F1 ते F12 या Functional Keys चा वापर तुम्हाला माहित आहे का…?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आज जवळजवळ सर्वांनाच कम्प्युटर आणि लॅपटॉप माहिती आहे. आजकाल प्रत्येक काम आपण याद्वारेच करतो. मग ते कुठल्या मोठ्या कंपनीतील काम असो किंवा एखाद्या छोट्याश्या दुकानातील अकाऊंटिंगच काम.

कम्प्युटरने आपले जीवन सोपे केले आहे. या यंत्राचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की-बोर्ड, ज्याद्वारे आपण हवं ते लिहू शकतो, करू शकतो.  पण की-बोर्ड हा काय फक्त लिहिण्याच्याच कामाचा आहे का …? तर नाही.

की-बोर्ड द्वारे आपण अनेक कामे हाताळू शकतो. तुम्ही बघितलं असेल या की-बोर्डवर F1 ते F12 अशी१२ बटणे असतात ज्यांना Functional Keys म्हणतात, पण आपल्याला या सर्व बटणांचा उपयोग काय हे माहितीये का…? कदाचित नाही… म्हणूनच आज आम्ही आपल्याला या १२ बटणांचा  खरा उपयोग काय हे सांगणार आहोत.


keyboard03-marathipiza

 

1. F1 – ही नेहमी हेल्प-की म्हणून वापरली जाते, जेव्हा आपण कम्प्युटर सुरू करतो, तेव्हा आपण ही की दाबल्यानंतर, आपण थेट कम्प्युटरच्या सेटअपमध्ये पोहचतो. जिथे आपण सेटिंग्ज तपासू शकतो तसेच हवे असल्यास त्या सेटिंग्समध्ये बदल करू शकतो.

2. F2 – ही की विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरली जाते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण या F-12 की ने त्या फाईलचा प्रिंट प्रीव्ह्यू पाहू शकता.

3. F3 – विंडोजमध्ये या की चा वापर करून आपण सर्च बॉक्स उघडू शकतो, ज्यामुळे कुठलीही फाईल अथवा फोल्डर आपण सर्च करू शकतो. या व्यतिरिक्त MS-DOS मध्ये ही की प्रेस केल्याने आधी दिलेली कमांड परत टाईप होते.

4. F4 –  माइक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करत असताना ही की प्रेस केल्याने आधी केलेलं काम रिपीट होत, जसे एखादा शब्द पहिले टाईप केलेला असेल तो परत टाईप होईल, तसेच जर एखादा शब्द बोल्ड किंवा अंडरलाईन केला असेल तर तो परत होऊन जाईल.


keyboard04-marathipizza
computerhope.com

 

5. F5 – या की चा उपयोग आपल्या सर्वांनाच माहित आहे, F-5 या की चा वापर मुख्यकरून कम्प्युटर रिफ्रेश करण्याकरिता केल्या जातो. याव्यतिरिक्त या की ला पावरपॉईंटमध्ये प्रेस केल्यास स्लाईड शो सुरु होतो.

6. F6 – ही की प्रेस केल्याने विंडोजमध्ये ओपन असलेल्या फोल्डर्सचे कन्टेन्ट दिसतात तसेच, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओपन असलेले वेगवेगळे डॉक्युमेंट्स एक-एक करून बघण्यासाठी Control+Shift+F6 यांचा उपयोग केला जातो. याव्यतिरिक्त काही लॅपटॉप्समध्ये स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी देखील या की चा उपयोग होतो.

7. F7 – मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या की  ला प्रेस केल्यावर आपण जे काही लिहितो त्याचं स्पेलिंग तसेच व्याकरण तपासलं जातं. Shift + F7 प्रेस केल्याने हायलायटेड केलेल्या शब्दाची शब्दकोश तपासणी केली जाते. याव्यतिरिक्त काही लॅपटॉप्समध्ये स्पीकरचा आवाज वाढविण्यासाठीही या की चा उपयोग होतो.


8. F8 – मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट ला सिलेक्ट करण्याकरिता या की चा उपयोग केला जातो.

9. F9 – मायक्रोसॉफ्ट आउटलूकमध्ये ई-मेल सेंड किंवा रिसिव्ह करण्याकरिता या की चा वापर होतो. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस कमी करता येते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंट्स रिफ्रेश करण्यासाठीही या की चा वापर होतो.

10. F10 – कुठल्याही  सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना या की ला प्रेस केल्याने मेन्यू ओपन होतो, तसेच Shift+F10 प्रेस केल्याने हे माउसच्या राईट क्लिकचं काम करत. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस वाढवता येते.

keyboard02-marathipizza
ivy-style.com

11. F11 – इंटरनेट ब्राउजर्समध्ये फुल स्क्रीन व्ह्यू करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.

12. F12 – मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ही की प्रेस केल्याने Savs As चे ऑप्शन ओपन होते, तसेच Shift+F12 प्रेस केल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह  होऊन जाते.

तर अश्याप्रकारे या की-बोर्डवरील Functional Keys चा उपयोग होत असतो, या Functional Keys कम्प्युटर किंवा लॅपटॉप हाताळत असताना आपले काम सुकर करण्यासाठी आहेत, त्यामुळे त्यांचा नेमका उपयोग आपल्याला माहिती असायला हवा जेणेकरून आपण आपले काम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात करू शकू…

 


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?