अंध लोकांना फक्त “अंधार”च दिसत असेल का? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपलं जग हे खूप सुंदर आहे. आपण खरच भाग्यवान आहोत की, आपण या सुंदर अश्या पृथ्वीतलावर राहतो, जिथे आपल्या ह्या पृथ्वीचं विलक्षण सौंदर्य बघायला मिळतं. पण आपल्याच जगात काही असे लोकही असतात ज्यांच्या वाट्याला या निसर्गाचा, येथील गोष्टींचा अनुभव येतच नाही. किंवा आला असूनही ते डोळे भरून त्या गोष्टीला बघू शकत नाही. कारण त्यांच्या पदरी तर अंधत्व आलेलं असतं.

 

blindness-inmarathi01
juniorblind.org

आपल्या सारख्या दृष्टी असलेल्या लोकांना अंध लोकांचे दुख त्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते ते कधीच कळू शकणार नाही. पण आपल्या मनात हा एक विचार नेहेमी येतो की, अंध लोकांना काय दिसत असेल तसेच अंध लोकांच्या मनात नेहेमी हा विचार येत असतो की दृष्टी असलेल्यांना काय, कसं दिसत असेल?

आता अंध लोकांना काय दिसत असेल किंवा ते अंधाराशिवाय काही बघू शकतात का? ह्या प्रश्नाचं काही एक विशिष्ट उत्तर नाही तर ह्याची अनेक उत्तरे असू शकतात.

जन्मापासूनच अंध असलेले लोकं :

जे लोक जन्मापासून अंध असतात ते काहीच बघू शकत नाही. त्यांनी अंधाराशिवाय काही अनुभवलेलेच नसतं. त्यामुळे त्यांना फक्त अंधारच दिसतो आणखी काही नाही. ज्या व्यक्तींना आधी दृष्टी होती त्यांच्याबाबतीत असे घडत नाही, कारण त्यांनी आधी बघितलेलं असतं.

 

blindness-inmarathi03
pakistantoday.com.pk

हे तसचं आहे जसं तुम्ही डोळे बंद केल्यावर काहीही बघू शकत नाही. जर तुम्ही तुमचा एक डोळा बंद केला आणि दुसर डोळा एखाद्या गोष्टीवर केंद्रित केला. तर तुमच्या बंद डोळ्याने तुम्हाला काही दिसेल का? पण जर तुम्ही उघडा डोळा बंद केला तर मात्र तुम्हाला बंद डोळ्याने देखील ती केंद्रित केलेली वस्तू दिसेल कारण तुम्ही डोळा बंद करण्याआधी ती बघितलेली असेल.

पूर्णपणे अंधत्व आलेले :

जे लोक आपली दृष्टी काही कारणांमुळे गमावतात त्यांचे ह्याबाबतचे अनुभव देखील वेगळे असतात. काहींना पूर्णपणे अंधार दिसतो, जसे की कुठल्या अंधाऱ्या खोलीत आहेत. तर काही लोकांना प्रकाश किंवा काही हालचाली दिसतात, ज्यावरून ते त्या वस्तूंचा आकार, रंग किंवा प्रकाश ह्यांचा अंदाज लावू शकतात.

 

blindness-inmarathi
linkedin.com

ह्या पूर्णपणे अंधत्वाला फंक्शनल ब्लॅइंडनेस म्हणतात. World Health Organization नुसार फंक्शनल ब्लॅइंडनेसची व्याख्या पुढील प्रमाणे

Having vision in the best eye corrected to not better than 20/500 or having less than 10 degrees of vision.

फंक्शनली अंध लोक काय बघू शकतात हे त्यांच्या अंधत्वाच्या तीव्रतेवर आणि अशक्तपणा ह्यावर अवलंबून असते.

अंशतः अंधत्व :

एखाद्या व्यक्तीला मोठ्या आकाराच्या वस्तू सहज दिसत असतील पण त्या स्पष्ट दिसत नाही. तेव्हा अश्या अंधत्वाला अंशतः अंधत्व असे म्हणतात. असे व्यक्ती रंग वगैरे ओळखू शकतात पण हे सर्व एका विशिष्ट अंतरापर्यंतच मर्यादित असते. ह्यामध्ये रंग ओळखण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी होऊ शकते किंवा दृष्टी अस्पष्ट होऊ शकते.

कमी दिसणे :

एखाद्या व्यक्तीला कमी दिसते, ती वस्तूंना स्पष्टपणे बघू शकत नसली तरी लाईट्स सुरु आहेत की बंद हे ती नक्की सांगू शकते.

blindness-inmarathi02
upwork.com

ह्यात आणखी एक प्रकार असतो. ज्यात व्यक्ती एका विशिष्ट रेडियस पर्यंतच बघू शकतो. अश्या प्रकारातील लोक १० अंशापेक्षा कमी कोनातील वस्तू बघण्यास समर्थ असतात.

आपल्याला आणखी एक प्रश्न पडत असतो, की अंध लोक त्यांच्या स्वप्नात काय बघत असतील?

 

blindness-inmarathi04
hearingreview.com

जी व्यक्ती जन्मतः अंध असते ती देखील स्वप्न बघतात पण त्यांच्या स्वप्नात आपल्या सारखे चित्र येत नाहीत तर त्यांच्या स्वप्नात आवाज, सुगंध, फ्लेवर्स आणि भावना असतात. पण जर व्यक्ती जन्मतः अंध नसेल म्हणजे काही कारणांमुळे तो दृष्टीहीन झाला असेल तर त्याच्या स्वप्नात त्यांना चित्र दिसतात. कारण त्यांनी आधी ते बघितलेलं असतं.

आजपर्यंत आपल्या मनात अंध लोकांच्या बद्दल जे प्रश्न आणि गैरसमज होते. ते या माध्यमातून दूर झाले असतील अशी आशा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?