डॉक्टर म्हणाले, “काळजी घ्या, रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत”, म्हणजे नेमकं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“हे बघा रिपोर्टनुसार तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत, या प्लेटलेट्स पुरेश्या प्रमाणात निर्माण होत नाहीत तोवर काळजी घ्यायला हवी.”

डॉक्टरांचे हे बोल ऐकताच आपल्या जीवाची अगदी घालमेल होते.

प्लेटलेट्स कमी झाल्या म्हणजे माझ्या जीवाला तर धोका नाही ना ही चिंता मनात अगदी घर करून बसते.

कारण त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते आणि दुसऱ्याच क्षणी मनात प्रश्न उभा राहतो,

“हे प्लेटलेट्स म्हणजे नेमकं काय?”

 

Blood.marathipizza
medicinenet.com

तर –

प्लेटलेट्स (थ्रोम्बोसाईट्स) अर्थात तंतुकणिका हा तसा रक्तातील महत्वाचा घटक!

हिमोग्लोबिन प्रमाणे त्याला देखील महत्वाचे स्थान! रक्त पातळ होऊ नं देण्याचे आणि रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव रोखण्याच काम या प्लेटलेट्स करतात.

प्लेटलेट्सचे स्वरूप असतेच एका प्लेटप्रमाणे, म्हणून त्यांना प्लेटलेट्स हे नाव दिलं गेलं.

रक्तात प्रामुख्याने तीन प्रकारच्या पेशी असतात – लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स.

या पेशींपैकी रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या सर्वाधिक असते. आपल्या शरीरातील मोठ्या हाडांत असणाऱ्या रक्तमज्जेतील मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून प्लेटलेट्स तयार होतात. याचं आयुष्य साधारण ५ ते ९ दिवसाचं असतं. आपल्या शरीराला कोठेही इजा झाली आणि त्यातून रक्तप्रवाह सुरु झाला की जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तस्त्राव खंडित करण्याचे काम करतात.

 

platelets-marathipizza01

स्त्रोत

सामन्यात: मानवी शरीरात दीड लाख ते साडेचार लाख एवढ्या संख्येत प्लेटलेट्स आढळतात. प्लेटलेट्सची संख्या वाढल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच हृदयरोग, स्ट्रोक सारखे आजार उदयास येतात. हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधीर होऊन निकामी होण्याची शक्यता जास्त असते.

या उलट प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो, कारण त्याला रोखण्यासाठी पुरेश्या प्रमाणात प्लेटलेट्स उपलब्ध नसतात.

अशा परिस्थितीमध्ये नाकातून, हिरड्यांतून, थुंकीतून रक्त बाहेर पडतं. त्वचेवर लालसर ठिपके दिसून येतात.

डेंगू, मलेरिया, अनुवांशिक आजार आणि केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होते. सध्या डेंगू, मलेरिया, चिकुनगुन्या सारख्या रोगांनी थैमान घातल्यामुळेच प्लेटलेट्स तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्यास सांगतात. ज्या आधारे पुढील उपचार करता येऊ शकतात. अशावेळेस प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदान आल्यास पुढील गोष्टी जरूर लक्षात ठेवा:

१) लसून खाणे टाळावे

२) अधिक श्रमाचे व्यायाम आणि दगदग होईल अशी कामे करू नयेत

 

eyes-tired marathipizza

 

3) दात घासताना हिरड्यांना ब्रश लागणार नाही याची काळजी घ्यावी

 

teeth-marathipizza01
johnstreetdental.com

 

४) बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी

 

scinetific-facts-marathipizza02
readersdigest.co.uk

 

५) शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात पपई, गुळवेल, आवळा, भोपळा, पालक, नारळ पाणी आणि बीट यांचे सेवन जरूर करावे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 60 posts and counting.See all posts by vishal

7 thoughts on “डॉक्टर म्हणाले, “काळजी घ्या, रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत”, म्हणजे नेमकं काय?

 • July 14, 2018 at 12:34 pm
  Permalink

  फारच छान माहिती मिळाली. “धन्यवाद गुगल.”

  Reply
 • September 26, 2018 at 1:18 pm
  Permalink

  मनापासून धन्यवाद

  Reply
 • October 20, 2018 at 9:53 pm
  Permalink

  sir rakta til peshi red cell vadlyane kahi dhoka tr nahi na?

  Reply
 • November 20, 2018 at 12:35 am
  Permalink

  Right but doctors treatment krtana khupach pasentla bhiti nirman karun khupach sline wa injection lawto aani kiti platelet wr kasa treatment ghyacha yachi hi thoda knowledge asla tr changla hoto.

  Reply
 • April 14, 2019 at 1:05 pm
  Permalink

  very nice information thanks google

  Reply
 • June 16, 2019 at 10:25 pm
  Permalink

  Precious and most important information got by Google. Thank so much.

  Reply
 • June 18, 2019 at 10:17 pm
  Permalink

  खुप छान व महत्वपूर्ण माहिती

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?