‘ह्या’ व्यक्तीने चक्क दोन वेळा आयफेल टॉवर विकले होते

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतात ताजमहाल विकणाऱ्या मिथिलेश श्रीवास्तव उर्फ नटवरलाल याला आपण सर्वच जाणतो. असाच एक ठग २०व्या शतकात देखील होऊन गेला ज्याने संपूर्ण जगामध्ये ठगीचे असे असे कारनामे केले, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, तो म्हणजे विक्टर लस्टिंग.

InMarathi Android App

 

victor-lustig-inmarathi01

विक्टर याला अनेक भाषांचे ज्ञान होते, तशीच त्याची पर्सनालिटी देखील खूप आकर्षक होती. त्याच्या याच प्रतिभेमुळे त्याने अनेक पर्यटक आणि व्यावसायिकांना चुना लावला होता. विक्टरने एक नाही तर दोन वेळा आयफेल टॉवर  विकून जगाला आश्चर्यचकित करून सोडले.
विक्टर लस्टिंग हा लहानपणीपासूनच स्मार्ट ट्रिक करायचा. कधी ताश च्या पत्त्यांनी कारनामे दाखवणे तर कधी दुसऱ्या ट्रिकने लोकांना मूर्ख बनवणे हेच त्याचं काम होतं. तरुण झाल्यावर हीच ट्रिक त्याच्या अवैध कमाईच साधन बनली.

 

victor-lustig-inmarathi02

विक्टर याची ४५ बोगस नावे होती, हे एकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार. याच नावांच्या जोरावर तो लोकांना ठगायचा. तुरुंगात त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, तो १८४० साली ऑस्ट्रिया-हंगेरीच्या हॉस्टीन शहरात जन्माला होता. जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला तेव्हा कळाले की, तिथल्या शाळेच्या रेकॉर्ड्समध्ये विक्टर लस्टिंग नावाच कोणी आहेच आहे. हे एकूण पोलिसांना देखील आश्चर्य झाले.

 

victor-lustig-inmarathi

जेव्हाकी विक्टर लोकांना सांगायचा की, त्याचे वडील हे एका मोठ्या शहरातील मेयर आहे, तरी कधी सांगायचा त्याचे वडील व्यावसायिक आहेत. पण विक्टरला ओळखणारे लोकं सांगतात की, त्याचे आई-वडील खूप गरीब होते.

===
===

 

victor-lustig-inmarathi05

 

लहान-मोठ्या फसवेगिरीला कंटाळलेल्या विक्टरने काही तरी मोठं करण्याचा निर्णय घेतला. १९२५ साली पॅरीसच्या  आयफेल टॉवर  येथे दुरुस्तीचे काम चालले होते आणि एका वर्तमानपत्रात यासंबंधी बातमी आली होती. ही विक्टर करिता मोठी संधी होती. विक्टरने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने आयफेल टॉवरची नकली कागदपत्रे बनवली. त्यानंतर स्वतः एक मोठा फ्रान्सीसी अधिकारी बनून कित्येक मोठ्या व्यावसायिकांना ‘हॉटेल दि क्रिलॉन’ येथे बोलावले, जो त्याकाळातील सर्वात महाग हॉटेल्स पैकी एक होता.

 

victor-lustig-inmarathi03

 

या मिटिंगमध्ये विक्टरने त्या व्यावसायिकांना म्हटले की, ‘ही एक सरकारी मिटिंग आहे आणि सरकार आता आयफेल टॉवरच्या दुरुस्तीवर आणखी खर्च करू शकत नाहीये. म्हणून आयफेल टॉवरला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याकरिता याच्या करारासाठी तुम्ही बिड करू शकता.’ विक्टर एवढा चलाख होता की, त्याने अगदी खरं वाटेल अश्या शैलीत हे देखील सांगितले की, या मिटिंग बद्दल बाहेर कुठेही वाच्यता करू नका, कदाचित आयफेल टॉवरच विकलं जाणं लोकांना आवडणार नाही.

===
===

या मिटिंग दरम्यान त्याने कोणाला ठगायचं हे ठरवलं होतं. काही दिवसांनी त्याने एका व्यावसायिकाला फोन केला की, तो बिड जिंकला आहे पण कॉन्ट्रेक्ट मिळविण्यासाठी त्याला लाच द्यावी लागेल, असेही सांगितले. तो व्यावसायिक आता विक्टरचा निशाणा बनला होता. बिड आणि लाच या दोन्हीचे पैसे घेऊन विक्टर फरार झाला.

 

victor-lustig-inmarathi04

एका अमेरिकी नागरिकाला विक्टरने नोट छापण्याच्या मशीनच्या नावावर फसवले होते. विक्टरने एक लाकडाचा बॉक्स दाखवून सांगितले की, या मशिनमध्ये रेडियमच्या सहाय्याने १०० डॉलरचे नोट छापले जाऊ शकतात. त्या व्यक्तीने ही मशीन ३० हजार डॉलरमध्ये विक्टरकडून विकत घेतली, ज्यातून केवळ दोन १०० डॉलरच्या नोटा निघाल्या. जोपर्यंत त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे कळाले तोपर्यंत तर विक्टर कुठल्या कुठे निघून गेला होता.

 

victor-lustig-inmarathi

विक्टरने एकदा नाही तर दोनदा  आयफेल टॉवरला विकले होते. दुसऱ्यांदा त्याने एका फ्रेंच व्यावसायिकाला आयफेल टॉवर विकला. पण यावेळी ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली होती. १९३४ मध्ये नकली करन्सी सोबत विक्टरला एफबीआयने अटक केली. ट्रायलच्या एका दिवसाआधी चादरीला दोरी बनवून तो पसार झाला.

 

victor-lustig-inmarathi06

पण तुरुंगातून पळाल्याच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आणि १९४७ साली आजारपणामुळे तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. एवढ्या मोठ-मोठ्या फसवणुकी करूनही त्याच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये तो एक ‘अप्रेंटिस सेल्समैन’ होता म्हणून नोंदविले गेले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *