या काही विचित्र ‘फोबिया’मुळे अनेकांना जीवन त्रासदायक होऊन बसले आहे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असते. आपल्या आजूबाजुला अनेक लोक आपल्याला भेटत असतील ज्यांना अंधार, पाल, झुरळ किंवा इतर कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल.

पण काही लोकांना काही अश्याही गोष्टींपासून भीती वाटत असते ज्या आपल्याला खूप विचित्र वाटू शकतात. हे काही असे फोबिया आहेत जे दिसायला जरी विचित्र वाटत असले तरी अनेकांचे जीवन ह्यामुळे त्रासदायक होऊन बसते.

एगिरोफोबिया म्हणजे रस्ता ओलांडण्याची भीती :

 

fobia-inmarathi
nuestropsicologoenmadrid.com

एगिरोफोबिया ने ग्रासलेल्या लोकांना रस्ता किंवा हायवे ओलांडण्याची भीती असते. अश्या लोकांना शहरात राहायला खूप समस्या येतात. कारण शहरात खु मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे पसरलेले असतात.

अश्यात मग ह्या फोबियाने ग्रासलेल्या लोकांना शहरात राहायची भीती वाटते कारण त्यांना रस्ते ओलांडण्याची भीती सतावत असते.

मॅग्रिकोफोबिया म्हणजे जेवण बनविण्याची भीती :

 

fobia-inmarathi01
listverse.com

ह्या भीतीने ग्रासलेल्या लोकांना जेवण बनविण्यापासून भीती वाटते. एकटे राहणाऱ्या लोकांना हा फोबिया जास्त करून होतो.

पीडियोफोबिया म्हणजे बाहुल्यांची भीती :

 

fobia-inmarathi02
arts.cecil.edu

हा फोबिया असणाऱ्या लोकांना बाहुल्यांची भीती वाटत असते. भीतीदायक एनाबेले सारख्या बाहुल्याच नाही तर ह्यांना चांगल्या बाहुल्यांची देखील भीती वाटते.

डीपनोफोबिया जेवताना बोलण्याची भीती :

 

fobia-inmarathi03
incisozluk.com.tr

ह्या फोबियाने ग्रासलेले लोक रात्रीचे जेवण करताना बोलण्याचे टाळतात.

इसिप्ट्रोफोबिया म्हणजे आरश्याची भीती :

 

fobia-inmarathi04
healthcaretip.com

ह्या फोबियाने ग्रासलेल्या लोकांना आरश्यात स्वतःला बघण्याची भीती वाटते. त्यांन अशी भीती असते की आरश्याच्या दुसऱ्या बाजूला कुठले वेगळे जग आहे आणि जर त्यांनी आरश्यात बघितले तर ते त्या जगात चालले जातील.

पेन्थेराफोबिया म्हणजे सासूची भीती :

 

fobia-inmarathi05
jagran.com

हा सर्वात कॉमन असा फोबिया आहे. ह्यात लोकांना स्वतःच्या सासूची भीती वाटते.

कॅथिसोफोबिया म्हणजे एका ठिकाणी बसण्याची भीती :

 

fobia-inmarathi06
forbes.com

ह्या फोबियाने ग्रासलेली व्यक्ती एका ठिकाणी खूप वेळ बसू शकत नाही.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?