बहुतेक पुरुषांच्या “त्या” समस्यांमागे फक्त ही एकच गोष्ट कारणीभूत ठरत असते…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम   

=== 


असं म्हणतात की एका पुरुषासाठी, प्रत्येक कृतीमागची प्रेरणा “सेक्स” हीच असते. मादीला इम्प्रेस करून, तिला आपल्याकडे आकर्षित करून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याद्वारे वंश चालवणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे.

ह्या प्रेरणेतून घडून येणारी साहजिक कृती म्हणजे मैथुन. सेक्स.

परंतु माणसाच्या प्रगतीमुळे ह्या नैसर्गिक प्रेरणेच्या सहज पूर्ण होण्यात अनंत अडचणी निर्माण होत असतात. आज आपण अश्याच एका मोठ्या अडचणीबद्दल बोलणार आहोत.

ही अडचण आहे – पैसा…!

 

money destroys sex-inmarathi
septin911.net

पैसा ही गोष्ट जीवनात खूप महत्त्वाची जरी असली तरी पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. पैश्याचा नादात अनेक लोक आयुष्यातला खरा रंग विसरतात. जगण्यातला आनंद विसरतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की पैश्याचा अवाजवी चिंतेचा परिणाम वैवाहिक जीवनावर आणि प्रेम संबंधावर होत आहे.

एका सर्वेनुसार दहा पैकी चार लोकांनी त्यांचा नात्यावर पैश्याचा समस्येचा परिणाम होत आहे. पाच पैकी एका व्यक्तीचं म्हणणं आहे की त्यांचं त्यांचा जोडीदारासोबत महिन्यातुन एकदा तरी आर्थिक बाबीवरून भांडण होतं.

पैश्याचा चिंतेने फक्त जोडप्यांना त्रस्त केलं नसून यातून त्यांची भांडणं होण्याचं प्रमाण पण वाढलं आहे. ज्याचा परिणाम त्यांचा लैंगिक आयुष्यावर झाला आहे.

मग ती चिंता वैयक्तिक असो वा दोघांची परिणाम दोघांवर होत असतो.

 

indian-couple-marathipizza00

 

तणावामुळे लोक मुक्त व्यवहार करू शकत नाही त्यामुळे त्यांना प्रणय करताना आनंद मिळवणे कठीण होऊन बसते.


लोक त्यांचा आयुष्यातील आर्थिक चिंतेने ग्रस्त असतात. त्यांना त्यामुळे समोर काय घडतं आहे याचं देखील भान उरत नाही. मग ती गोष्ट प्रणय का असेना. माणूस निरुत्साहीच राहतो..

याबरोबरच जेव्हा ऑफीस मध्ये वेळेपेक्षा जास्त काम करून आर्थिक तडजोड करू लागतो तेव्हा यामुळे थकवा जाणवत असतो. मन उदास होते. कारण सर्व ऊर्जा हि चिंता, आखणी आणि अतिकाम यातच जाते. यामुळे प्रणय करण्यासाठीची उर्जाच उरत नाही.

पैश्याचा समस्येमुळे निर्माण होणाऱ्या तणावामुळे स्वतःतील इच्छाशक्ती देखील हार मानते. आयुष्यातला आनंद हरवतो. नात्यात दुरावा येतो. हे सर्व टाळण्यासाठी अनेक जोडपी स्वतःच्या आर्थिक समस्या स्वतःच्या मनातच दाबून ठेवतात.

आर्थिक बाबीवर एकमेकांशी खूप कमी व गरजेपुरता बोलतात व स्वतःच्या समस्या स्वतः मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. पण यातून आजून तणाव येतो.

ह्या गोष्टी एखाद्या नात्यासाठी कर्करोगासारख्या असतात.

कधी कधी लोक अति-आक्रमक होतात. कधी कधी ते प्रणयादरम्यान निरुत्साही होऊन आपल्या पार्टनरवर अत्याचार करण्याजोगे वागतात.

यातून ते तणाव हलका करण्याचा प्रयत्न करत असतात पण यामुळे नात्यात अजून तणाव निर्माण होतो.

