पॉर्न आणि वीर्यरक्षणाबद्दल ह्या प्रसिध्द व्यक्ती काय म्हणतात हे आपणास ठाऊक आहे काय?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

वीर्यरक्षण (Semen Retention), ब्रह्मचर्य, हस्तमैथुन ह्या विषयांची चर्चा खूप केली जाते. लोक ह्या विषयांबद्दल खूप कुतूहलाने वाचतात. तर आज आपण जाणून घेऊया काही सुप्रसिद्ध celebrities वीर्यरक्षणाबद्दल काय म्हणतात ते.

पण, इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे “ब्रम्हचर्य” ह्या विषयाबद्दल आपण बोलत नाही आहोत.

“ब्रम्हचर्य” म्हणजे वीर्यरक्षण आणि आणखी बरंच काही. तर जाणून घेऊया काय म्हणाल्या ह्या प्रसिद्ध व्यक्ती…

वीर्यरक्षणाबद्दल –


माइक टायसन (सुप्रसिद्ध बॉक्सर) –

 

mike tyson-inmarathi
bbc.co.uk

स्त्रियांना जिंकून घेणे हे तुमच्यातून ऊर्जा खर्ची पाडत असते. मी नेहमी वाचत आलेलो आहे की, महान फायटर्स हे त्यांच्या सामन्यांच्या आधी संभोगापासून दूर राहत. म्हणूनच मी गेली पाच वर्षे संभोगापासून दूर आहे.

मुहम्मद अली –


 

muhammad ali-inmarathi
usejournal.com

हे महान बॉक्सर सुद्धा स्वत:ला संभोग आणि हस्तमैथुन यांपासून दूर ठेवत. त्यांच्या यशाचं आणि आरोग्याचं श्रेय ते “वीर्यरक्षणाला” देतात.

डेविड हे (David Haye) –

डेविड हे नावाचे “वर्ल्ड हेवी वेट बॉक्सिंग चॅम्पियन” म्हणतात-


“मी जवळजवळ सहा आठवडे आधीपासूनच संभोग आणि हस्तमैथुन यांपासून दूर राहायला सुरुवात करतो…म्हणजे सामन्याच्या वेळी मला ताकदीची कमी पडत नाही. मैथुनातून आपल्या शरीराला आवश्यक अशी खनिजे आणि पोषक तत्त्वे बाहेर पडतात आणि तेही खूप फालतू कारणांमुळे!”

 

david-haye-inmarathi
mightyfighter.com

मॅनी पॅकिओ (Manny Pacquiao) नावाचे सुप्रसिद्ध बॉक्सरसुद्धा त्यांच्या सामन्याआधी स्वत:ला बायकोपासून दूर ठेवत. त्यांचे ट्रेनर फ्रेडी रॉच (Freddie Roach) म्हणत की, आम्ही याबद्दल तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलाय. संभोगामुळे तुमच्या शरीरातल्या टेस्टेस्टेरॉनची पातळी कमी होते ज्यामुळे तुमची आक्रमकता कमी होते!

रिक्सन ग्रेसि –

 

rickson-inmarathi
graciemag.com

ग्रेसि हे ब्राझिलियन जिजित्सु आणि मिक्सड मार्शल आर्टस् प्रकारात चॅम्पियन आहेत. त्यांच्या मते संभोगाद्वारे शरीरातील खूप महत्त्वाची ऊर्जा बाहेर पडते. ते म्हणतात की-

जेव्हा घोडा हा शर्यतीत उतरत असतो तोपर्यंत त्याला प्रजननासाठी कधीही प्रेरित करत नाहीत, जेणेकरून त्याच्या शरीरातील ऊर्जा वाचावी.

ह्या उदाहरणावरुन तुम्ही समजू शकता कि स्वत:ला “वाचवणं” किती महत्त्वाचं आहे ते.

सैगो टाकामोरी (Samurai) –

 

saigo-takamori-inmarathi
jpninfo.com

स्त्रियांना टाळण्याबद्दल सैगो यांना अभिमान वाटे. तरुणपणी त्यांनी संभोग ह्या विषयाला आनंद देतो, म्हणून त्याच्या अधीन होण्याऐवजी त्याला सुख व प्रामाणिकपणा ह्यात येणार सर्वात मोठा अडथळा म्हणून पाहिले.

वरील सर्व celebrities हे अशा क्षेत्रात पारंगत होते, ज्यात शारीरिक ऊर्जा भरपूर खर्ची पडते आणि त्यांच्या statementsवरून आपल्याला कळून येतंय की, त्यांना वीर्यरक्षणाचा फायदाच झालाय.

१४वे दलाई लामा –

“लैंगिक आकर्षण आणि त्याचा दबाव, त्यातील मिळणार आनंद हा अत्यंत क्षणिक असतो. पण, त्यामुळे पुढे जाऊन complications तयार होतात.”

 

Dalai Lama-InMarathi
balancedachievement.com

दलाई लामा यांचं spiritual background बघता त्यांच्याकडून असं अपेक्षित आहेच. परंतु आता आपण प्रसिद्ध लेखक, तत्त्वज्ञ, हॉलिवूडमधील कलाकार, शास्त्रज्ञ काय म्हणतात ते बघूया!

मार्क ट्वेन (सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक) –

 

mark_twain-inmarathi
steamboattimes.com

हस्तमैथुन हा मैथुनाच्या अनेक प्रकारांतील सर्वात खालचा प्रकार. सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत समाजात याचं स्थान नाही. तुम्हाला जर लैंगिक संबंधांमध्ये पडायचेच असेल तर हस्तमैथुनापासून लांब रहा.


