इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल महत्वाच्या ज्ञात-अज्ञात गोष्टी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ज्याप्रमाणे ६ जून १९८४ हा शिखांच्या इतिहासामधील भयावह दिवस म्हणून ओळखला जातो, त्याच प्रमाणे त्याला कारणीभूत असलेले ऑपरेशन ब्लू स्टार स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी ऑपरेशन मानले जाते. या दिवशी नागरिकांच्या धार्मिक भावनांना छेद देण्यात आला, तर दुसरीकडे भारतीय सुरक्षा एजन्सीच्या मते फुटीरतावादी ताकदींशी लढण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.

 

operation-blue-star-marathipizza01
tribuneindia.com

ऑपरेशन ब्लू स्टार काय आहे?

अमृतसरमधील शीख धर्माचे सर्वात पवित्र मंदिर हरिमंदिर साहिबच्या (गोल्डन टेम्पल) परिसरामध्ये लपलेल्या विद्रोही खलिस्तान समर्थक जनरल सिंह भिंडरांवाले आणि त्यांच्या समर्थकांना जेरबंद करण्यासाठी भारतीय सैन्याद्वारे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान एक लष्करी मोहीम चालवण्यात आली होती, तेच ऑपरेशन ब्लू स्टार होय.


त्यावेळी पंजाबमधील फुटीरतावादी सेना भिंडारवालेच्या नेतृत्वाखाली सशक्त होत होती, ज्यांना पाकिस्तान मधून समर्थन मिळत होते. भिंडारवाले याने हरिमंदिर साहिब मंदिरामध्ये आपला डेरा टाकला होता. तेथून तो आपल्या विद्रोही कारवाया करत असे. याच देशविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी भारत सरकारने कठोर पाउले उचलण्याचे ठरवले.

ऑपरेशन ब्लू स्टारचा इतिहास

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशावरून, भारतीय सैन्याने शीख जहालमतवादी धार्मिक नेता, जनरल सिंह भिंडरांवाले आणि त्याच्या सशस्त्र अनुयायांना बाहेर काढण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये घुसखोरी केली. गेल्या दोन वर्षांमध्ये भिंडारवालेनी हरएक प्रकारे आपला विरोध सुरु ठेवला होता. त्याची इच्छा होती की,

भारत सरकारने आनंदपूरचा प्रस्ताव मंजूर करावा आणि शिखांसाठी एक वेगळे राज्य खलिस्तान तयार करण्यास परवानगी द्यावी.

१९८२ मध्ये हा विरोध अतीशय तीव्र झाला आणि सर्व खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या नेत्यांनी १९८३ च्या मध्यापर्यंत विस्फोटक पदार्थांसह मंदिराच्या परिसरामध्ये तळ ठोकला. जेव्हा भिंडरांवालेने मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसरामध्ये भक्कम तटबंदी निर्माण केली तेव्हा भिंडारवालेला बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधीनी भारतीय सेनेकडून सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.

 

operation-blue-star-marathipizza02
searchsikhism.com

गुरुद्वाराशी जोडल्या गेलेल्या शीख धर्मियांच्या भावना आणि सुरु असलेला गदारोळ पाहता तत्कालीन सैन्याचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के.सिन्हा यांनी या हल्ल्याविरूद्ध उत्तर देण्याचे ठरवले. त्यांनंतर लगेचच जनरल एस.के.सिन्हा यांचे ट्रान्सफर झाले आणि जनरल अरुण श्रीधर वैद्य यांना भारतीय सेनाचा चीफ म्हणून नियुक्त केले. ज्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची योजना आणि नेतृत्व सांभाळले.

भारतीय सैन्याने २ जूनच्या रात्री आक्रमण केले आणि ३ जूनला पंजाब राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सैन्याने मंदिरावर हल्ला केला, शिखांच्या धार्मिक स्थळाची नासधूस केली. ऑपरेशनचा परिणाम असा झाला की, भिंडरांवाले याचा यामध्ये मृत्यू झाला. सेना, नागरिक आणि फुटीरतावादी यांच्यामध्ये झालेले हे एक आकस्मिक युद्ध ठरले.

सुवर्ण मंदिरावर झालेल्या हल्ल्याची जगभरामधील शिखांनी टीका केली.  देशाच्या भल्यासाठी जरी हे पाउल उचलले असले तरी त्यामुळे त्याच देशातील शीख नागरिकांच्या मनावर मात्र कधीही भारता येणार नाही असा आघात झाला. त्यांचे परमपूज्य धार्मिक स्थळ नष्ट झाले, याचा विरोध म्हणून कित्येक शीख प्रशासकांनी राजीनामे सुद्धा दिले .

 

operation-blue-star-marathipizza03
outlookindia.com

ऑपरेशन ब्लू स्टार नंतरचे परिणाम

• ऑपरेशन ब्लू स्टारमुळे दुखावलेल्या शीख समाजामध्ये प्रतीशोधाची भावना निर्माण झाली. सूड घेण्याच्या द्वेषामध्ये अनेक लोक मारले गेले.

• ऑपरेशन ब्लू स्टार ज्यांच्या सांगण्यावरून झालं, त्या इंदिरा गांधींची दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्याचा परिणाम म्हणून दिल्लीध्ये शीख समाजाविरोधात दंगली उसळल्या.

• १३ वे सेना प्रमुख, जनरल ए.एस.वैद्य, ज्यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते, त्यांची सेवानिवृत्ती नंतर पुण्यामध्ये हत्या करण्यात आली  होती.

• टोरांटो-माँट्रियल-लंडन-दिल्ली असा मार्ग कापणारे एयर इंडियाचे विमान बॉम्बने उडवले गेले आणि त्यात दुर्दैवाने सर्वच्या सर्व ३२९ प्रवासी मारले गेले.

 

operation-blue-star-marathipizza04
etimg.com

एकूणच ऑपरेशन ब्लू स्टार भारतीय इतिहासात कित्येक कटू अध्याय लिहून गेले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *