विजय मल्याच्या जामिनाची रक्कम ऐकून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

विजय मल्या हे नाव सामान्य भारतीय माणसाला माहित नाही असा माणूस क्वचितच सापडेल. अतिशय रंगेल आणि मौजमजेचे आयुष्य जगणाऱ्या विजय मल्याने भारतातील अनेक बँकांच्या तोंडाला फेस आणला आहे, कारण हा किंगफिशर कॅलेंडरचा जनक आणि गुड टाईम्सचा किंग स्वताच्या अमर्याद उधळ्या व बेताल जीवनशैलीमुळे भारतीय बँकांचे करोडो रुपये बुडवून परदेशात पळून गेला आहे. मल्या आणि त्यांच्या कंपन्या आर्थिक गैरव्यवहार आणि गोंधळामुळे २०१२ पासून चर्चेत आहेत. ह्यासाठी अनेक आश्वासने देऊन त्याने काहीही पावले उचलली नाहीत. शिवाय कोर्टाच्या ऑर्डर सुद्धा अनेक वेळा पाळल्या नाहीत. अखेर कोणालाही ताकास तूर न लागू देता २ मार्च २०१६ रोजी परिवाराबरोबर राहायचे आहे हे कारण सांगून ब्रिटनला पळून गेला. तेव्हापासून १७ भारतीय बँकांचे धाबे दणाणले आहे कारण ह्या मल्याने ह्या बँकांकडून करोडो रुपयांचे कर्ज घेऊन ते परत न करता तो पळून गेला आहे.

InMarathi Android App
vijay-mallya-marathipizza01
indianexpress.com

ह्या बँकांचे जवळजवळ ९,००० कोटी रुपये मल्याकडे थकीत आहेत. हे कर्ज त्याने जगभरातल्या ४० कंपन्यांमध्ये भागीदारी करण्यासाठी घेतले आहे.

मार्च २०१६ मध्ये ह्या भारतीय बँकांनी सुप्रीम कोर्टात संयुक्तपणे एक याचिका दाखल केली .ह्या याचिकेत मल्याला भारत सोडून जाण्यास मनाई व्हावी असे लिहिले होते, पण भारत सरकारने असे सांगितले की मल्या आधीच देश सोडून पळून गेला आहे.

१८ एप्रिल २०१७ रोजी युकेच्या Metropolitan Police extradition unit ने भारत सरकारच्या वतीने मल्याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आणि त्यानंतर त्याला Westminster Magistrates’ Court समोर सादर करण्यात आले . मल्याला अटक झाल्याची बातमी जगभरात प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या. अनेकांना वाटले की आता त्याला भारतात आणून त्याच्यावर कारवाई सुरु होईल. पण लोकांनी हा आनंद नीट साजराही केला नाही तर लगेच मल्याला जामिन मिळाल्याची बातमी सुद्धा सगळीकडे पसरली. अटक होऊन काही तास उलटत नाहीत तोच युकेच्या कोर्टाने मल्याला जामिन मंजूर केला आणि जामिन मिळाल्यावर मल्या पुन्हा त्याचे रंगेबेरंगी आयुष्य जगण्यास मोकळा झाला. त्याचा माज परत उफाळून आला आणि त्याने भारतीय माध्यमांना हसत ट्वीटर वर भारतीय माध्यमांची टर उडवली.

vijay-mallya-marathipizza02
topyaps.com

अटक झाल्याच्या तीन तासात मल्याला जामीन मिळाला आणि लोकांना हे ऐकून धक्का बसला. पण त्याच्या जामिनाची रक्कम ऐकली तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील.

मल्याला कोर्टाने त्याच्या केस संदर्भात कोर्टात उपस्थित राहण्याची पुढची तारीख १७ मे दिली आहे. तेव्हा काही माध्यमांनी शोधाशोध करून हे जाणून घेतले की जामिनासाठी नक्की किती पैसे भरल्यानंतर मल्याला जामीन मिळाला? तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की

जेल मध्ये न राहण्यासाठी ह्या मदिरासम्राटाने तब्बल ६५०००० इतके पौंड म्हणजेच चक्क ५ कोटी ३८ लाख रुपये मोजले आहेत.

इतके पैसे तर सामान्य माणूस स्वप्नात सुद्धा मोजू शकणार नाही. पैसे भरल्यानंतर त्याला त्याचा पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले. त्यावर सुद्धा मल्याने ट्वीट करून हे सगळं नॉर्मल आहे अशा थाटात twitter वर बेफिकीर उत्तर दिले आहे.

vijay-mallya-marathipizza03
twitter.com

अनेकांना त्याच्या जामिनाची रक्कम ऐकून धक्का बसला असला तरी अनेक लोकांना हे होणार हे माहिती होते. जो माणूस १७ बँकांना ९००० कोटींचा चुना लावू शकतो त्याच्यासाठी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ५ कोटी रक्कम भरणे हे काहीच नाही. ह्यावर अनेक उत्साही नेटीझन्सने अनेक जोक्स आणि Memes सुद्धा व्हायरल केले.

Vijay mallya broke Salman Khans record of getting bail in such a short interval of time!

 

what is the fastest thing in the world?
-Cheetah, no
-Light, no
den ?
-Vijay Mallya’s Bail….

 

2 Minutes Silence For Those Who Were Typing A Big Post Praising The Move But Until They Finished, #VijayMallya Was Granted Bail !

 

Kids : Salman Khan

Men : Sanjay Dutt

Legends : #VijayMallya

Bail in less than 3 hours.

 

#VijayMallya gets arrested & granted bail in 3hrs
Dear, @Flipkart u guys just got a new brand ambassador for ur 3hrs delivery.

 

आज अगर विजय मल्या को बेल नाही मिलती तो मेरा पैसो परसे विश्वास उठ जाता!

vijay-mallya-marathipizza04
kitepocket.com

असे अनेक जोक्स सगळीकडे फिरत होते. पण जरी मल्याला जामीन पटकन मिळाला असला तरीही आपण हे लक्षात घ्यायला हवे की तो पूर्णपणे सहीसलामत सुटलेला नाही. युकेच्या कोर्टाने त्याला सक्त ऑर्डर दिल्या आहेत कि त्याला पुढच्या सुनावणी पर्यंत ब्रिटनच्या extradition rules चे पालन करावे लागेल आणि तोवर तो त्याचा पत्ता बदलू शकत नाही.

भारतीय सरकारने मागच्या वर्षीच त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. त्यामुळे त्याने त्याचा पासपोर्ट सरकारच्या स्वाधीन करणे अनिवार्य आहे. कुठलेही आंतरराष्ट्रीय travel documents जवळ बाळगण्याची त्याला परवानगी नाही. ह्याशिवाय युकेच्या अधिकाऱ्यांशी त्याने सतत संपर्कात राहणे व स्वतःचा फोन सतत सुरु ठेवणे त्याला अनिवार्य आहे.

इतके सगळे करून सुद्धा त्याला भारतात आणणे व त्याला शिक्षा होऊन त्याच्याकडून सगळी रक्कम वसूल होणे हे शक्य आहे आहे का आणि जरी शिक्षा झाली तरी ती अमलात येईल का हे तो वरचा देवच जाणे!

vijay-mallya-marathipizza05
huffingtonpost.in

तोवर मात्र हे मद्यसम्राट मात्र ‘live life king size’ म्हणत आपली मौजमजा सुरु ठेवणार हे नक्की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *