जेव्हा नवाज शरीफ कबूल करतात : “आता अटलजी पाकिस्तानातसुद्धा निवडून येऊ शकतील”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अटलजी आज आपल्यात नाहीत. ते जेंव्हा भारताचे ‘पंतप्रधान’ होते त्यावेळी त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी देशासाठी केल्या, काही देशासाठी मिळवल्या. एक अतिशय मोठी गोष्ट म्हणजे, अटलजींनी मिळवलेले लोकांचे प्रेम.

भारतीयांचे तर प्रेम मिळवलेच पण पाकिस्तानी लोकांचेही प्रेम मिळवले. त्याचे मुख्य कारण एका गोष्टीत दडलेय..आज आम्ही ती घटना तुम्हाला सांगणार आहोत.

फाळणीच्यावेळी पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेल्या लोकांचे सगे-सोयरे, काहींचे नातेवाईक, काहींचे मित्र परिवार पाकिस्तानमध्येच होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भेटणे फाळणीनंतर शक्य होणार नव्हते.

ही नाती संबंध खूप वर्षांची होती, त्यामुळे नात्यातली ओढ कायम होती. प्रत्येक जण फाळणीमुळे आपल्या जवळच्या नात्याला पारखा झाला होता.

 

India-pak-separation-inmarathi
political-king.com

काही हिंदूंचे नातेवाईक तिकडे शेतीवाडी असल्याने अडकले होते, काही पंजाबी आपल्या वडील मंडळींना तिकडेच सोडून आले होते. मुस्लिमही आपल्या जवळच्या काही तिकडेच स्थायिक असलेल्या नातेवाईकांना पारखे झाले.

प्रत्येकाच्या मनावर फाळणीमुळे मोठा आघात झाला होता. काहींच्या मनात मोठा राग होता तर, काही दु:खी झाले होते.

१९४६ ते १९९८, अशी अनेक वर्षे लोटली .
पाकिस्तानने भारताशी पूर्ण शत्रुत्व घेतले होते.अनेक वेळा भारत पाकिस्तान वेगवेगळ्या कारणांमुळे भांडले. अनेक छोट्या-मोठ्या लढाया झाल्या, एकेकाळचे जिवलग एकमेकांचे शत्रू झाले होते. दोन्हीकडे शत्रुत्वाची आग वाढतच गेली.

अनेक चर्चा ,सामंजस्याची बोलणी फोल ठरली. अनेकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.पाकिस्तान सतत कुरापती काढत राहिला आणि हा दुरावा वाढतच गेला. अनेक दडपणे पाकिस्तानकडून आणली गेली.

संबंध सुधारणे लांबच राहिले. पाकिस्तानने भारतीयांच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. युद्धे भडकवण्याचा प्रयत्नही पाकिस्तानकडून झाला पण, सगळे प्रयत्न भारताने हाणून पाडले.

यादरम्यान दोन्ही देशातल्या अनेक निवडणुका झाल्या. पाकिस्तानात वेगवेगळे पंतप्रधान निवडून आले आणि प्रत्येकाने भारताबरोबर काश्मीर प्रश्नावरून संबंध सुधारण्या ऐवजी आणखीच बिघडवले.

भारतामध्येही पंतप्रधान बदलले, पण प्रत्येकाने संबंध जुळवण्याचाच प्रयत्न केला. पाकिस्तानने फक्त काश्मीर मिळवण्यासाठी सतत कुरापती चालू ठेवल्या.

१९९८-९९ मध्ये भारतात वेगळ्या पक्षाचे सरकार निवडून आले आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. वेगळा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी चे सरकार आले.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध राखण्याच्या आणि देशात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एक योजना तयार केली.ही योजना भारत – पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी होती.

 

atalji-inmarathi
deccan-chronicle.com

त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान होते नवाज शरीफ. त्यांच्याशी ह्या योजनेची सुरुवातीची बोलणी अटलजींनी केली आणि योजना कार्यान्वित आणण्यासाठी तयारी सुरू केली.

काय होती ही अटल बिहारी वाजपेयी यांची योजना?

भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांना सहजपणे आपल्या नातेवाईकांना भेटता यावे, चांगल्या विचारांची देवाण घेवाण व्हावी. भारतातील सौंदर्यस्थळे पाकिस्तानमधल्या लोकांना पाहता यावीत, धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात.

