जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’!

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

इंग्रजांनी जेवढे वर्षे भारतावर राज्य केले, आणि त्या काळात जितके अगणित अत्याचार केले त्यापैकी जालियानवाला बाग हत्याकांड ही घटना म्हणजे इंग्रजांच्या निर्दयीपणाचा कळस आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळी घटना म्हणावी लागेल.

InMarathi Android App

बैसाखी सारख्या शुभ दिनी १३ एप्रिल १९१९ ला तब्बल २०,००० निरपराध भारतीय जालियानवाला बागमध्ये जमले होते. संध्याकाळी ५:३० वाजता जनरल डायरने या बागेचा एकमेव बाहेर जाण्याचा रस्ता बंद केला आणि बागेमध्ये जमलेल्या निष्पाप जीवांवर त्याने बेछुट गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यादिवशी तब्बल १५०० लोकांचा नरसंहार झाला. त्यात वृद्ध, लहान मुले आणि स्त्रिया देखील होत्या. ‘

jaliyanwala-baugh-marathipizza
www.pinterest.com

याच नरसंहारामध्ये उधम सिंग नावाचा एक २० वर्षीय अनाथ तरुण देखील होता. जो कसाबसा स्वत:चा बचाव करत या हत्याकांडातून जिवंत बाहेर पडला. पण त्याच दिवशी त्या मुलांच्या मनात बदल्याचा वणवा पेटला. आपल्याच बांधवांचे रक्ताने माखलेली शरीरे पाहून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता. त्याच दिवशी त्याने ठरवले, “या कृत्याचा बदला घ्यायचा, मग त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर”

===
===

उधम सिंगांचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पटियाला मधील सुनम येथे झाला. त्यांचे जन्म नाव शेर सिंग असे होते. त्यांना एक मोठा भाऊ देखील होता. अवघ्या ७ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून आई बापाचे छत्र हरवले. त्यानंतरचे जीवन त्यांनी केंद्रीय खालसा अनाथालयामध्ये व्यतीत केले. येथेच त्यांना नवीन नाव मिळाले ते म्हणजे ‘उधम सिंह’! १९१७ साली त्यांच्या वडील भावाचे देखील निधन झाले आणि उधम सिंग पूर्णपणे एकाकी पडले.

पुढे दोन वर्षांनी त्यांनी जालियानवाला बागेतील नरसंहार अनुभवला. त्याचा बदला घेणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले आणि येथूनच एक क्रांतिकारी म्हणून त्यांची वाटचाल सुरु झाली. पुढे अमेरिकेत जाऊन त्यांनी गदर पार्टीमध्ये प्रवेश घेतला. तेथील क्रांतिकारी वातावरणात त्यांना अधिकच स्फुरण चढले. तेथे त्यांनी कार्यकर्ता म्हणून अनेक लढयांमध्ये भाग घेतला.

udham-singh-marathipizza
http://www.sikh-history.com

१९२७ साली भगत सिंहानी त्यांना भारतात बोलावून घेतले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत २५ अन्य सहकाऱ्यांसोबत काही पिस्तुल घेऊन त्यांनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी अनधिकृतपणे शस्त्रे भारतात आणल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आणि सुमारे ५ वर्षांसाठी त्यांना तुरुंगात डांबले.

याच काळात जालियानवाला बागेत नरसंहार घडवून आणणारा जनरल डायर स्वर्गवासी झाला. जणू जनरल डायरची हत्या दैवाने उधम सिंगांच्या हातून होईल असे लिहिलेच नव्हते. तुरुंगातून सुटल्यावर ते सुनम या आपल्या मूळगावी परत आले. पण तेथे ब्रिटीश पोलीस त्यांना त्रास देऊ लागले. शेवटी कंटाळून ते अमृतसर येथे आले आणि तेथे ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ हे नाव धारण करून राहू लागले.

udham-singh-marathipizza01
http://www.shahidbhagatsingh.org

दिवसांमागून दिवस जात होते आणि क्रांतीचे विचार उधम सिंगाना स्वस्थ बसू देत नव्हते. पुढे ते काश्मीर आणि तेथून १९३० च्या आसपास इंग्लंड मध्ये गेले. अत्याचाऱ्यांच्या देशात जाऊनच आपला बदला पुर्ण करण्याचे त्यांनी मनोमन ठरवले होते. जालियनवाला बागेतील ती घटना रोज त्यांच्या डोळ्यासमोर तरळायची आणि ते दु:खी कष्टी व्हायचे. आपल्या बांधवांच्या हत्येचा बदला घेण्याची संधी ते शोधत होते. अखेर १३ मार्च १९४० रोजी ती संधी चालून आली.

त्या दिवशी Caxton Hall, London येथे इस्ट इंडिया कंपनीची एक सभा होती. त्यावेळी मायकल ओ डॉयर उपस्थित राहणार होता. जनरल डायर तर मेला होता, पण त्याच्या जागी मायकल ओ डॉयरला यमसदनी पाठवून त्या रक्तरंजित कृत्याची परतफेड करायची असे उधम सिंहानी ठरवले. कारण १९१९ साली म्हणजे जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा मायकल ओ डॉयर पंजाबचा जनरल होता. त्याने देखील जनरल डायरला पाठींबा दिला होता. म्हणजेच जनरल डायर प्रमाणे तो देखील या नरसंहाराला कारणीभूत होता.

michle-o'dwyer-marathipizza
http://www.npgprints.com

Caxton Hall, London मध्ये मायकल ओ डॉयर सभेला संबोधित करण्यासाठी उभा राहिला आणि सभेमध्ये बसलेल्या उधम सिंहानी आपल्या जॅकेटमधून शिताफीने पिस्तुल काढीत, सलग ५-६ गोळ्या मायकल ओ डॉयरवर झाडल्या आणि आपल्या बांधवांच्या नरसंहाराचा बदला घेतला.

हे कृत्य करून ते पळाले नाहीत. उलट हसत हसत त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले, कारण त्यांच्या आयुष्याचे ध्येय आता पूर्ण झाले होते. ज्या गोष्टीसाठी गेली कित्येक वर्षे ते आसुसलेले होते, त्या गोष्टीची त्यांनी स्वत:च्या हस्ते पूर्तता केली होती.

===
===
udham-singh-marathipizza02
www.r3dd.it

३१ जुलै १९४० रोजी इंग्लंडच्या Pentonville तुरुंगामध्ये क्रांतीकारी उधम सिंह यांना फाशी देण्यात आली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वेगळ्या पद्धतीने योगदान देणाऱ्या या क्रांतीकारकाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले.

udham-singh-marathipizza03
http://apnaorg.com

भारताच्या इतिहासातील एका अत्यंत दुर्दैवी घटनेच्या नराधमांना शिक्षा देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारा हा थोर क्रांतिकारी पंजाब प्रांत वगळता देशाच्या इतर जनतेसाठी अजूनही ‘अज्ञात’ आहे यांची खंत वाटते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’!

 • November 7, 2018 at 3:49 pm
  Permalink

  या लेखासमवेत उधमसिंग यांनी लंडन येथिल कोर्टात दिलेले आपले स्टेटमेःट द्यायला पाहिजे होते.ते वाचल्यावर उधमसिंग म्हणजे काय जबरदस्त व्यक्तीमत्व होते ते कळते.

  Reply
 • April 18, 2019 at 8:04 pm
  Permalink

  खूपच छान माहिती मिळाली.
  मी save करुन ठेवली आहे.
  धंन्यवाद.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *