पुरुषांच्या नाजूक समस्यांवर जालीम उपाय ठरलेल्या वियाग्राच्या अपघाती जन्माची कहाणी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या रोजच्या वापरामध्ये असलेल्या काही गोष्टींचा शोध अचानकपणे लागलेला आहे. त्याच्यासाठी वेगळे संशोधन करण्याची गरज भासली नाही. तुमच्यातील काही लोकांचे आवडते पेय असलेल्या कोका-कोलाचा शोध देखील अचानकपणे लागला होता.

असेच काहीसे वियाग्राबद्दल आहे. वियाग्राचा शोध पण अचानकपणे लागला होता.

आपल्या साथीदारासोबत जास्तवेळ घालवण्यासाठी हा वियाग्रा पुरुषांना मदत करतो. आज आपण याच वियाग्राच्या शोधाबद्दल जाणून घेणार आहोत.

 

Vaigra.Inmarathi
medexpress.co.uk

१९८९ मध्ये इंग्लंडच्या केंटमधील फाइजरच्या एका रिसर्च सेंटरमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाचा झटका या आजारांवर उपचार करण्यासाठी नवीन औषधाचे संशोधन करण्यात येत होते. त्यासाठी सिल्डनफिल (यू के ९२४८०) नावाचे एक औषध तयार करण्यात आले आणि त्यानंतर पुरुषांच्या एका गटावर त्याची चाचणी करण्यात आली.

पण दुर्दैवाने याचा काहीच उपयोग उच्च रक्तदाब कमी करण्यामध्ये आणि हृदयाचा विकार कमी करण्यामध्ये झाला नाही. ज्यांच्यावर यांचा प्रयोग करण्यात आला होता, त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नव्हती.

तथापि, हा प्रकल्प बंद करण्यात आला. पण तेव्हाच याचा एक दुष्परिणाम झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. या क्लिनिकल चाचण्या करण्यात आलेल्या पुरुषांना काही वेगळाच अनुभव आला. त्यांच्या पोटावर तेथील नर्सना काहीतरी विचित्र आढळले. त्या प्रयोगामुळे त्या पुरुषांच्या शरीरात असे काही बदल झाले होते की, नर्सना ते सांगण्याची देखील लाज वाटत होती.

सिल्डनफिल्डमुळे त्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठपणा आला होता आणि त्यातील रक्तदाब वाढला होता. पण हृदयावर त्याचा काही परिणाम झाला नाही.

 

Viagra.Inmarathi1
thehealthsite.com

हा एक वेगळाच शोध होता जो आजवर कुणालाही माहित नव्हता. याकडे फाइजरने दुर्लक्ष करण्याची चूक केली नाही. फार्मासिटीकल कंपनीने याच्या झालेल्या परिणामाचे संशोधन घेण्यासाठी या औषधाची चाचणी घेणे सुरू केली.

त्यानंतर पुढील ३ वर्षाच्या कालावधीत म्हणजेच १९९३ ते १९९६ या कालावधीमध्ये त्यांनी याच्या एकूण २१ चाचण्या ३ हजार वेगवेगळ्या वयोगटातील लोकांवर केल्या. हे सर्व रुग्ण हे १९ ते ८७ या वयोगटातील होते.

काही जणांना वियाग्रा घेण्याचा सल्ला देण्यात आला, तर काही जणांना प्लेस्बो गोळ्या देण्यात आल्या. ज्यामुळे त्यांना रोगींची आणि त्यांचे डॉक्टर आणि नर्सकडून योग्य माहिती मिळाली.

सर्व चाचण्यांनी एकच परिणाम दर्शवला. वियाग्राचा खूपच चांगला फायदा लिंगामध्ये ताठपणा आणण्यासाठी झाला. आता ते जगासमोर आणण्याची वेळ आली होती.

 

viagra-inmarathi
manchestereveningnews.co.uk

हे औषध कशाप्रकारे काम करते.

हे औषध निर्माण करण्यामागे मूळ तत्व हे होते की, नाइट्रिक ऑक्साईडच्या सहाय्याने हृदयाच्या स्नायुंना रक्तपुरवठा वाढवणे. रासायनिक नायट्रिक ऑक्साईड हे शरीरातील मऊ स्नायूंवर काम करते.