भारत-पाकिस्तान अशी दळण-वळण सेवा सुरू करण्याचा या योजनेचा उद्देश होता. सतत लोकांची ये जा चालू राहिल्याने तणाव कमी होऊन, दोन्ही देशातील राजकीय आणि सामाजिक संबंध सुधारतील ही सद् भावना या योजनेमागे होती.

ही योजना घोषित होताच अनेक लोकांनी त्या योजनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. होकार मिळाला , आणि १९ फेब्रुवारी १९९९ रोजी ही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाली. स्वतः पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी ह्या योजनेची सूत्रं आपल्या हाती घेतली.

भारतातले अनेक नामवंत पत्रकार ह्यात सहभागी झाले. अनेक पाकिस्तानला भेट देण्यास उत्सुक असलेले लोक पुढे आले. सिने कलावंत देव आनंद स्वतः ह्यात सहभागी झाले. जावेद अख्तर सारखी नामवंत मंडळी अटलजींच्या ह्या योजनेसाठी त्यांना साथ देण्यासाठी जातीने हजार झाले.

हा मोठा लवाजमा घेऊन स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांनी नवी दिल्ली ते लाहोर ही दोन देशांना जोडणारी बस सेवा सुरू केली.

पहिल्या उद्घाटनाच्या या प्रवासात हे सगळे नामवंत भारतीय लोक अटलजींसोबत प्रवासाला निघाले. अतिशय उत्साहात फुलांनी सजवलेल्या बसमधून ही सगळी मंडळी पाकिस्तानला निघाली.

 

vajpayee-delhi-lahore-bus-inmarathi
kashmirobserver.com

पाकिस्तानमध्येही उत्साहाने ह्या बसच्या स्वागताची तयारी झाली. अनेक वर्षांनी सगळे नाते संबंधी एक मेकांना भेटणार होते, आणि ह्या भारतीय पाहुण्यांचे स्वागत करणार होते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ.

बस दुपारी वाघा बॉर्डरवर पोचली आणि मोठ्या प्रमाणावर बसचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सगळे वातावरण टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून निघाले. काही विरोधकांनी ह्या योजनेचा कडाडून विरोध केला. पण त्या उत्साहात तो विरोध मावळून गेला.

वाघा बॉर्डर ओलांडून बस पाकिस्तानमध्ये शिरली. बसमधल्या भारतीयांच्या मनात थोडे भीतीचे विचारही चमकून गेले. पण बस लाहोरला पोचताच ही सगळी भीती निघून गेली, कारण समोर पाकिस्तानी पंतप्रधान ह्यांच्या स्वागतासाठी उभे होते.

आनंदाने सगळ्यांचे स्वागत झाले. अतिशय उत्साहात लोकांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेतल्या. आनंदित झाले. दोन्ही पंतप्रधान एकमेकांना भेटले.

 

vajpeyee-nawazsharif-inmarathi
dailyhunt.com

नवाज शरीफ यांनी सगळ्यांचे स्वागत केले. एकमेकांबरोबर मोकळेपणाने बोलणे झाले. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवाझ शरीफ आपल्या स्वागतपर भाषणात उत्साहाने बोलले आणि भारत पाकिस्तानमधील राजकीय आणि सामाजिक संबंध सुधारणाऱ्या या योजनेला मान्यता दिली. दोन्हीकडचे लोक अतिशय आनंदी झाले.

भारतीय पंतप्रधानांची प्रशंसा केली गेली. एक उत्साहाची लाटच निर्माण झाली. या उत्साहात बोलताना पाकिस्तान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बोलता बोलता कबुल केलं की,

जर आत्ता अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानात निवडणुकीसाठी उभे राहिले तर सहज निवडून येतील. फक्त भारतातच नव्हे तर, पाकिस्तानात सुद्धा ते आज इतके लोकप्रिय झाले आहेत.

ही एक अटलजींनी मिळवलेली सगळ्यात मोठी ठेव म्हणता येईल. त्यांनी सगळ्या प्रकारे लोकांचे प्रेम मिळवले.त्यातली ही मोठी मिळकत होती.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?