“मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


भारताची एकूण सामाजिक रचना पाहता लैंगिकतेबाबत आपल्या समाजात फारसं बोललं जात नाही. हा विषय सार्वजनिक चर्चा करण्याचा नाही असा ठाम समाज होईल इतपत आपण अजून त्या व्यवस्थेच्या ओझ्याखाली आहोत.

असे असताना समलिंगी आणि त्यासारखी वेगळी काहीतरी लैंगिक ओळख असणार्या व्यक्तींच्या व्यथांबद्दल तर बोलणेच गैर मानले जाते.

त्यात ती व्यक्ती मुस्लीम असेल तर प्रश्नच मिटला. आधीच धर्माच्या पगड्यात असलेला समाज या नैसर्गिक गोष्टी मान्य करायला तयारच होत नाही. आणि मग अशा व्यक्तींची आयुष्यभर कुचंबणा होत राहते.

याच विषयावर “भारतात समलैंगिक असण्याची काय किंमत चुकवावी लागते” असा प्रश्न कोरा या सोशल साईटवर विचारला गेला. त्या प्रश्नाला अवंतिका शेख या मुलीने लिहिलेले उत्तर या बाबतीत आपण अजूनही किती मागास आहोत याची साक्ष देते…

===

आज ईदच्या निमित्ताने माझ्या वडीलांनी मला फोन केला होता. आम्ही एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि एकमेकांची विचारपुस केली.
फोन ठेवण्यापूर्वी मी त्यांना कधी भेटायला जाईन असे त्यांनी विचारले.

मी म्हणाले, “कधीच नाही.”

जेव्हा जेव्हा ते मला हा प्रश्न विचारतात तेव्हा तेव्हा माझे उत्तर हेच असते.

 

muslim-girl-inmarathi
ria.ru

त्यांना माझे उत्तर माहिती असते. तरीही प्रत्येक वेळी मी माझा निर्णय बदलला असावा या आशेने ते मला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात. पण मला माहिती आहे, मी माझा निर्णय कधीच बदलणार नाही.या निर्णयाचे कारण सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत आहे.

सहा वर्षांपूर्वी…

मी माझ्या वडिलांबरोबर घरी होते. त्यावेळी मौलवी घरी आले आणि माझे भविष्याबद्दल काय नियोजन आहे असे त्यांनी विचारले. त्यानंतर ते सातत्याने मला दुबईच्या चांगला पगार असणाऱ्या एका मुलासोबत लग्न करण्याविषयी सुचवु लागले. मी त्यांना विचारले:

“त्याच्याशी लग्न करून मी काय करू?”

तर ते म्हणाले मी लग्नानंतर त्याची, त्याच्या घराची, त्याच्या कुटुबांची काळजी घ्यावी. आम्हाला मुले होतील व आम्ही सेटल होऊ. मी त्यांना समजावून सांगितले की सेटल होण्याचा अर्थ असा नसुन माझ्यासाठी तो माझी स्वप्न पुर्ण करणे असा आहे. पण तरीही ते थांबले नाही.

 

muslim-women-inmarathi
seekershub.com

त्यांनी माझे म्हणणे समजुन घेतले नाही. माझ्या वडीलांना मी लेस्बियन आहे हे माहिती होते . मौलवी माझे ऐकतच नव्हते त्यामुळे अखेर मी त्यांना सांगितले की,

“मी लेस्बियन आहे आणि मला मुलांमध्ये रस नाही.”

बास. एवढी गोष्ट त्यांना धक्का देण्यास पुरेशी होती. हे ऐकुन ते वेडावले. त्यांना जवळपास ह्र्यदयविकाराचा झटका आला होता. ते माझ्या आईला शिव्या-शाप देऊ लागले (कारण ती हिंदु होती). ते मला पटवुन देऊ लागले की हा एक आजार आहे आणि ते तो बरा करु शकतात.

ते कुराणमधील आयत म्हणु लागले. मी त्या विदुषकाला सांगितले की याबाबत ते माझी कुठलीच मदत करू शकत नाही कारण मुळात हा आजारच नाही. आम्ही वाद घातला.

ते त्यांच्या मोठ्या आवाजात माझ्यावर ओरडत राहिले. माझा अपमान करत राहिले. मीही शब्दांनी त्याच्यांशी लढत राहिले.

 

lesbian-inmarathi
etsy.com

हे सर्व सुरु असताना माझे वडील एका कोपर्यात उभे होते. ते काहीच बोलत नव्हते, बधिर झाल्याप्रमाणे फक्त उभे होते. त्यांना माझी लाज वाटत होती.

