‘फोबिया’ म्हणजे काय ? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्याला सर्वांना कोणत्या न कोणत्या गोष्टीची भीती वाटतं असते , कोणाला उंची ची भीती वाटते , कोणाला झुरळा ची भीती वाटते , कोणाला पाण्यात उतरण्याची भीती वाटते , ही भीती व्यक्तीगणिक वेगवेगळ्या प्रकारची असते , या भीतीला शास्त्रीय भाषेत “फोबिया” म्हणतात . तर आपण जाणून घेऊ हा फोबिया व्हायची नेमकी कारणं काय असतात ? फोबिया म्हणजे नेमकं काय असतं?

फोबिया म्हणजे एक प्रकारची एखाद्या गोष्टीची, वस्तूची अथवा प्रसंगाची भीती असते, ही भीती ताण व अति चिंतेमुळे होणाऱ्या मानसिक आजारात गणली जाते.

फोबिया म्हणजे एक प्रकारच्या सवय झालेल्या काही प्रतिक्रिया असतात, या प्रतिक्रिया विशिष्ट व्यक्ती, प्रसंग, वस्तू बघितल्या वर मनात दाटून येतात ज्यामुळे ताण तणाव वाढतो व भीती वाटण्यास, हृदयाची गती तीव्र होण्यास सुरुवात होते. फोबिया हा तेव्हा होत असतो ज्यावेळी समोर घडणाऱ्या प्रत्यक्ष भयानक घटनेबद्दल वाटणार भय, दुसऱ्या कुठल्या संदर्भातल्या असलेल्या व नसलेल्या इतर गोष्टी बद्दल वाटू लागते.

 

phobia-inmarathi
healthyplace.com

पाण्यात बुडण्याची प्रचंड भीती ही आधी सहन केलेल्या एखाद्या वाईट पाण्यात बुडण्याच्या अनुभवाची प्रचिती असते, मनुष्य जेव्हा फोबिया ग्रस्त असतो तेव्हा तो ज्या गोष्टीला घाबरतो, त्या गोष्टीला भविष्यात घडण्यापासून थांबवण्याचा व टाळण्याचा प्रयत्न करत असतो, कधी कधी एखादा रिस्पॉन्स जास्त वेळ दिला वा ज्या गोष्टीची भीती वाटते ती पुन्हा पुन्हा घडू लागली तर त्या गोष्टीचा फोबिया आपोआप नाहीसा होतो

तरी वैद्यकशास्त्राकडे फोबिया वर अनेक उपचार उपलब्ध आहेत. फोबिया झालेल्या व्यक्तीवर Behavior Therapy च्या माध्यमातून उपचार करता येतात. व्यक्ती च्या मनात ज्या गोष्टीची भीती आहे त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा तिचा सामना करायला लावला जातो. हळूहळू त्या व्यक्तीला वाटणारी भीती कमी होत जाते. ती भीती पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या व्यक्तीची त्या परिस्थितीशी पुन्हा पुन्हा घडवली जाणारी गाठ त्या माणसाच्या मनातील त्या गोष्टीचा तिरस्कार नाहीसा करते.

मग एक वेळ अशी येते की तो व्यक्ती त्या परिस्थितीशी एकरूप होतो आणि भीती कायमची नष्ट होते. “पाण्यात पडल्या शिवाय माणूस पोहणं शिकत नाही” ह्या म्हणी सारखाच प्रकार या थेरपी मध्ये केला जात असतो.

जरी आज मनोवैज्ञानिकांनी फोबिया ला भीती चा एक प्रकार वा चिंतेचा एक प्रकार म्हटलं असलं , तरी हा फोबिया वस्तू व परिस्थिती च्या भीती अनुरूप विविध प्रकारात विभागला जातो. हे प्रकार फार मजेशीर असतात, Acrophobia म्हणजे उंचीची भीती, हा प्रकार बहुतांश आढळतो. उंच इमारतीच्या गॅलरी मधून खाली बघायला ही जीव घाबरतो. अनेकदा खाली पडायची भीती वाटते. अश्या व्यक्तींना Acrophobic म्हणतात.

 

healthtopia.net

बऱ्याचदा प्रामुख्याने लहान मुलांना अंधाराची प्रचंड भीती वाटत असते. अंधारात जायचं म्हटलं तरी त्यांना घाम फुटत असतो. या अंधाराच्या भीतीला “Nyctophobia” म्हणतात. Claustrophobia म्हणजे बंद दरवाज्याची भीती. ह्या फोबीया ने ग्रस्त लोक रात्रभर दरवाजे उघडे ठेवून झोपतात यांना एकटं बंदीस्त राहिल्यास बऱ्याचदा दम घुटल्या सारखं देखील वाटत राहतं. अजून मजेशीर प्रकार म्हणजे xenophobia ह्या प्रकारातले लोक सहजासहजी कोणा अनोळखी व्यक्तीशी बोलत नाहीत. अश्या व्यक्तींना मित्र बनवायला पण बराच कालावधी लागत असतो, ह्या व्यक्ती एकांत पसंत करतात.

Ochlophobia म्हणजेच गर्दीची भीती, आता हा अश्याप्रकारचा फोबिया असतो ज्यात व्यक्तीला गर्दी गोंधळ, वर्दळ असलेल्या ठिकाणी जायला आवडत नाही.

ह्या फोबिया ने ग्रस्त व्यक्ती कधीही कोणाला तरी सोबत घेऊनच मगच वर्दळीच्या ठिकाणी जातात. त्यांना वर्दळीत वस्तू चोरी व्हायची, हरवण्याची नाहीतर चक्क अपहरणाची भीती वाटतं असते. प्राण्यांची भीती वाटणं हा सुद्धा एकप्रकारचा फोबिया आहे , ह्या प्रकारच्या फोबियात सरसकट सर्व प्राण्यांची भीती वाटत नाही तर एका विशिष्ट प्राण्याची भीती वाटत असते . Agoraphobia हा सुद्धा Ochlophobia प्रमाणेच असतो यात सार्वजनिक ठिकाणी जाण्याची व तिथे काही बरा वाईट प्रकार घडण्याची भीती वाटत राहते.

 

phobia-radhika-inmarathi
desinema.com

ह्या प्रकारचे लोक सार्वजनिक ठिकाणी जाण – येणं टाळतात, ते घरात बंदिस्त राहणंच पसंत करतात. आता सर्वात मजेशीर फोबिया म्हणजे “School Phobia” अर्थातच शाळेत जाण्याची भीती! हा फोबिया मुळात पालकांशी अत्यंत घनिष्ठ नातं असणाऱ्या मुलांना होतो. पालकांपासून थोडावेळ जरी लांब राहिले तरी त्यांचा मनात भीती निर्माण होते. कधी कधी शाळेतल्या शिक्षकांच्या भीतीने देखील हा फोबिया होत असतो. हा फोबिया म्हणजे शाळेला सुट्टी मारून घरी राहण्याचे उत्तम कारण असूं ही होऊ शकतो !

तर असा हा फोबिया व त्याचे हे मजेशीर निवडक प्रकार. अजूनही अनेक प्रकार आहेत ज्यांची माहिती तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून मिळवू शकतात. तर आपल्याला हे आर्टीकल वाचून कोणता फोबिया आहे अथवा असण्याची दाट शक्यता वाटते त्याबद्दल कंमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?