 

couple-fight_inmarathi
antekante.com

जेव्हा व्यक्ती तणावातून जात असतो आणि प्रत्येक गोष्टीला आक्रमक होत असतो अथवा आक्रमक प्रतिकार दाखवत असतो तेव्हा त्या व्यक्तीचा तणाव आजून वाढतो ज्यामुळे विषारी हार्मोन्स जसे कॉर्टिसोल आणि एपीफ्रीन उत्सर्जित होतात. ज्यामुळे प्रणयासाठी आवश्यक सेक्स हार्मोन्सचे उत्सर्जन थांबते.

यामुळे शारीरिक व लैंगिक आरोग्यवर आणि आयुष्यावर गंभीर परिणाम होतो.

उपाय काय आहे?

तुमच्या आर्थिक चिंतेवर समाधान शोधणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या आर्थिक चिंतेला आणि नात्याला बरोबर सांभाळलं तर तुम्हाला शरीर सुख मिळवणं सोपं आहे. त्यासाठी काय करावं ते आपण जाणून घेऊयात..

१ ) झोप घ्या :

 

sleep-main-inmarathi.jpg
indianexpress.com

सतत चिंता केल्याने कुठल्याच समस्येचं समाधान भेटणार नाही. त्यापेक्षा विचार बाजूला ठेवून शांत झोप घ्या. यामुळे तुमच्या शरीरात उत्सर्जित होणारे स्ट्रेस हार्मोन्स उत्सर्जित होणार नाहीत व तुम्ही तणाव मुक्त होऊन तुमच्या समस्येवर उपाय शोधु शकाल.

२) एखादी मोकळी वाट शोधा :

 

money-destroys-sex-inmarathi01.jpg
masterfile.com

तुमच्या समस्यांना गोंजारत बसण्यापेक्षा व स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा आपलं मन आपल्या आवडत्या छंदात गुंतवा. घराबाहेर जास्त वेळ घालवा. फिरा, ट्रेकिंग करा, पोहायला जा, ते सर्व काही करा जे तुम्हाला तणाव मुक्त करेल.

३ ) सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष द्या :

 

money destroys sex-inmarathi02
mensxp.com

जेव्हा तुमचं शरीर साथ देत नाही तेव्हा तणाव सांभाळणं कठीण होऊन जातं. स्वतःत लहान सहान बदल घडवा. चांगल्या अन्नाचं सेवन करा, रोज व्यायाम करा.

जेवढा जास्त व्यायाम कराल तेवढे तुमचे स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतील आणि लैंगिक आयुष्य वधारेल.


४ ) मनातली गोष्ट बोलुन टाका :

 

money destroys sex-inmarathi03
nelive.in

तुमची आर्थिक व मानसिक स्थिती सुधारू शकतात फक्त गरज आहे मनातील भावनेला मोकळी वाट करून देण्याची, त्यासाठी एखाद्या जाणकार व्यक्तीशी आपल्या समस्येबाबत चर्चा करा. वडीलधाऱ्यांशी बोला.

तुमच्या जीवनातील अडचणीबद्दल तुमच्या जोडीदाराला सर्व काही सांगून टाका. आर्थिक स्थिती बद्दल घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीशी, मित्राशी अथवा आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा. चर्चेतूनच समस्या सुटतात.

५ ) प्रणय करा, समस्या विसरा :

 

sex-inmarathi
onlymyhealth.com

तुमच्या आयुष्यातील लौंगिक तणावावर उपाय एकच आहे, लैंगिक साधनेत वाढ करणे. जेवढा जास्त तुम्ही प्रणय कराल तेवढे जास्त तुम्ही सुखी व्हाल, आयुष्यातील तणाव आणि समस्यांना विसराल. एकदम मुक्तपणे स्ट्रेस फ्री होऊन आयुष्य जगू शकाल.

तणाव आणि पर्सनल आयुष्य जर वेगवेगळं ठेवण्यात जो व्यक्ती सफल होतो तो व्यक्तीच खरा सिकंदर म्हटला पाहिजे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?