ह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. भारतात अनेक निरनिराळ्या संस्कृती, समाज, धर्म, पंथ, लोक बघायला मिळतात. आपल्या देशात अनेक अश्या गोष्टी बघायला मिळतात ज्या विचित्र पण तेवढ्याच अनोख्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय रेल्वे. आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक आहे.

 

http://indianexpress.com
indianexpress.com

भारतात रेल्वेने जवळपास २.२५ कोटी लोक यात्रा करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढी आहे. म्हणजे आपल्या कडे रोज एक पूर्ण देशाएवढी लोकसंख्या रेल्वेने प्रवास करत असते. त्यामुळे एवढ्या मोठ्या जनसंख्येला व्यवस्थितरित्या सांभाळणे हे खूप कठीण काम असतं. पण आपलं रेल्वे मंत्रालय हा सर्व कारभार अगदी चोख पार पाडत असतं.

 

भारतातील अश्याच एका अनोख्या रेल्वे स्टेशनची माहिती उर्जामंत्री पियुष गोयल ह्यांनी सोशल मिडीयावर शेअर केली.

ह्या रेल्वे स्टेशनची विशेषता म्हणजे हे रेल्वे स्टेशन दोन राज्यांच्या मधोमध आहे. ह्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग हा गुजरात राज्यात तर अर्धा भाग हा महाराष्ट्रात आहे.

‘नवापूर’ नावाचे हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. ह्या स्टेशनवर एकूण चार भाषांत अनाउंसमेंट होते. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती ह्या भाषांचा समावेश आहे.

 


ह्या स्टेशनवर जेव्हा महाराष्ट्र कडून ट्रेन येते तेव्हा त्या ट्रेनच इंजिन गुजरातकडे असते आणि जर ट्रेन गुजरातकडून येत असेलं तर त्या ट्रेनच इंजिन हे महाराष्ट्राच्या दिशेने असते. ह्या स्टेशनवर दोन्ही राज्यातील प्रवासी यात्रेसाठी येत असतात. ह्यावेळी ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात निघून जातात हे त्यांना कळतही नाही.

 

अश्याप्रकारचे हे काही एकच स्टेशन नाही तर, भवानी मंडी नावाचं आणखी एक स्टेशन आहे जे राजस्थान आणि मध्यप्रदेश ह्या राज्यांच्या मधोमध स्थित आहे. हे स्टेशन देखील ह्या दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे, जिथून ह्या दोन्ही राज्यांतील प्रवासी यात्रा करत असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?