या मंदिरांमध्ये देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मंदिरं ही आपल्या हिंदू संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. आपण आपल्या आराध्य देवांची पूजा करण्यासाठी या मंदिरात जात असतो. मंदिरात आपण नेहेमी देवांच्या मुर्त्या बघितल्या असतील. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरात तिच्या पायाशी राक्षस देखील बघितला असणार. पण काय तुम्ही कधी असं मंदिर बघितलं आहे जिथे राक्षसांची पूजा केली जाते? नाही ना.. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी काही अश्या आश्चर्यकारक मंदिरांची माहिती घेऊन आलो आहोत जिथे राक्षसांची पूजा केली जाते… आणि तेही अगदी देवांप्रमाणे…

अहिरावण मंदिर, उत्तरप्रदेश 

 

temple-inmarathi06
jagran.com

रावणाचा भाऊ अहिरावण हा देखील एक राक्षसच होता. अहिरावण यानेच भगवान राम आणि लक्ष्मणच अपहरण केलं होतं. पण रावणाच्या या भावाचं उतरप्रदेशच्या झांसी येथे एक मंदिर आहे. झांसीच्या पचकुइंया येथे एक असे मंदिर आहे जेथे हनुमानासोबत अहिरावणची देखील पूजा केली जाते. एवढचं नाही तर तेथे अहिरावणचा भाऊ महिरावण याची देखील पूजा केली जाते. हे मंदिर ३०० वर्ष जुने असल्याचं सांगितल्या जाते.

 

दुर्योधन मंदिर, उत्तराखंड 

 

temple-inmarathi04
patrika.com

दुर्योधन म्हणजे महाभारतातील खलनायकच. याच्यामुळे महाभारतात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. त्यामुळे दुर्योधन हा देखील राक्षसांच्या श्रेणीत येतो. पण उत्तराखंड येथील नेटवार परिसरात दुर्योधनाचं एक मोठं मंदिर आहे. येथे येणारे भाविक दुर्योधनालाच देव मानतात आणि त्याची नित्यनेमाने पूजा करतात. या मंदिराजवळच दुर्योधनाचा प्रिय मित्र सूर्य पुत्र कर्ण याचं देखील मंदिर आहे.

 

पूतनाचं मंदिर, उत्तरप्रदेश 

 

temple-inmarathi02
jagran.com

कृष्णाला आपले दुध पाजून मारण्याचा कट रचलेल्या पुतना राक्षसीला तर आपण सर्वच जाणता. पण उत्तर प्रदेशातील गोकुळ येथे पुतना राक्षसीचं मंदिर आहे. या मंदिरात पुतनाची झोपलेली मूर्ती आहे. ज्यावर कृष्ण तिचं दुध पिताना दाखविण्यात आले आहे. या मंदिराला बनविण्यामागे एक मान्यता आहे की, श्रीकृष्णाला मारण्याच्या उद्धेश्याने का असे ना, पण पुतनाने कृष्णाला एका माते प्रमाणे स्वतःच दुध पाजलं होतं.

 

दशानन मंदिर, उत्तरप्रदेश

 

temple-inmarathi
livehindustan.com

दशानन म्हणजेच रावण. रावण हा देखील एक राक्षसच होता. पण उत्तर प्रदेशातील कानपूर येथील शिवाला परिसरात एक दशानन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती १८९० साली करण्यात आली होती. या मंदिराचे दारं वर्षभर बंद असतात ते केवळ एकाच दिवशी उघडले जातात आणि ते म्हणजे दसऱ्याला. यादिवशी मोठ्या संख्येने लोकं रावणाचे दर्शन घेण्याकरिता येथे येतात. येथे रावणाला सर्वज्ञानी मानून त्याची पूजा करण्यात येते.

तर अशी आहेत ही भारतातील विचित्र मंदिर जिथे देव नाही तर राक्षस पूजले जातात…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?