क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट… ह्या खेळात दोन गोष्टी अति महत्वाच्या असतात त्या म्हणजे बॅट आणि बॉल. आपण नेहेमी बघतो की, हे क्रिकेटर्स खेळाकरिता आपल्या बॅट स्वतः निवडतात. त्यांना कशी, कुठली बॅट हवी हे ते स्वतः नीट पारखून घेतात. पण ह्या खेळात जेवढे महत्व बॅटचे आहे तेवढेच बॉलचे देखील आहे.

 

cricket-ball-inmarathi02
hindustantimes.com

क्रिकेटचा बॉल हा लेदर आणि कॉर्कचा वापर करून बनवला जातो. तसेच टेस्ट क्रिकेट दरम्यान लाल तर एक दिवसीय सामन्यांत पांढऱ्या रंगाच्या बॉलचा वापर केला जातो.

 

cricket-ball-inmarathi03
fbc.com.fj

आपण अनेकदा बघतो की खेळादरम्यान जर गोलंदाजाला बॉल वापरण्यात काही समस्या असेल तर तो नवीन बॉलची अपील करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की नवीन बॉल आल्यानंतर त्या जुन्या बॉलचे काय होत असेल?

काही काळापूर्वी बीसीसीआईने ह्याचं संबंधी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ह्या जुन्या बॉल्सचे काय होते याचं उत्तर होतं.

 

cricket-ball-inmarathi05
bcci.tv

जेव्हाही कुठल्या सामन्यात एखादा खेळाडू उत्तम प्रदर्शन करतो तेव्हा त्या सामन्याचा बॉल त्याला एक आठवण म्हणून दिला जातो. आत्ताच भारत आणि दक्षिण आफ्रिका ह्यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात युजवेंद्र चहल याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या ह्या प्रदर्शनाची आठवण म्हणून त्याला या सामन्यात वापरण्यात आलेला बॉल देण्यात आला. हा सामना ४ फेब्रुवारी ला खेळला गेला.

 

cricket-ball-inmarathi04
bcci.tv

ह्या सामन्यात चहलने २२ रन्स देऊन ५ विकेट्स घेतले होते. त्याला देण्यात आलेल्या बॉलवर तो सामना, सामन्याची तारीख, ग्राउंड ते त्याच्या प्रदर्शनापर्यंत सर्वकाही लिहिण्यात आले होते.

ह्या बॉल्सना क्रिकेट चाहत्यांना विकले देखील जाते. त्यासाठी लिलाव देखील ठेवण्यात येतो. पण असे क्वचितच होते, जेव्हा तो बॉल जास्तच खास असेल तेव्हा त्याचा लिलाव होतो.

माजी इंग्लिश क्रिकेटर बॉब विल्स यांनी १९८१ ला एशेज सिरीजमध्ये ओस्ट्रेलिया विरुध्द ८ विकेट घेतले होते. या सामन्यात लाल रंगाच्या लेदर बॉलचा वापर करण्यात आला होता. ह्या बॉलला २०१७ साली १० लाखाहून अधिक किमतीत विकण्याकरिता ठेवण्यात आले होते.

अनेक खेळाडू असे देखील असतात जे डोमेस्टिक आणि रिजनल लेवलवर उत्कृष्ट प्रदर्शन करतात. तेव्हा काही बॉल्स ह्या तरुण खेळाडूंना त्याचं कौतुक म्हणून दिले जातात. जेणेकरून त्यांना प्रात्साहन मिळत राहील.

 

cricket-ball-inmarathi06
pinterest.com

हे बॉल्स फॅन्सना भेट म्हणून देखील दिले जातात. टेलीकम्यूनिकेशन कंपनी ‘वोडाफोन’ नेहेमी आईपीएल दरम्यान ‘वोडाफोन सुपरफॅन’ घेऊन येते. जिथे लकी विनर्सना आईपीएलच्या सामन्यादरम्यान हॉस्पिटॅलिटी स्टॅण्ड मध्ये बसून सामना बघायला मिळतो. सोबतच त्यांना जिंकणाऱ्या टीमच्या कर्णधाराने ऑटोग्राफ केलेला मॅच बॉल देखील मिळतो.

 

cricket-ball-inmarathi
smh.com.au

कधी कधी सामन्यादरम्यान बॉल खराब होतो, तेव्हा त्याच्या जागी जो बॉल वापरला जातो तो नवीन नसतो. तर तो देखील आधीच्या बॉल एवढे ओव्हर्स खेळलेला असतो पण त्याची कंडीशन चांगली असते.

टेस्ट क्रिकेट दरम्यान नेहेमी बॉल बदलला जातो. पाच दिवसीय क्रिकेटमध्ये ८० ओव्हर्स नंतर बॉल बदलता येतो.

ह्याप्रकारे जुन्या बॉल्सना अनेक ठिकाणी वापरल्या जाते किंवा चाहत्यांना तो गिफ्ट म्हणूनही दिला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल?

 • February 14, 2018 at 5:43 pm
  Permalink

  खूपच मस्त माहिती आहे

  Reply
 • February 15, 2018 at 6:43 am
  Permalink

  खुप छान!! दाभाडकर, पुणे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?