तब्बल २३ वर्षांपासून तो हातावरच चालतोय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

प्रत्येक व्यक्ती ही खास असते. प्रत्येकात काही ना काही चांगलं करण्याची कला असते. पण काही लोक ते ओळखतात आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळ सिद्ध करून दाखवतात.

आता ह्यालाच बघा ना… म्हणजे आजवर तुम्ही निरनिराळी विचित्र कामे करताना लोकांना बघितलं असेलं. पण तुम्ही कधी कोणाला हाताच्या मदतीने चालताना किंवा इतर कुठली काम करताना बघितलं आहे का?

 

boy-walking-on-his-hands0-inmarathi

पण इथोपिया चा Dirar Abohoy हे सर्व करू शकतो. हा मुलगा हाताच्या भारावर उभा होऊन सर्व कामे करतो, जी आपण पायवर उभं राहून देखील नाही करू शकत. Dirar Abohoy ९ वर्षांचा असताना पासून तो निरंतर हाताच्या भारावर चालतो आहे. आणि आज तो ३२ वर्षांचा आहे.

बीबीसीच्या एका व्हिडीओमध्ये Dirar Abohoy सांगतो की, “मी हा स्टंट कदाचित हॉलीवूड किंवा चायनीज चित्रपटात बघितला होता. तेव्हापासूनच मी हा स्टंट करण्याचा विचार केला. हा स्टंट करून मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव नोंदवायचं आहे.”

 

boy-walking-on-his-hands-inmarathi01

 

काही लोकांना त्यांच्यातली ही प्रतिभा पटत नाही. पण अशी कुठलीही गोष्ट किंवा काम नाहीये जे Dirar Abohoy हा हाताच्या भारावर उभं राहून करू शकतो. त्याच्या आईला मात्र नेहेमी ह्यांची काळजी लागलेली असते की, त्याच्या ह्या सवईमुळे तो त्याच्या मानेला किंवा डोक्याला काही नुकसान पोहोचवेल म्हणून. पण जोवर त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जात नाही तोपर्यंत तो थांबणारा नाही.

आता काय माहित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड Dirar Abohoy  ह्याच्या ह्या उलट्या कामाची दाखल कधी घेतील. कारण तोवर Dirar Abohoy हा काही थांबणारा नाही….

स्त्रोत : BBC

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?