“गोरिला ग्लास” : काय आहे ह्या विचित्र नावामागचं लॉजिक? हा प्रकार खास का आहे? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज कुठलाही नवीन स्मार्टफोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्यात बाकी काही असो की नसो एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे ‘गोरिला ग्लास’. पण तुम्हाला माहित आहे का? हा आपला गोरिला ग्लास काय आहे आणि “गोरील्ला” ह्याचा अर्थ काय आहे?

तर गोरिला ग्लास ही कुठल्या विशिष्ट प्रकारची काच नसून तो एक ब्रँड आहे. म्हणजे जसं वन प्लस, सॅमसंग, नोकिया तसच गोरिला ग्लास.

आता आपण जाणून घेऊ की गोरिला ग्लास म्हणजे काय?

 

Guriella-Feature-inmarathi01
whatphone.net

‘गोरिला ग्लास’ नावाच्या ब्रांडवर ‘कॉर्निंग इंक’ नावाच्या कंपनीचे कॉपीराईट आहे. हा ग्लास अल्युमिनियम, सिलिकॉन आणि ऑक्सिजन ह्याच्या मिश्रणातून बनतो. ह्या प्रोसेसला Ion-Exchange Process (आयन एक्सचेंज प्रोसेस) म्हणतात.

 

Guriella-Feature-inmarathi03
wikomobile.com

आयन एक्स्चेंज एक रासायनिक प्रक्रिया आहे, जी एका काचेला मजबूत बनविण्याच काम करते. ह्यामध्ये आयनला काचेमध्ये भरले जाते ज्यामुळे कम्प्रेशनची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे काचेला मजबुती मिळते.

 

Guriella-Feature-inmarathi02
youtube.com

गोरिला ग्लास हा इतर प्रकारच्या ग्लासेसपेक्षा हलका आणि पातळ असतो आणि त्याहून जास्त मजबूत असतो. तरीदेखील ‘कॉर्निंग इंक’ रोज ह्याला आणखी पातळ आणि अधिक मजबूत बनविण्याच्या प्रयत्नात असते. म्हणून गोरिला ग्लासचे नवनवीन वर्जन बाजारात येत असतात. आता तर ह्याचा सहावा वर्जन बाजारात आला आहे.

‘कॉर्निंग इंक’ ह्याचा दावा आहे की ह्याचा सहावा वर्जन पाचव्या वर्जनपेक्षा जास्त मजबूत असेल. एवढा मजबूत की ह्याला एका मीटरच्या उंचीवरून १५ वेळा पाडल्यावर देखील तो तुटणार नाही.

‘कॉर्निंग इंक’चा हा गोरिला ग्लास जरी आज एवढा प्रसिद्ध झाला असला तरी देखील ह्या कंपनीने हा ग्लास साठच्या दशकातच बनविला होता. तेव्हा  जिथे मजबूत काचेची गरज असायची तिथे ही काच वापरली जायची.

 

Guriella-Feature-inmarathi04
businessinsider.in

टच स्क्रीन मोबाईलला अॅपलने बाजारात आणले. पण हा मोबाईल बनविण्यासाठी त्यांना अश्या काचेची गरज होती जी मजबूत, हलकी असेल तसेच स्क्रॅचही सहन करू शकेल. त्यामूळे ‘कॉर्निंग इंक’ ह्यांच्या कंपनीची मदत घेतली गेली. त्यांनी अॅपलच्या गरजेनुसार ह्या काचेमध्ये परिवर्तन केले. आणि त्यानंतर ह्याला गोरिला ग्लास म्हणून रजिस्टर करण्यात आले.


आज अॅपलमध्येच नाही तर जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये हा गोरिला ग्लास वापरला जातो.

हा ग्लास मजबूत असल्या कारणाने ह्याची तुलना गोरिलाशी करण्यात आली. त्यामुळे ह्याला गोरिला ग्लास असे नाव देण्यात आले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on ““गोरिला ग्लास” : काय आहे ह्या विचित्र नावामागचं लॉजिक? हा प्रकार खास का आहे? वाचा

  • December 1, 2018 at 12:29 pm
    Permalink

    Right

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?