उशीवर डोके ठेवून झोपणे चांगले की वाईट? शास्त्रीय उत्तर वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी तेवढीच महत्वाची आहे जेवढे आरोग्यदायी इतर घटक. पुरेपूर झोप न मिळाल्यास आपल्याला मनस्ताप होतो.

एका दिवसामध्ये किमान ६ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे असे अनेक आरोग्यतज्ञ सांगतात.

झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. मग उशी घेऊन झोपणे हे चांगले की वाईट, याबद्दल संशोधन काय सांगत ते आज आपण जाणून घेणार आहोत…

 

pillow.marathipizza
amazon.com

प्राचीन काळात झोपलेले असताना किडे नाका, कानात किंवा तोंडामध्ये जाऊ नये म्हणून दगड, लाकूड यांचा वापर उशीप्रमाणे केला जात होता.

त्यानंतर पडद्याच्या आवृत्यांमधील जेड, बांबू यांचा वापर उशी म्हणून करण्यात आला. पण आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उश्या बाजारात पाहायला मिळतात.

सध्याच्या काळामध्ये आपल्याला या उशांचा विविध प्रकारे फायदा मिळतो.

उशीचा पहिला प्रकार : पातळ उशी

जे लोक पाठ टेकून झोपतात, त्यांच्यासाठी या प्रकारची उशी खूप फायद्याची असते. या प्रकारची उशी तुमचे डोके एका जागी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते.

उशीचा दुसरा प्रकार : टणक आणि जड उशी

कुशीवर झोपणाऱ्या लोकांनी या उशीचा वापर केला पाहिजे. कारण विशेषतः खांदा आणि कान यांच्यामधील अंतर भरून काढण्यासाठी खासकरून या उशीला डिझाईन केलेले असते.

pillow.marathipizza1
relaxtheback.com

उशीचा तिसरा प्रकार : पातळ आणि सरळ उशी

जे लोक पोटावर झोपतात, त्यांच्यासाठी ही उशी उपयोगी असते.

काही पोटावर झोपणारे लोक उशी त्यांच्या डोक्याखाली न घेता पोटाखाली घेतात. त्यामुळे असे झोपणाऱ्या लोकांसाठी ही उशी चांगली आहे, कारण ही उशी त्यांच्या पाठीला आराम देते.

उशीचा चौथा प्रकार : मानेची उशी

या प्रकारची उशी तुमच्या मानेला आधार देण्यास मदत करते.

तसेच, उशी न घेता झोपण्याचे देखील असेचं काही फायदे आहेत.

१. काही लोकांचा असा समज आहे की, उशी न घेता झोपल्यास चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. तसेच इतरही अनेक चेहऱ्याचे फायदे उशी न घेतल्याने होतात.

२. झोपताना उशी न घेतल्यास तुम्ही एकदम सरळ रेषेमध्ये झोपता आणि त्यामुळे तुमचा पाठीचा कणा स्थिर राहतो आणि त्यामुळे तुम्ही झोपेत असताना देखील तुमच्या पाठीचा काणा विस्थापित करू शकता.

 

pillow.marathipizza
doctoroz.com

३. मान आणि खांद्याच्या साधारण वेदना कमी करण्यासाठी आणि त्यांची सारखी होणारी दुखणे टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे उशी न घेता झोपणे.

४. असे मानले जाते की, उशी न घेता झोपल्यास हाडांची रचना सरळ आणि सामान्य बनण्यास मदत होते. तसेच, उशी न घेता झोपल्यास कुबड येणे या विषयी काही समस्या असल्यास कमी होते.

अश्या या उशीचे काही फायदे देखील आहेत आणि तोटे देखील आहेत. आता तुम्हीच ठरवा की, झोपताना उशी घ्यायची की नाही ते…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?