी मालिका खूप जास्त लोक बघतात, त्या मालिकेची लोकप्रियता अफाट आहे, अगदी घराघरात ती मालिका बघितली जाते, त्या मालिकेचा “टीआरपी” खूप जास्त आहे. एका मालिकेचा टीआरपी खूप कमी आहे. त्या मालिकेची लोकप्रियता खूप कमी आहे वगैरे वगैरे… अश्या अनेक चर्चा वेळोवेळी आपल्या कानी पडत असतात.

नेमका सामान्यांना प्रश्न पडतो की लोकांना हे समजतं तरी कसं की कुठल्या घरात लोक कुठली मालिका बघतात?

ती मालिका लोकप्रिय आहे हे कसं काय शोधलं जातं? एखाद्या मालिकेचा टीआरपी जास्त आहे म्हणजे नेमकं काय आहे? टीआरपी म्हणजे काय असतं? तर आज अश्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. नेमकं समजून घेऊ टीआरपी हे प्रकरण तरी काय आहे?

 

channels-inmarathi
mtwiki.blogspot.com

जर तुम्हाला टीव्ही बघण्याची आवड असेल तर तुम्ही दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्हीवरील मालिका, आवडते कार्यक्रम, बातम्या हे बघतंच असतात. आपल्याला जी गोष्ट बघायला आवडते ती आपण टीव्ही वर बघत असतो. तुमच्या अश्याप्रकारे एखादी मालिका, चित्रपट, बातम्या इत्यादी गोष्टी वारंवार बघितल्याने त्या चॅनेलचा आणि त्या कार्यक्रमाचा टीआरपी वाढत असतो.


टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट, हे टीव्हीशी निगडित असं टूल आहे ज्याचा मदतीने एखादा टीव्ही शो, अथवा चॅनेल किती लोकप्रिय आहे, किती लोक ते चॅनेल दिवसभर बघत असतात, किती लोकांना ते चॅनेल आवडतं, इतर चॅनेल व टीव्ही शोज पेक्षा हे चॅनेल अथवा टीव्ही शोज कसे जास्त लोकप्रिय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी टीआरपीचा वापर केला जातो.

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट अर्थात टीआरपी च्या मदतीने दिवसांतून कोणता कार्यक्रम, किती वेळ बघितला जातो, सर्वाधिक बघितली जाणारी मालिका कोणती, सर्वाधिक बघितलं जाणारं चॅनेल कोणतं, हे सुद्धा टीआरपीच्या मदतीने समजते. टीआरपी मोजण्यासाठी काही ठराविक ठिकाणी “पीपल मीटर” लावले जातात. जे फ्रीक्वेन्सी च्या मदतीने कुठली सिरीयल बघितली जात आहे आणि किती वेळ बघितली जात आहे याचा तपास लावते.

 

trp-inmarathi
funkingdom10.blogspot.com

या मीटर मधील टीव्हीशी निगडीत सर्व माहिती मॉनिटरिंग टीमच्या मदतीने इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंटला पाठवली जाते. या माहिती नंतर मॉनिटरिंग टीम हे ठरवते की कोणत्या चॅनेलवरच्या कोणत्या कार्यक्रमाचा टीआरपी जास्त आहे.

टीआरपीला एवढं महत्व देण्याचं कारण एकच आहे –  एखाद्या चॅनेलची आर्थिक कमाई ही त्या चॅनेलच्या टीआरपी वर अवलंबून असते. ज्या चॅनेलचा टीआरपी कमी असतो त्या चॅनेलला जाहिराती खूप कमी भेटतात व त्या चॅनेलला त्याबदल्यात खूप कमी पैश्यांची कमाई होते. याउलट एखाद्या चॅनेलचा टीआरपी जर जास्त असेल तर त्या चॅनेलला खूप पैसा कमवता येतो.

२० सेकंदाच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये ते चॅनेल आकारते. आयपीएल सारख्या अत्यंत लोकप्रिय अश्या लीगचे प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलचा टीआरपी तर इतका जास्त असतो की ते चॅनेल दिवसाला कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात.

प्राईम टाईमला तोच कार्यक्रम प्रसारित केला जातो, ज्याद्वारे चॅनेलला अधिक टीआरपी अर्थातच अधिक नफा मिळू शकेल. टीआरपी चॅनेलचा बिझनेसचा एक भाग असतो व यातूनच चॅनेल पैसा कमवत असते. यातूनच जितके जास्त दर्जेदार कार्यक्रम बनवता येतील तितके तयार करते आणि टीआरपी वाढी साठी प्रोमोट करते. जेवढा जास्त कार्यक्रम प्रसिद्ध होतो तेवढा फायदा चॅनेलला मिळणार असतो.

तर अश्याप्रकारे टीआरपी काय असतं व त्याची गरज टीव्ही चॅनेल्सला का आहे हे तुम्हाला समजलं असेलच. यातून पुढे तुम्ही तुमच्या आवडत्या टीव्ही शोजचा टीआरपी माहिती करून घ्या व त्यानुरूप कोणता कार्यक्रम लोकप्रिय आहे हे जाणून घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “टीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या..

 • November 7, 2018 at 1:07 pm
  Permalink

  farch chsngali mahiti milali

  Reply
 • November 13, 2018 at 11:04 pm
  Permalink

  टेक्निकल माहिती योग्य रित्या देन्यात आलेली नाही

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *