' “माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही! – InMarathi

“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

महेंद्रसिंग धोनी. भारताच्या क्रिकेटच्या वाटचालीत सर्वात जास्त आणि लोकप्रिय ठरलेला कर्णधार म्हणून धोनीला प्रत्येकजण ओळखत असेल. कर्णधार पदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर झारखंडच्या या तगड्या खेळाडूने भारताला प्रत्येक फॉर्मात मध्ये सर्वोच्च स्थानावर नेऊन पोहोचवले.

 

MSDhoni-inmarathi
successstory.com

त्याच्या कारकिर्दीत भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक विश्वचषक आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्येही एक विश्वचषक जिंकला आहे. या व्यतिरिक्त अनेक विक्रम धोनीच्या नावावर आहेत.

२००७ मध्ये 20 षटकाचा क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये पन्नास षटकाचा क्रिकेट विश्वचषक, २०१३ मध्ये चम्पिओन्स ट्रॉफी जिंकणारा, म्हणजे आय सी सी च्या सर्व तूर्नामेंत जिंकणारा तो जगातला पहिला कर्णधार आहे. भारतात तर त्याच्या चाहत्यांची कमी नाही.

 

ms-dhoni-batting-inmarathi
s.ndtvimg.com

या लेखात आपण जाणून घेणार आहोत माहीच्या नावावर नोंद होऊ घातलेल्या आशा एका विक्रमाबद्दल, जो इतर कुठल्या फलंदाजाने बनवला नाही आणि यापुढेही बनवेल याची खात्री नाही. हा विक्रम आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सर्वात जास्त वेळा नॉट आउट राहण्याचा! १०० वेळा नाबाद राहणारा धोनी हा पहिला फलंदाज होऊ शकतो.

खालचा चार्ट पहा, यात जास्तीत जास्त वेळा नाबाद राहणाऱ्या खेळाडूंची नावे आणि आकडेवारी दिली आहे. यात आपला धोनी ३०० सामन्यात तब्बल ७३ वेळा नाबाद राहून सर्वोच्च स्थानावर आहे. ३०० सामने खेळून झाल्यावर तो ७३ वेळा नाबाद राहिला होता.

 

records-inmarathi
qph.ec.quoracdn.net

आता हा आणखी एक चार्ट पहा- ही आकडेवारी आहे दोनीने त्याच्या करिअरमध्ये ३१७ सामने खेळले तेव्हाची. एवढे सामने खेळल्यानंतर आता त्याच्या खात्यावर ७८ नॉट आउट्स आहेत. म्हणजे नंतरचे ५ नॉट आउट्स त्याने फक्त १७ सामन्यात नोंदवले आहेत.

 

record-chart-inmarathi
qph.ec.quoracdn.net

नेहमी सातव्या किंवा सहाव्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी येत असल्याने हे शक्य झाले आहे. या क्रमांकावर खेळताना कित्येक सामने धोनीने एकट्याच्या बळावर जिंकले आहेत.

या आकडेवारी कडे पाहता, धोनी अजून साधारण ९० ते १०० सामने खेळू शकला तर त्याचा १०० वेळा नाबाद राहण्याचा विक्रम होऊ शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?