सॉक्रेटिस –

“sex” मुळे तुम्हाला आनंद मिळत असेल. परंतु, तुम्हाला ते गुलाम बनवून टाकते.

अल्बर्ट केमस (फ्रेंच फिलॉसॉफर, लेखक) –

 

albertcamus-inmarathi
brainpickings.org

Chastity (पावित्र्य) हे सर्जनशीलतेचे कारण आहे.

फ्रेडरिक निट्झ ( सुप्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ) –

 

frederick nitze-inmarathi
vision.org

वीर्याचे रक्तात पुनः शोषले जाणे हे शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. त्यासारखे पोषण दुसरे नाही. सर्व ताकदीचे मूळ तेच आहे.


निट्झ यांचे वरील statement हे कुठल्याशा “योग” विषयक ग्रंथातुन घेतले आहे असे वाटेल पण ते खरोखर असं म्हटले आहेत!

हमझा युसूफ ( अमेरिकन मुस्लिम स्कॉलर) –

“पॉर्न बघणारे लोक हे लवकर कंटाळतात. “Boredom” हे पॉर्न addiction चं सर्वात मोठं कारण निरीक्षणातून दिसून आलंय. Soft core नंतर ते लोक Hardcore कडे वळतात आणि त्यांच्या नकळत असे लोक “paedophile” (वयात न आलेल्या लहान मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणारा) होऊन बसतात.”

डॉक्टर जॉन हार्वे केलॉंग (अमेरिकन डॉक्टर) –


 

dr. john harley kelloge-inmarathi
missedinhistory.com

डॉक्टर केलॉग यांच्या मते प्लेग, मोठे युद्ध, देवी आणि तत्सम रोग यांनी जे मानवतेचे नुकसान केले त्याहून कित्त्येक पटीने नुकसान हे हस्तमैथुन या प्रकाराने केले आहे. (डॉक्टर जॉन हे आयुर्वेदाचार्य नाहीत बरं का!)

जॉन मेयर (अमेरिकन गायक) –

 

John Mayer
mercurynews.com

तुम्हाला भडकवणाऱ्या ११ फोटोंपैकी एका फोटोवर तुम्ही तुमचं “काम” संपवाल, असं तुम्हाला वाटत असतं पण तसं कधीही होत नाही. तुमचं भडकणं आणि “काम” करणं सुरूच राहतं.

टेरी क्रेउस (अमेरिकन कलाकार) –

 

terry crews-inmarathi
vulture.com

सतत मैथुन केल्यास लोकांकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते. आपण फक्त शरीराच्या ठराविक अवयवांकडेच लक्ष द्यायला लागतो. व्यक्ती म्हणजे ऑब्जेक्ट होऊन बसतात. लोकांवर प्रेम करणं सोडून त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा अशी मानसिकता त्याने बनत जाते.

ह्यू ग्रांट (इंग्लिश कलाकार आणि निर्माता) –

 

hugh grant-inmarathi
hollywood.com

ग्रांट यांना शेवटचं पॉर्न कधी बघितलं असं विचारण्यात आल्यावर ते म्हणाले- “जवळजवळ ३ वर्ष झालीत! मला खूप छान वाटतंय!!”

पामेला अँडरसन (कॅनेडिअन – अमेरिकन actress) –

 

pamella anderson-inmarathi
thelist.com

“आपल्याला pornography बद्दल नेहमी चेतावणी देण्यात येते. याने माणसाचा दर्जा तर खालावतोच, पण एक पती म्हणून आणि एक पिता म्हणून माणूस अयशस्वी ठरतो!… अजून किती कुटुंब नष्ट होणार आहेत यामुळे?! किती लोकांचा घटस्फोट होईस्तोवर आपण वाट बघणार आहोत हा प्रकार बंद होण्याची?”

“The Dark Knight Rises”मध्ये रॉबिनची भूमिका करणाऱ्या जोसेफ गॉर्डन –

 

joseph jorden-inmarathi
b2bnn.com

लेवींट यांच्या मते तर mainstream मीडिया आणि पॉर्न इंडस्ट्री यांमध्ये काहीच फरक नाहीये!

अत्यंत प्रसिद्ध आणि बुद्धिमान शास्त्रज्ञ जे म्हणतात ते वाचून तुम्हाला खरंच आश्चर्याचा धक्काच बसेल!

निकोला टेस्ला –

 

Nikola tesla.Inmarathi
wakingtimesmedia.com

“अत्यंत महत्त्वाची अशी एक ऊर्जा असते. जिला हिंदू लोक कुंडलिनी शक्ती म्हणतात. ह्या गोष्टीची मला पूर्णपणे कल्पना आहे, आणि मी सावधदेखील आहे.”

या सर्व प्रसिद्ध नावांमध्ये एक कुप्रसिद्ध नावदेखील आहे. हा मनुष्य एक सिरीयल किलर आहे. त्याचं म्हणणं काय आहे ते बघूया.

टेड बंडी (Ted Bundy) –

 

TedBundy-inmarathi
newyorker.com

“मी कारागृहात खूप वेळ घालवलाय. आणि मी माझ्यासारख्याच खुन्यांना भेटलोय… आणि मला अजिबात शंका नाहीये की ह्यातला प्रत्येक जण pornography मध्ये गुंतलेला होता. FBI ने केलेल्या अभ्यासात देखील हे आढळून आले आहे की, सीरिअल किलर्सचा कॉमन इंटरेस्ट हा pornography आहे.”

किती भयावह आहे हे वास्तव! पण आपण यातून काहीतरी शिकूया आणि अनावश्यक सवयींपासून लांब राहूया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?