एकेकाळी क्रिकेट विश्वचषक गाजवणारा ‘तो’ आज पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या देशाची जर्सी घालून देशासाठी विश्वचषक खेळणं हे तर प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. आणि ज्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतं ते खरंच नशीबवान असतात.

आज तर क्रिकेट हा केवळ एक खेळ राहिला नसून एक करिअर ऑब्जेक्टिव्ह बनला आहे. एकदा का भारतीय क्रिकेट टीम मध्ये सामील झालं तर तुमचं करिअरच बनून जातं.

पण आज आपण एका अश्या खेळाडू विषयी जाणून घेणार आहोत ज्याने केवळ भारताकडून विश्वकप खेळला नाही तर त्या टूर्नामेंटचा तो हिरो देखील ठरला. पण आज तोच खेळाडू हलाखीचे जीवन जगत आहे.

 

bhalaji-damor-inmarathi
nation.lk

एकीकडे जिथे महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली सारखे मोठे खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये येतात. तिथेच एक असा खेळाडू देखील आहे जो अतिशय गरिबीत आपले जीवन जगत आहे.


आपल्या उपजीविकेसाठी म्हशी चारत फिरतो आहे.

आम्ही एका अश्या क्रिकेटर बद्दल बोलत आहोत ज्याने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतले. तसेच त्यांनी अनेक रेकॉर्ड्स देखील आपल्या नावे केले.

ह्या खेळाडूच्या शानदार खेळाला बघून त्याच्या सोबतच्या खेळाडूंनी त्याला सचिन तेंडूलकर ह्या नावाने हाक मारण्यास सुरवात केली. हा खेळाडू म्हणजे भालाजी डामोर.

 

bhalaji-damor-inmarathi01

 

भालाजी डामोर हे एक असे खेळाडू होते. ज्यांनी १९९८ सालच्या वर्ल्डकपमध्ये एका ऑलराउंडर खेळाडूच्या रुपात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ह्याच खेळाडूच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने सेमी फायनल पर्यंतची मजल गाठली होती.

१९९८ च्या ब्लॅइंड क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भालाजी हे एक हिरो म्हणून समोर आले होते. ऑलराउंडर भालजी ह्यांच्या नावे नेत्रहीन क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट म्हण्जेच १५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.

 

bhalaji-damor-inmarathi02
timesofindia.indiatimes.com

गुजरातच्या एका साधारण शेतकरी कुटुंबातील नेत्रहीन ३८ वर्षीय भालजी ह्यांना वाटायचं की वर्ल्डकप नंतर त्यांच्या जीवन थोडं सुधारेल. पण तेवढं त्याचं नशीब कुठे.

१९९८ च्या वर्ल्डकपला आज १८ वर्ष उलटली पण देशाचे नावं क्रिकेट विश्वात गाजवणारे भालाजी आजही त्यात परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत. आजही त्यांना पोटाची खळगी भागविण्यासाठी म्हशी चारत फिरावे लागत आहे.

 

bhalaji-damor-inmarathi03
india.com

तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती के नारायण यांनी देखील त्यांच्या उत्कृष्ट खेळाची प्रशंसा केली होती. आणि आज त्याचं खेळाडूला एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. एवढचं नाही तर त्यांच्या पत्नी अनु ह्या देखील शेतात काम करून त्यांची मदत करतात.

आपल्या ह्या अवस्थेवर भालाजी म्हणतात की,

“गुजरात सरकारने त्यांची प्रशंसा तर केली पण त्यांना एक चांगली नोकरी देऊ शकले नाही.”

आज जिथे आपल्या देशात क्रिकेटला आणि क्रिकेटर्सला देखील अक्षरशः डोक्यावर घेतात. आणि त्याच्या जोरावर ते करोडो कमावतात एवढचं नाही तर त्यांना चंगल्या पदाची नोकरी देखील दिली जाते.

त्याच देशात एकेकाळचा उत्कृष्ट खेळाडू आज एक सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “एकेकाळी क्रिकेट विश्वचषक गाजवणारा ‘तो’ आज पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय

  • March 3, 2018 at 7:33 am
    Permalink

    In marathi.com is an Organization.Why don’t you approach Narendra Modi thr MYGOVT.IN ?

    Reply
  • March 3, 2018 at 7:35 am
    Permalink

    WHY DON’T YOU WRITE TO PM NARENDRA MODI THR’ MYGOVT.IN ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *