अस्सल मच्छी खवय्यांसाठी ही जागा म्हणजे स्वर्ग आहे, कारण येथे पडतो माशांचा पाऊस!!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


पाऊस म्हणजे काय? तर आकाशातून पाणी पडणे! बाष्पीभवन प्रक्रिया तर सर्वांनाच माहित आहे, तर त्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून पाऊस पडतो हे देखील आपण शाळेत शिकलो. पण तुम्हाला आम्ही म्हटलं की जगात अशी काही ठिकाण आहेत जेथे वेगळ्याच प्रकारचा पाऊस पडतो तर????

तुमचा थेट विश्वास बसणार नाही म्हणा, पण इंटरनेटवर तुम्ही सर्च केलंत तर तुम्हाला या आगळ्या वेगळ्या पावसांबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी नजरेस पडतील. आपल्या भारताच उदाहरण घ्या ना, केरळ मध्ये काही वर्षांपूर्वी रक्ताचा पाऊस पडला होता. ही घटना म्हणजे देवाची अवकृपा आहे असा जावईशोध देखील अनेकांनी लावला, पण त्यामागे शास्त्रीय कारण असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

red-rain-marathipizza
aayushholidays.com

अशीच एक घटना घडली होती महाराष्ट्रातील डोंबिवली मध्ये! डोंबिवली मध्ये अगदी काहीच महिन्यांपूर्वी अॅसिडचा पाऊस पडला होता. या घटनेला देखील चमत्काराचे रूप देण्यात आलं होतं. पण हा पाऊस हवामानातील बदलामुळे आणि केमिकल रीअॅक्शनमुळे निर्माण झाल्याचे नंतर उघडकीस आले.


पण तुम्हाला माहित आहे का? एकून एका वेगळ्या प्रकारचा पाऊस पडतो होंडूरास नावाच्या देशामध्ये. हा पाऊस असतो माश्यांचा. काय? दचकलात न ऐकून? चला तर जाणून घेऊया काय आहे हे नेमकं प्रकरण!

मॅक्सिकोपासून जवळच असलेल्या होंडूरास नावाच्या देशात तब्बल शंभर वर्षांपासून चक्क माशांचा पाऊस होतो. म्हणजे आपल्याकडे कसा ठराविक हंगामात पाण्याचा पाऊस पडतो, तसा इथे ठराविक वेळी माशांचा पाऊस पडतो. येथे आकाशातून धो धो मासे कोसळायला लागतात. या पावसामुळे रस्त्यावर माशांचा ढिग लागलेला असतो. हा माशांचा ढीग इतका प्रचंड असतो की येथील वाहतूक विस्कळीत होते.

fish-rain-marathipizza01
nairaland.com

फक्त याचं देशात नाही तर आपल्या भारतामध्ये देखील अश्याच प्रकारचा पाऊस पाडून गेलाय. २० जून २०१५ रोजी आंध्र प्रदेशच्या गोलामुड्डी येथे माशांचा पाऊस पडला होता

तसेच आपला शेजारील देश श्रीलंकेतही माशांचा पाऊस झालेला आहे. ज्यांनी या पावसाचा अनुभव घेतलाय त्यांचा मते हा अनुभव शब्दांत वर्णन करण्यासारखा नसतो. या पावसालाही अनेकांनी चमत्काराचे रूप देऊ केले. पण तज्ञांच्या मते त्या मागे ही वैज्ञानिक करणे आहेत. कारण जेथे जेथे असा माश्यांचा पाऊस होतो तेथे आजूबाजूला समुद्र आहे. त्यावरून असा निष्कर्ष काढला गेला की

समुद्रामध्ये जेव्हा जोराचे वारे वाहू लागतात, तेव्हा समुद्रात मोठमोठे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यामुळे समुद्रातील लहान लहान मासे बाहेर दूरवर फेकले जातात आणि हे मासे समुद्र किनाऱ्याजवळील शहरांमध्ये जाऊन पडतात आणि पाहणारा असा समज करून घेतो की आकाशातून माशांचा पाऊस पडतो आहे.

fish-rain-marathipizza02
fish.mlbcardvalue.com/

काहीही असो अस्सल मच्छी खवय्यांसाठी अश्या जागा म्हणजे स्वर्गच म्हणाव्या लागतील!!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?