पद्मावत चित्रपटातील उंची कपडे-दागिन्यांचं पुढे काय होणार माहितीये? वाचा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

संजय लीला भन्साळीच्या पद्मावत बद्दल सध्या विविध विषयांवर चर्चा सुरू आहेत – त्यातील एक विषय म्हणजे भरजरी पोशाख!

चित्रपटभर उंची कपडे, दागदागिन्यांची रेलचेल आहे.

 

shahid-deepika-padmavati-photo-inmarathi
ibnlive.in

आपण चित्रपटांमध्ये असलेले हे असे भरजरी पोशाख घातलेले कलाकार पाहून हरखून जातो.  हिरोंचे कपडे तेवढे भारी नसतात म्हणा…पण हिरोईन्सचे कपडे पाहून अचंबित व्हायला होतं.

हे कपडे शुटींग झाल्यावर कुठे जात असतील? काही कल्पना आहे?

 

celebrity-costumes-secret-marathipizza01

स्रोत

दीपिका पदुकोणचं उदाहरणच घेऊ या.

पद्मावतच नव्हे – रामलीला मधील लीलाने परिधान केलेला चांद-बाली पोशाख असो किंवा बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानीने परिधान केलेला गोल्डन शरारा असो तिचे हे ड्रेसिंग ट्रेंड तरुण मुलींमध्ये भलतेच लोकप्रिय झाले.

 

celebrity-costumes-secret-marathipizza02

 

सर्वसाधारण समज असा आहे की हे कपडे त्या हिरोईन्सना मिळतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शुटींग झाल्यानंतर या कपड्यांना पेट्यांमध्ये बंद करून ठेवलं जातं!

प्रत्येक पेटीवर चित्रपटाचचं नाव लिहून प्रोडक्शन हाउसच्या देखरेखीखाली एका खोलीत ठेवलं जातं. त्यानंतर याच प्रोडक्शन हाउसच्या दुसऱ्या चित्रपटांमध्ये या कपड्यांना मिक्स-मॅच करून ज्युनियर आर्टिस्टसाठी तयार केलं जातं.

म्हणजे दीपिकाने घातलेला हा शरारा, नंतर कधीतरी एखादी ज्युनिअर आर्टिस्ट कुठल्यातरी हिरोईनच्या मागे नाचताना घालणार! 😀

हे मिक्समॅच करण्याचं काम इतक्या शिताफीन केलं जात की आपण या कपड्यांना पूर्वी दुसऱ्या एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलं आहे याचा आपल्याला संशय देखील येत नाही.

(तसंही, आपण प्रमुख कलाकारांकडे लक्ष असताना, ज्युनिअर आर्टिस्टकडे आपण बघतो तरी कुठे?!)

 

celebrity-costumes-secret-marathipizza03

स्रोत

कधीकधी काय होत की एखाद्या कलाकाराला एखादी भूमिका इतकी भावते की आठवण म्हणून ते त्या भूमिकेचा costume स्वत:कडे ठेवून घेतात. अर्थात, प्रोडक्शन हाउसच्या परवानगीनेच!

काही कपडे त्या ठराविक कलाकारामुळे इतके हिट ठरतात की चॅरिटीसाठी त्यांचा लिलाव केला जातो. रोबोट चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्या ने घातलेल्या कपड्यांचा ऑनलाईन लिलाव केला गेला आणि त्यातून मिळालेले पैसे एका संस्थेला दान करण्यात आले.

तर हे असं आहे –

कपड्यांचा देखावा आणि देखाव्यांचे कपडे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?