मी भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होते. तो पर्यंत मौलवींनी सगळ्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना गोळा केले होते. आता तिथे जवळपास पन्नास लोक माझ्या विरोधात उभे होते.सगळे आरडा-ओरडा करत मला शिव्या-शाप देत होते. पण मी हार मानली नाही.

मी त्यांचा सामना करत राहिले. फक्त शब्दांनी. मला त्यांनी नाव ठेवले. माझा छळ केला. पण मी मागे हटले नाही.

मी एकटी आणि ते पन्नास गुंड माझ्या विरोधात. तरीही माझे वडील काहीही बोलले नाही वा त्यांनी याविरोधात कोणतीही कृती केली नाही.

मौलवी सतत ते समलैंगिकतेवर उपचार करू शकतात असे पटवुन देत होते. तोपर्यंत बरीच गर्दी कमी झाली होती. तिथे मौलवींसह जेमतेम पाच-दहा माणसे होती.

मी माझ्या वडीलांकडे पाहिले आणि त्यांना विचारले,

“अब्बा तुम्ही काहीच का बोलला नाहीत?”

मी रडायला लागले. माझे वडील मला प्रत्युत्तर देत नाहीयेत असे लक्षात येताच मी मौलवींची गचंडी पकडली. त्यांना सांगितले,

“नीट ऐका. मी शांत बसुन तुमच्या गोड गोड वचनांच्या मोहात अडकणारी मुलगी नाही. मला चांगलेच माहिती आहे की दुबईला जाऊन तेथील मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीसोबत काय घडते. मलासुद्धा माझे आयुष्य आहे आणि त्याचे मला जे करायचे तेच मी करणार. मला तुमची आणि तुमच्या धार्मिक शिकवणींची फिकीर नाही.”

मी माझे सामान भरले आणि थोड्याच वेळात ते घर सोडले.

मी मुंबईला गेले आणि माझ्या एका जवळच्या मित्राला फोन केला. त्याने मला घर आणि नोकरी शोधायला मदत केली.त्याने माझ्या वाईट काळात मला खुप मदत केली. मी मुंबईमध्ये तेथील स्थानिक समलैंगिक लोकांच्या स्वीकृती क्लासला गेले तेव्हा मला माझ्यासारख्या अनेक मुली भेटल्या.


तेव्हा मला जाणीव झाली की भारतीय समाजात समलैंगिक म्हणुन जन्माला येणे किती कठीण गोष्ट आहे.

 

lesbo-inmarathi
pinterest.com

तेथील एका मुलीच्या घरच्यांनी तिला अनेक दिवस एका खोलीत कोंडुन ठेवले होते. ते तिला तिच्या भावाला स्पर्श करु देत नव्हते कारण त्यांचा समज होता की त्यामुळे तिचा आजार तिच्या भावाला होईल आणि तोही समलैंगिक होईल.

जेव्हा तुम्ही समलैंगिक आहात हे समजते तेव्हा तुमच्याकडे एक संकट किंवा धोका म्हणुन बगीतले जाते. भारतीय लोक समलैंगिकतेला आजार समजतात.

मी सगळ्याप्रकारचे वैद्यकीय आणि आयुर्वेदिक उपचार करून बघितले आहेत. पण नाही. त्यांचा काहीही उपयोग नाही कारण मुळात हा आजारच नाही. ही बाबा अत्यंत सामान्य असुन आमच्यापासुन तुम्हाला कुठलाही धोका नाही. आम्ही लोकांना जीवे मारत नाही. कुणालाही आमच्यात सामील व्हा असा आग्रहही करत नाही.

आम्ही रात्री-बेरात्री आमच्या समलैंगिक असण्याबद्दल आरडा-ओरडा करत फिरत नाही. तुमचा समाज आमच्यामुळे कोणत्याच संकटात नाही.

आणि तुमचा कोणता धर्मही आमच्यामुळे संकटात सापडलेला नाही. तुमच्या धर्माने आणि समाजाने काळजी करायला हवी ती समलैंगिक लोकांबद्दल अत्यंत चुकीच्या माहितीचा प्रसार करणाऱ्या प्रचारकांबद्दल.

धन्यवाद..


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on ““मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”

 • January 24, 2019 at 2:49 pm
  Permalink

  nice

  Reply
 • January 24, 2019 at 8:13 pm
  Permalink

  एका वेगळ्या विषयावरचा विचार करायला लावणारा लेख आहे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?