तिच्या हातच्या चहाचं अवघ्या ऑस्ट्रेलियाला याड लागलंय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


चहा म्हणजे आपल्या भारतीयांचा जीव कि प्राण! जग इकडचं तिकडे होवो पण जगाच्या कोणत्याही देशात गेलो तरी आपलं चहाचं प्रेम काही सुटणार नाही. जिथे जाऊ तिथे आपण चहाचा वारसा घेऊन जाऊ आणि तेथील लोकांना देखील चहाच वेड लावू इतकं आपलं चहा बनवण्यावर आणि त्याचा प्रसार करण्यावर प्रभुत्व आहे. अशीच काहीशी करामत करून दाखवली आहे एका भारतीय तरुणीने! तिने संपूर्ण ऑस्ट्रेलिया मध्ये चहाची अशी काही लहर निर्माण केली आहे की ऑस्ट्रेलियन माणसं अतिशय लांबून खास तिच्या हाताचा चहा पिण्यासाठी येतात.

upamma-virdi-marathipizza01
sambhaavnews.com

उप्पम्मा विर्दी असे या ‘चहावाली’चे नाव आहे. मूळची चंदीगढची असलेल्या विर्दीला काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका कार्यक्रमात २०१६ वर्षातील ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे २६ वर्षाच्या उप्पम्मा विर्दीची ओळख केवळ ‘चहावाली’ म्हणूनच नव्हे, तर एक कॉर्पोरेट वकील म्हणूनही आहे.

ऑस्ट्रेलियातील एका टेलिव्हीजनला चॅनेलला मुलाखतीसाठी बोलवले असताना, ती चक्क चहाच्या किटलीसोबत, ग्लास घेऊन पोहोचली. सुरुवातीला सर्वांना ती मस्करी करत असल्याचे वाटत होते. मात्र, या माध्यमातून तिने उपस्थितांना मसाला चहाविषयी माहिती दिली आणि भारतीयांचे त्यावर असणारे अजोड प्रेम देखील समजावून सांगितले.


upamma-virdi-marathipizza02
pagalparrot.com

गेल्या दोन वर्षांपासून तिचा चहाचा व्यवसाय सुरु असून ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आपले कॉर्पोरेट वकीलीचे कामही तिने सुरुच ठेवले आहे. लोकांच्या मते, मेहनत आणि सोशल मीडियावरील कॅम्पेनच्या प्रसिद्धीमुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

वास्तविक, विर्दीचे चहाबद्दलची आत्मियता ही पिढीजात वारशाने मिळाली आहे. विर्दीचे आजोबा आयुर्वेदीक डॉक्टर होते. ते मसाल्यांचे तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. तिच्या अजोबांकडून मिळालेला हा वारसा तिने जोपासला, अन् आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विर्दीच्या मते,


चहा हे दोन लोकांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे.

upamma-virdi-marathipizza03
jansatta.com

विर्दीने या कामाची सुरुवात केली, तेव्हा तिच्या कुटुंबियांकडूनही विरोध झाला. कारण, भारतात ‘चहावाला’ या शब्दाला कमी दर्जाची कामे करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते, असे ते मानत. विर्दी सांगते की,

माझ्या आई-वडिलांना याबद्दल आक्षेप होता. पण भारतातील प्रत्येक ‘चहावाला’ एखाद्या उद्योजकांप्रमाणेच आहे. कारण, त्यांच्यामध्येही एखाद्या कसलेल्या उद्योजकाचे गुण असतात.

upamma-virdi-marathipizza04
m.patrika.com

आणि याच विचाराने पुढे जात आज तिने चहाला थेट आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे आणि हलक्या दर्जाचे काम म्हणून ज्याला हिणवले जात असे त्या चहाच्या धंद्याला थेट उद्योजकीय वलय प्राप्त करून दिले आहे, तिच्या या मेहनतीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?