छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना मोहिनी पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या युद्धनीती पासून रयतेसाठी न्यायी “स्वराज्य” यंत्रणा उभारण्यापर्यंत प्रत्येक कृत्याचा जगभरात बारकाईने अभ्यास केला जातो.

छत्रपतींनी तसाच ठसा उमटवला आहे आपल्या कर्तृत्वाने!

 

shivaji maharaj-inmarath
marathiexpress.com

पण असे हे आपले छत्रपती…खरंच कसे दिसायचे बरं?

हा प्रश्न कित्येक दशके सर्वांना पडला होता. आणि त्यावर खात्रीलायक उत्तर मिळालं एका निस्पृह अभ्यासकाच्या मेहनतीमुळे…!

त्याचीच ही कथा…!

 

 

shivaji-maharaj-inmarathi
महाराजांच्या उपलब्ध चित्रांपैकी ब्रिटिश संग्रहालयात असणारं हे चित्र आहे.

फ्रान्सच्या पॅरिस मध्ये असणाऱ्या या चित्रमागची कथा अशी – Niccolao Manucci नावाचा एक इटालियन प्रवासी Venice हुन आपल्याकडे आला. त्याने मुघलांच्या दरबारात असलेल्या चित्रकाराकडून (त्याचं नाव मीर मुहम्मद) जवळजवळ ५२ चित्र काढून घेतली.

त्यासाठी त्याला भरपूर पैसे दिले.

पण ती चित्र ही कल्पना करून काढलेली होती. त्यात शायिस्तेखानाच्या आणि महाराजांच्या चित्रात थोडा फार फरक! अशा प्रतीचं ते चित्र होतं.

Venice च्या Senate ने ते (Manucci ने लिहिलेल्या manuscript सोबत) publish करावं अशी त्याची इच्छा होती.

पण त्याआधीच नेपोलियनने Venice ला असलेलं सगळं लुटून त्याच्यासोबत नेलं, त्यात manuscript मात्र नव्हती. पुढे तेच चित्र पॅरिसच्या Musée Guimet येथे ठेवण्यात आलं!

वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधून काढलेल्या चित्राची खासियत अशी की ते “रेखाचित्र” हे त्या आर्टिस्ट ने प्रत्यक्ष महाराजांना बघून काढलेलं होतं!

महाराजांनी सुरत १६६४ आणि १६७० अशी दोन वेळा लुटली. त्यापैकी १६६४ सालच्या स्वारीच्या वेळी सुरतेला डच आरमार होतं. डच लोकांना एक सवय होती, ते महत्त्वाच्या व्यक्तींचं चित्र काढून घ्यायचे. त्यावेळी तिथे वॅलेंटाईन नावाचा गव्हर्नर होता. त्याने महाराजांचं वर्णन सुद्धा करून ठेवलेलं आहे.

ते वर्णन आणि चित्रातले महाराज अगदी तंतोतंत जुळतात.

बारीक मिशी, चेहऱ्यावरचं स्मितहास्य, धारदार नाक असं सगळं आपल्याला त्या चित्रात दिसून येतं. साधारणपणे १९४०च्या सुमारास बेंद्रे हेगला गेले. तिथे त्यांनी हे चित्र शोधून काढलं आणि ते आपल्याकडे घेऊन आले.

त्यांनी १९७२ साली शिवचरित्र दोन volumes मध्ये प्रकाशित केलं. त्यात हे चित्र छापलेलं आहे.

हे जगातलं महाराजांचं पहिलं असं चित्र आहे की जे चित्रावरून काढलेलं नाही, महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेलं आहे! हे बेंद्र्यांचं एक मोठं काँट्रीब्युशन आहे.

बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्या जगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे.

तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा, शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांची जी ईंदापूरला समाधी आहे ती बेंद्र्यांनीच शोधून काढली आहे.

ती जेव्हा त्यांनी शोधून काढली तेव्हा तिचा दर्गा झाला होता. इतकच नव्हे तर कोरेगावला भीमा नदीच्या काठी जी संभाजी महाराजांची समाधी आहे तिचा शोधदेखील बेंद्र्यांनीच लावला आहे. केवढं मोठं हे त्यांचं योगदान होतं याचा विचार करा.

 

sambhaji-maharaj-samadhi

 

संभाजी महाराजांचं जे चरित्र बखरींमधून रंगवण्यात आलंय ते सुधारण्याचं कामसुद्धा बेंद्र्यांनी केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांना गुरुस्थानी मानतात. त्यांनी ईंग्रजीतूनदेखील पुस्तके लिहिली. संत तुकारामांची “मंत्रगीता” सुद्धा त्यांनी संपादित केली.

“साधन चिकित्सा” नावाचा त्यांचा ग्रंथ हा इतिहास संशोधकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचं एवढं मोठं योगदान असूनही स्वातंत्र्यानंतरसुद्धा त्यांना हवा तसा मानसन्मान आणि ओळख मिळाली नाही.

 

 

शिवचरित्र लिहून काढण्यामागे यशवंतराव चव्हाण यांचा आग्रह हे प्रमुख कारण आहे असं स्वत: बेंद्र्यांचं म्हणणं होतं. शिवकाळाचा अभ्यास करण्यात ३० – ४० वर्षे खर्च करून देखील केलेले संशोधन हे लोकांपुढे येऊ शकले नाही याची खंत बेंद्र्यांना होती.

त्यांनी तुकारामांचं चरित्र प्रकाशित करण्यासाठी चव्हाणांना संपर्क केला. जेव्हा यशवंतरावांना कळलं कि ह्या माणसाने शिवकाळाचा इतका सखोल अभ्यास केलाय तेव्हा त्यांनी आधी शिवचरित्र लिहून पूर्ण करा असा तगादा त्यांच्यामागे लावला.

जवळजवळ अडीच तास त्यांची समजूत काढल्यानंतर बेंद्रे तयार झाले. महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार त्यांनी केले. असं म्हणण्याचं कारण असं की, त्याआधी ज्या काही १६ बखरी reference म्हणून इतिहासकार वापरत होते त्या फार विश्वासार्ह नव्हत्या.

 

 

हे कुण्या सामान्य माणसालाही लक्षात येईल. बेंद्र्यांनी डच, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या दप्तरात उपलब्ध असलेली कागदपत्र शिवाय
निजामशाही, कुतुबशाही, तुर्क यांचे records या सर्वांचा सखोल अभ्यास करून शिवचरित्र पूर्ण केलं. इतिहासाचे लेखन कसे करतात याचा नवीन पायंडा त्यांनी पडून दिला.

महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा काहीतरी भलतीच करून जातीपातीत फूट पाडून काहीही पुरावे, संदर्भ न देता इतिहासावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांच्या आजच्या काळात वा.सि. बेंद्रे यांच्यासारख्या ऋषितुल्य इतिहासकाराचे आपण ऋणी असलं पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…!

  • June 23, 2019 at 9:02 am
    Permalink

    खूपच कमी लोकांना माहीत असलेल्या अशा गोष्टी बद्दल तुम्ही माहिती देतात. त्याबद्दल तुमचे आभार.

    आणि अशीच माहीती आम्हाला देत चला.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?