शरीरातील जे स्नायू मऊ आहेत, त्यांच्यामधून जास्त रक्त वाहते आणि त्यामुळे लैंगिक उत्तेजना शरीरामध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होते. जनुकीय पेशींच्या मदतीने रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे लिंगामध्ये ताठपणा निर्माण होतो आणि हा ताठपणा खूपवेळ तसाच राहतो. शीघ्रपतनावर हे एक चांगले औषध होते.

 

Viagra.Inmarathi2
mycanadianpharmacyrx.com

सिल्डनफिल हा बाहेरून नायट्रिक ऑक्साईड वाढवण्याचे काम करतो आणि हृदयाच्या सहाय्याने लैंगिक स्नायू प्रभावित करतात. अश्याप्रकारे वियाग्राचा जन्म झाला.

सर्व औषधांप्रमाणेच सिल्डनफिल्डमध्ये देखील यामध्ये पण काही दुष्परिणाम आहेत. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने विचित्र डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणे, अश्या समस्या उद्भवतात. प्लेबॉय किंग ह्यू हेफरर हा वियाग्राच्या अतिसेवनामुळे एका कानाने बहिरा झाला आहे.

या अनेक चाचण्यांबरोबरच फाइजर त्या शतकातील सर्वोत्तम अचानकपणे लागलेल्या शोधासह तयार होता. १९९६ मध्ये कंपनीला या जादुई औषधाचे पेटंट मिळाले आणि १९९७ मध्ये फूड आणि ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या परवान्यासाठी यूएसमध्ये अप्लाय केले होते.

हा परवाना प्राथमिकतेनुसार मंजूर करण्यात आला आहे आणि २७ मार्च १९९८ रोजी वियाग्रा अधिकृतपणे लाँच करण्यात आला. याच्या  पहिल्या  ट्रीटमेंटसाठी सर्वजण उत्सुक होते.

 

Viagra.Inmarathi3
edmedscomparison.com

पीटर डन आणि अल्बर्ट वुड या दोघांनी फाइजरमध्ये यावर काम केले होते. त्यांना आणि त्यांच्या टीमला या आश्चर्यकारक औषधाचे म्हणजे वियाग्राचे संशोधक म्हणून श्रेय दिले जाते.

वियाग्रा बाजारात पोहोचल्यावर त्याची विक्री खूप झटपट झाली. सुरुवातीच्या ३ महिन्यांच्या आत डॉक्टरांनी जवळपास ३० लाख लोकांना वियाग्राची घेण्यास सांगितले होते. फक्त दोन वर्षामधेच वियाग्राची वार्षिक विक्री १ बिलियन डॉलर म्हणजे जवळपास ६०० कोटी एवढी झाली. २००८ पर्यंत जवळपास साडेतीन कोटीपेक्षा जास्त पुरुषांनी वियाग्राचा वापर केला होता.

वियाग्रा म्हणून ओळखली जाणारी ही निळी गोळी वेगळीच होती. शीघ्रपतनाला त्रासलेल्या लोकांच्या देखील हा वियाग्रा चांगलाच पसंतीस पडत होता. विशेषतः वृद्धत्वामुळे त्या क्षणांवर होणाऱ्या परिणामांवर हे खूप चांगले औषध होते. युवकांना पुन्हा चांगले सुख प्राप्त करून देण्याचे काम ही गोळी करत असे. बाजारामध्ये या वियाग्राच्या संस्कृतीला प्रचंड पसंती मिळाली.

 

mens-Viagra-inmarathi01
mensxp.com

वियाग्राची विक्री रेडीओ आणि टेलिव्हिजन जाहिरातींमार्फत करण्यात येत होती. खूपच कमी वेळा त्याची विक्री प्रिस्क्रिप्शनने होत होती. राजकारणी आणि क्रीडापटूंसह मोठमोठ्या लोकांनी या औषधाला प्रोत्साहन दिले. ब्राझिलियन सॉकर स्टार पेले याने शीघ्रपतनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वियाग्राच्या जाहिरातींमध्ये काम केले.

असा हा वियाग्रापुरुषांच्या आजही पसंतीस पडत आहे, पण आपण हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, या वियाग्राचे जास्त सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याचे सेवन करताना सावधानता नक्कीच बाळगा आणि आपल्या जोडीदाराचा देखील विचार करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?