३० वर्षात तब्बल २५०० वन्य प्राणी वाचवणारा “वनप्रेमी” अवलिया आसामच्या जंगलांचा मसीहा ठरलाय..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

वन्याप्राण्यांसाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालून काम करतात. आज आपण अशाच एका वन्यप्रेमी मुलाची कथा जाणून घेणार आहोत..

विनोद दुलु बोरा याचा जन्म छपणाला या गावामध्ये झाला आहे. हे गाव आसाम मधील पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. नागाव जिल्ह्यातील हा प्रदेश नैसर्गिक दृष्ट्या संपन्न आहे. या तरुणाने अडीच हजाराहून जास्त वन्य प्राण्यांचे जीव वाचवललेे आहेत.

आज या जंगलातल्या प्राण्यांसाठी हा तरूण तारणहार म्हणून पुढे आलेला आहे. त्याचा हा प्रवास त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी पासून चालू झाला आहे.

तो सांगतो की ज्यावेळी तो सात वर्षांचा होता तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याने पाहिले की एका हत्तीचं छोटस पिल्लू फिरत होतं, पण फिरता फिरता अचानक पणे ते एका लहानशा विहिरीमध्ये पडले.

यातला योगायोग बघा पिल्लू ज्या विहिरीत पडले ती विहीरही त्याच्या शेजारच्यांची होती. सकाळी ज्यावेळी उठला तेव्हा त्याने त्याचे हे स्वप्न त्याच्या वडिलांना आणि सर्व नातेवाईकांना सांगितले त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही.

 

vinod inmarathi
billapara.com

 

पण त्याला मनात हा आत्मविश्वास होता की असे काहीतरी नक्कीच घडले आहे. पण थोड्या वेळाने प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला कारण त्याने जे स्वप्न सांगितले होते ते स्वप्न सत्यात उतरले होते. त्याच्या शेजारील घराच्या विहिरीमध्ये खरेच एक हत्तीचं पिल्लू पडलेले होते.

या एका घटनेने त्याचे आयुष्य बदलून टाकले आहे त्याचा प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलून गेला आणि प्राण्यांना वाचण्यातच त्याने त्याचा करिअर शोधले.

त्याच्या प्रवासाबद्दल सांगताना तो अस म्हणतो की, “मी आमच्या भागामध्ये निरीक्षण केलेली गोष्ट म्हणजे आमच्याकडे मांस म्हणून अनेक लहान-मोठ्या वन्यप्राण्यांना विकले जाते. मग त्यांना वाचवण्यासाठी मी त्यांना विकत घेऊन त्यांना जंगलात सोडून द्यायचो. त्यामुळे मला आनंद मिळत असे.”

काही वर्षांनंतर दुलूच्या काही निर्णयांमुळे त्याला “ग्रीन गार्डन नेचर ऑर्गनायझेशन” या संघटनेशी निगडित काम करायची संधी मिळाली. या संघटनेची स्थापना नागावमध्ये १९९४ मध्ये करण्यात आली होती. ही संघटना वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी मदत करत असते आणि याच्या माध्यमातूनच तो वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी काम करू लागला.

मागच्या वीस वर्षांमध्ये त्याने जवळपास अडीच हजार प्राण्यांना जीवनदान दिलेले आहे. त्यातील तीन हत्ती होते, दोन चित्त्याची पिल्ल होती, तीन अस्वल होती, २० हरणंही होती. आणि अशाच अनेक वन्य जीवांना ज्याला मनुष्य घाबरतो अशा सर्वांना जीवनदान मिळण्यासाठी दुलूने हे कार्य केलेले आहे.

 

dulu-borah_inmarathi
theindianexpress.com

 

असे सांगितले जाते की त्याने जवळपास सहाशे साप जे मनुष्यवस्ती मध्ये आले होते त्यांना त्याने सुखरूप जंगलामध्ये परत पाठवलेलं आहे. यामध्ये अनेक किंग कोब्रा सारखे घातक सापही होते.

प्राण्यांची किंवा पक्ष्यांची सुटका केल्यानंतर कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जाते?

या प्रश्नावर बोलताना दुलू म्हणाला की,

“अनेक वाचवलेले वन्यजिव आम्ही परत जंगलात नेऊन सोडून देतो. जर प्राण्यांना काही इजा झालेली असेल तर आम्ही त्यांना आमच्या घरी नेतो. त्यांची काळजी घेतो. त्यांना चांगल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करण्यात येते त्यानंतरच, त्यांना आम्ही जंगलामध्ये सुखरूप ठिकाणी सोडून येतो.”

