वसीम अक्रममुळे वकार युनिसचं षड्यंत्र फसलं आणि कुंबळेने १० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय क्रिकेट मध्ये गोलंदाजांचा वरचष्मा फार कमीवेळा दिसलाय. वरचष्मा सोडा, प्रभाव पाडू शकेल असे गोलंदाज देखील विरळाच. अनिल कुंबळे हे नाव अश्या विरळा गोलंदाजांपैकी एक. कुंबळेने, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात १० बळीं घेऊन विक्रम केल्याची घटना तर प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाच्या हृदयावर कायमची कोरल्या गेली आहे.

७ फेब्रुवारी १९९९ रोजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट्स घेत एक अभिमानास्पद इतिहास रचला.

हा भीमपराक्रम करून अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला होता. या आधी इंग्लंडच्या जिम लेकर या गोलंदाजाने ही कामगिरी करून ठेवली होती.

 

anil-kumble-10-wickets-marathipizza

स्रोत

अनिल कुंबळेने करून दाखवलेल्या या अद्वितीय कामगिरीला यंदा १८ वर्षे पूर्ण झाली. यावेळी सेहवागने सहा वर्षांपूर्वीची एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मिडीयावर शेअर केली.

या बातमीमध्ये वसिम अक्रमने आपण स्वत:हून अनिल कुंबळेला १० विकेट पूर्ण करण्यात कशी मदत केली हे सांगितले होते. याच बातमीचा आधार घेत वीरेंद्र सेहवागने अनिल कुंबळेने टिपलेल्या त्या १० विकेट्स मागच्या कहाणीला पुन्हा उजाळा दिला.

 

sehwag-post-marathipizza

 

दिल्लीच्या फिरोज सहा कोटला मैदानावर खेळवण्यात आलेल्या त्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात वासिम अक्रम हा अनिल कुंबळेचा १० वा बळी ठरला आणि त्याने कुंबळेला ही कामगिरी पूर्ण करण्यात जाणून मोलाची मदतच केली.

त्याच झालं असं की, अनिल कुंबळेने पाकिस्तान संघांचे ९ विकेट्स टिपले होते. ११ वा खेळाडू म्हणून वसिम अक्रम बॅटिंग साठी आला. नॉन स्ट्राईकला वकार युनिस उभा होता. वकार युनिस वसिम अक्रमकडे गेला आणि म्हणाला,

अनिल कुंबळेला १० व विकेट घेऊ द्यायचा नाही. त्यासाठी तू रन आउट हो, म्हणजे तो विकेट कुंबळेच्या खात्यात पकडला जाणार नाही आणि त्याला रेकॉर्ड बनवता येणार नाही.

त्याची युक्ती ऐकून वसिम अक्रम म्हणाला होता,

जे १० विकेट करण्याचा विक्रम अनिल च्या नशिबात असेल तर काहीही झालं तरी ते घडणारच. पण मी रन आउट होणार नाही आणि माझी विकेट पण त्याला देणार नाही.

पण शेवटी वसिम अक्रमने मारलेला चेंडू लक्ष्मणच्या हातात स्थिरावला आणि अनिल कुंबळेने अक्रमचा विकेट घेऊनच तो विक्रम पूर्ण केला.

 

anil-kumble-10-wickets-marathipizza01

स्रोत

याबद्दल बोलताना वसिम अक्रम म्हणतो,

मला स्वत:वर जास्तच विश्वास होता आणि जणू परमेश्वराच्याच मनात होते की काय म्हणून त्याचा १० वा बळी मीच ठरलो. जर मी वकार युनिसच ऐकलं असतं तर कदाचित अनिल कुंबळेच्या हातून तो रेकॉर्ड झाला नसता. पण शेवटी जे व्हायचं होतं तेच घडलं.

 

anil-kumble-10-wickets-marathipizza02

स्रोत

या सामन्यात अनिल कुंबळेने २६.३ ओव्हर्समध्ये केवळ ७४ धावा देऊन पाकिस्तानचे सर्व गडी बाद केले आणि भारताने २१२ रन्सने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला.

असा हा क्रिकेटच्या मैदानावरील एक अविस्मरणीय किस्सा!

(हे देखील वाचा: जेव्हा क्रिकेट टीममधील सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार मिळाला!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “वसीम अक्रममुळे वकार युनिसचं षड्यंत्र फसलं आणि कुंबळेने १० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?