जगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

कोणत्याही देशाची सुरक्षा अबाधित राखण्याचं महत्त्वाचं  काम पार पाडतात त्या त्या देशातील इंटलेजीन्स एजन्सी अर्थात गुप्तहेर संस्था!

जगातील सर्वच बलाढ्य देशांच्या स्वतः च्या अश्या एकाहून एक सरस गुप्तहेर संस्था आहेत, परंतु या सर्वात वरचढ गुप्तहेर संस्थांपैकी एक म्हणजे मोसाद!

इज्राईल  देशाच्या अधिपत्याखाली  येणारी ही संस्था जगातील सर्वात क्रूर आणि धाडसी संस्था म्हणून ओळखली जाते. क्रूर यासाठी की या संस्थेतील गुप्तहेर दहशतवादी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जातात.  मोसादचा अर्थ आहे मृत्यू !

एखादा गुहेगार यांच्या तावडीत सापडला की त्याचा मृत्यू हा अटळ समजला जातो. जगातील सर्वात खतरनाक अश्या या गुप्तहेर संस्थेला दिलं गेलेलं हे नाव सर्वच अर्थाने योग्य ठरतं.

इज्राईल देशाची ही एजन्सी आपल्या नागरिकांच्या आणि देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला  जाऊ शकते.

तब्बल ६८ वर्षांचा इतिहास लाभलेल्या ‘मोसाद’च्या नावावर अतिशय  अविश्वसनीय घटनांची नोंद आहे. मोसादच्या  गुप्तहेर कथांचे  जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत .

चला तर जाणून घेऊया  ‘मोसाद’बद्दल काही रंजक गोष्टी!

 

mossad-marathipizza-2

 

स्रोत

 • मोसादचं हेडक्वार्टर इज्राईलच्या तेल अविव  शहारामध्ये आहे. मोसाद ची स्थापना १३ डिसेंबर १९४९ रोजी सेंट्रल इन्स्टिट्यूशन फॉर को-ऑर्डिनेशन   या नावाखाली करण्यात आली होती नंतर हे नाव बदलून इन्स्टिट्यूशन फॉर इंटलेजीन्स अँड  स्पेशल ऑपरेशन्स  इज्राईल हे नाव ठेवण्यात आले आणि या संस्थेला इज्राईलच्या राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेचा दर्जा देण्यात आला.

 

 • इज्राइलचे पंतप्रधान डेव्हिड बैन  गुरेना यांच्या कारकिर्दीत मोसाद च्या स्थापनेचा प्रस्ताव  ठेवण्यात आला होता. त्यांनाच पुढे मोसाद चे डायरेक्टर पद  देण्यात आले.

 

mossad-marathipizza

स्रोत

 • मोसादचा मुख्य उद्देश आहे दहशतवादाशी लढा देणे, गुप्त माहिती गोळा  करणे, इज्राईलच्या राजकीय व्यक्तींच्या हत्येचा बदला घेणे आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखावी यासाठी नेहमी सतर्क राहणे.

 

 • मोसाद  थेट इज्राईलच्या पंतप्रधानांना  रिपोर्ट करतं.  त्यांच्याचं सल्ल्याने सर्व योजना आखल्या जातात आणि जोवर योजना यशस्वी होत नाही तोवर अतिशय गुप्त ठेवल्या जातात हे विशेष !

 

 • CIA, MI5, MI6 या जगातील इतर प्रसिद्ध गुप्तहेर संस्थांसोबत  मोसाद अगदी जवळून काम करते. मोसादमध्ये असलेल्या बहुतांश गुप्तहेरांची निवड इज्राईल डिफेन्स फोर्स मधून केली जाते.

 

mossad-marathipizza01

स्रोत

 • १९६० मध्ये मोसादने अर्जेंटिना मध्ये लपलेला इज्राईलच्या नागरिकांचा गुन्हेगार एडॉल्फ इचमॅन याला शोधून काढले आणि त्याला इज्राईल  मध्ये आणून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या कामगिरीमुळे मोसाद  जगभरात चर्चेत आलं होतं .

 

 • ‘म्युनिक  हत्याकांड ‘ ही  मोसादच्या दहशतवाद  विरोधी लढाई मधील सर्वात महत्त्वपूर्ण घटना आहे. १९७२ साली जर्मनीच्या म्युनिक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलम्पिक  दरम्यान दहशतवाद्यांनी काही इज्राईल खेळाडूंना ओलीस ठेवले होते.

मोसादच्या गुप्तहेरांनी अतिशय हुशारीने खेळाडूंना सुखरूपणे सोडवले आणि पाचही दहशतवाद्यांचा जीव घेतला. फिलीस्तीनच्या ब्लॅक सेप्टेंबर या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केले होते.

त्यांच्या या भ्याड कृत्याचा बदल घेण्यासाठी मोसादच्या वीरांनी संघटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज़गाच्या काना कोपऱ्यातून शोधून यमसदनी पाठविले आणि ब्लॅक सेप्टेंबर संघटना पूर्णपणे उध्वस्त करून टाकली.

 

mossad-marathipizza03

स्रोत

आपल्या देशावर वाकडी नजर ठेवणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेचा जोवर पूर्णपणे नायनाट होत नाही तोवर त्यांचा पाठलाग न सोडणे यासाठी मोसाद जगभरात प्रसिद्ध आहे.

वाचा मोसाद वीरांच्या शौर्यकथा:

ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग १

ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २

ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी!

 • June 13, 2017 at 7:25 pm
  Permalink

  All the Israel players who were held as hostage during Munich Olympic were killed by Black September terrorists. 5 out of 8 terrorists were killed by German police and 3 were held as prisoners. The 3 terrorists were also released later.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?