मी गेली अनेक वर्ष या सर्व गोष्टींमध्ये काम करत आहे त्यामुळे गेल्या काही काळामध्ये त्याने एक चांगल्या प्रकारचे नेटवर्क तयार केले आहे. जेणेकरून त्याला प्राण्यांबद्दल कुठलीही माहिती माहिती होईल.

पुढे बोलताना तो म्हणाला की, “उद्यामरी गावामध्ये काही गावकरी शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. ते कुठल्याही वन्य पशूंची शिकार करू शकतात. अगदी सापाचीही. आणि ही माहिती मला मिळाली तेव्हा त्यातील सत्यता तपासण्यासाठी मी त्या गावी जायचा निर्णय घेतला.

 

dulu inmarathi
indianexpress.com

 

तिथे गेल्यानंतर जे दृश्य पाहिलं ते अत्यंत विदारक होतं. तिथे काही गावकरी एका वयस्कर किंग कोब्राला दगडाने मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. ते सगळं बघितल्यानंतर मी त्या सापाला वाचवण्यासाठी त्यांना विरोध केला आणि त्या सापाचा जीव वाचवला.”

दुलूच्या या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्याने अनेक अशा घटना बघितलेल्या आहेत. एका ठिकाणी त्याला मद्यधुंद लोकांचाही विरोध पत्करावा लागला होता.

त्यातील काही लोकांनी एका हत्तीच्या पिल्लाला बंद करून ठेवले होते. त्यांचे असे म्हणणे होते की देवाने त्यांना ते हत्तीचे पिल्लू बहाल केलेले आहे. तिथे त्या गावकऱ्यांसोबत दुलूची बाचाबाची झाली.

त्याने त्या गावकर्‍यांना समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. तेथील गावकरी त्याच्यावरती कुराड घेऊन चालून आले होते पण शेवटी त्या हत्तीला वाचवण्यात यश मिळवलंच. दुलूने त्या हत्तीच्या पिल्लाला रात्रीच्या वेळी सोडवलं ज्यावेळी ते सर्व गावकरी झोपलेले होते.

त्याने अनेक गावकऱ्यांना हत्तीला ईजा पोहोचवताना बघितलेलं होते. तेव्हापासून त्याने एक अशी टीम तयार केली जी हत्ती आणि गावकऱ्यांमध्ये झालेली चकमक संपवण्यास मदत करू शकतील.

या भागांमध्ये कधीकधी हत्ती शेतात घुसतात. हत्ती शेतामध्ये अाल्यामुळे पिकाचे नुकसान होते. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी त्याने एकट्याने पुढे जाण्याच्या ऐवजी सर्वांना सोबत घेऊन एक गट तयार केला. जो गट अशाप्रकारे झालेल्या अनेक घटना त्यांच्या पद्धतीने हाताळू शकेल.

 

bora inmarathi
baliparafoundation.com

 

अशा प्रकारच्या दोनशे ते तीनशे घटनांमध्ये त्याच्या गटाने मिळून हत्तींना वाचवण्या मध्ये यश प्राप्त केलेले आहे. अशा प्रकारच्या हत्तींना “काझीरंगा नॅशनल पार्क” मध्ये नेऊन सोडले जाते. अशा घटना होऊच नयेत यासाठी त्याने दोनशे पेक्षाही जास्त केळीची झाडे रस्त्याच्या बाजूला लावण्यास सुरुवात केली आहे.

जेणेकरून ज्या हत्तींना भूक लागलेले असेल ते हत्ती शेतामध्ये न जाता त्या झाडांवरची केळी खाऊन त्यांची भूक भागवु शकतील.

त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून दुलु अनेक गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यांना बद्दल प्रबोधन करताना आपल्याला दिसून येईल. अनेक गावांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्येही वन्यप्राण्यांना बद्दल प्रबोधन करतो.

त्याच्या या प्रयत्नांमुळेच या भागातील वन्य प्राण्यांचे जीव वाचण्यास मदत झालेली आहे. दूलु एका फोन वरती कुठेही जाऊन अशाप्रकारे प्राण्यांना वाचविण्याचे महान काम करत आहे. त्याचा हा वन्यजीवांना वाचवण्याचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरावा असाच आहे.

या सर्व वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी त्याने जे काही कष्ट घेतलेले आहेत ते खरंच अद्वितीय आहेत.

त्याच्या माध्यमातून त्याने अनेक पक्षांनाही जीवनदान दिलेले आहे. त्याच्या या कर्तृत्वाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याच्या या कामाला आम्ही शुभेच्छा देतो. त्याने चालू केलेले हे काम प्रत्येकापर्यंत पोहोचावे एवढीच इच्छा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?