' या अविश्वसनीय गोष्टी शेअर मार्केटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलतील! – InMarathi

या अविश्वसनीय गोष्टी शेअर मार्केटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलतील!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शेअर बाजार म्हणजेच शेअर मार्केटबद्दल आजही सामान्य माणसाला बरेच कुतूहल आहे. पैश्याच्या बाबतीत अतिशय जागृत असणारा सामान्य माणूस आजही शेअर मार्केट म्हणजे जुगार समजतो, येथे पैसा लावला म्हणजे बुडालाच समजा अशी त्याने समजूत करून घेतली आहे. त्यामुळे शेअर मार्केट जगताबद्दल आजही मध्यमवर्गीय, सामान्य वर्ग अनिभिज्ञ आहे. आज आम्ही तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अश्या काही अविश्वसनीय गोष्टी सांगणार आहोत, ज्या ऐकून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हालच, पण सोबतच काही गोष्टी वाचून तुम्हाला शेअर मार्केटची पावर देखील समजेल.

 

share-market-marathipizza03
hangthebankers.com

१) भारतीय शेअर बाजारातील किंग म्हणावे अश्या राकेश झुनझुनवाला यांच्याविषयी प्रत्येक शेअर मार्केट चाहत्याला माहित असेलच. राकेश झुनझुनवाला म्हणजे भारताचे वारेन बफेटच समजा. एकदा राकेशच्या आईने त्यांना म्हटले की,

तू आपले सर्व रुपये शेअर मध्ये का गुंतवतोस कुठल्यातरी मालमत्तेत गुंतवणूक करून पहा की?

राकेश हे ऐकून हसलाले. काही दिवसानंतर आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी राकेश यांनी मुंबईच्या उच्चभ्रू मलबार हिल्स परिसरात एक फ्लॅट खरेदी केला. सन २००४ मध्ये या फ्लॅटची किंमत २७ कोटी होती. राकेश यांनी हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी Crisil चे २७ कोटी किंमतीचे शेअर विकले होते. काही वर्षानंतर २०१५ मध्ये राकेश यांनी तो फ्लॅट ४८ कोटींना विकला. म्हणजे त्यांना एकूण २१ कोटी रुपयांचा फायदा झाला.

परंतु, हे समजल्यानंतर तुम्ही हैराण होऊन जाल की, जर २००४ मध्ये राकेश यांनी २७ कोटींचे Crisil चे शेअर विकले नसते तर आज त्यांची किंमत ७०० कोटी असती आणि त्याच्या बरोबर अजून ५० कोटी डिविडेंड वेगळा मिळाला असता.  या उदाहरणावरून तुम्ही शेअर मार्केटच्या रिटर्न्स पावरचा अंदाज लावू शकता.

 

rakesh-jhunjhunwala-marathipizza01
(राकेश झुनझुनवाला) rediff.com

२) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये जवळपास ५६८९ कंपन्या लिस्टेड आहेत,जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. भारतात सर्वात पहिला गुंतवणूक केलेला शेअर Dutch East India Company चा होता.सन १८७५ मध्ये स्थापन झालेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशियाचे सर्वात पहिले स्टॉक एक्सचेंज आहे.

 

३) रॉयल इनफिल्ड बुलेट आयशर मोटर्सची बाईक आहे. तुम्ही सन २००२ मध्ये १,७५,००० रुपये खर्च करून जर एक रॉयल इनफिल्ड बुलेट खरेदी केली असती तर आज १६ वर्षांनी ती एक जुनी, भंगार बाई झाली असती. परंतु, जर तुम्ही तेच १,७५,००० रुपयांचे रॉयल आयशर मोटर्सचे शेअर खरेदी केले असते, तर आज त्याची किंमत २१ कोटी ६५ लाख रुपये असती.

 

४) १२० कोटी जनसंख्या असलेल्या भारतामध्ये फक्त २ कोटी डीमेट खाती आहेत, त्यामधील जास्त तर चालू  देखील नाहीत आहेत. भारतात घरांमध्ये केल्या जाणाऱ्या बचतीच्या फक्त २% च पैसे शेअर बाजारात गुंतवले जातात. यावरून आपल्याला अंदाज येईल की आपण भारतीय पैश्याचा धोका पत्करायला किती घाबरतो ते.

 

share-market-marathipizza01
yourarticlelibrary.com

 

५) सन २०१५ मध्ये भारतामध्ये जेव्हा मॅगी बॅन करण्यात आली तेव्हा १५ वर्षात पहिल्यांदा नेस्लेला तीनपट तोटा झाला.

 

६) भारताचे वारेन बफेट राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये ५००० रुपयांपासून गुंतवणूक सुरु केली. आजच्या तारखेला राकेश झुनझुनवाला यांच्याकडे ८००० कोटींचे शेअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी राकेश यांनी Titanचे ६ कोटीचे शेअर ३ रुपये दराने खरेदी केले होते. आज Titanच्या एका शेअरची किंमत ४७१ रुपये आहे.

 

७) रोनाल्ड वेनची गोष्ट तर गुंतवणूकीच्या जगातील सर्वात प्रसिद्ध गोष्ट आहे. रोनाल्ड वेन, स्टीव जॉब्स आणि स्टीव वोजनिएक यांनी एकत्र येऊन अॅपल कॉम्पुटर्सची स्थापना केली होती. रोनाल्ड वेन यांनी सन १९७६ मध्ये आपल्या हिश्यातील एकूण १०% शेअर ८०० डॉलर मध्ये विकले आणि ते कंपनीमधून वेगळे झाले. जर रोनाल्ड वेन यांनी आपले शेअर विकले नसते तर आज त्या १०% शेअरची किंमत ३५ बिलियन डॉलर (जवळपास २.७ लाख कोटी रुपये) असती.

 

Ronald-Wayne-Apple-co-founder-marathipizza
all-funny.info

८) जगात बिलियन डॉलर किंमतीच्या कितीतरी कंपन्या आहेत, परंतु, आतापर्यंत ट्रिलियन डॉलर किंमतीची एकही कंपनी नाही आहे. अशी आशा आहे की लवकरच कोणतीतरी एक कंपनी १ ट्रिलियन डॉलर किंमतीची होऊ शकते. पहिल्या १ ट्रिलियन डॉलर किंमतीच्या शर्यतीत ४ कंपन्या आहेत – अॅपल,फेसबुक,गुगल आणि अॅमेझोन!

 

९) जगात सर्वात महागडा शेअर वारेन बफेटची कंपनी Berkshire Hathaway चा आहे. Berkshire Hathaway च्या एका शेअरची किंमत २,४५,३३० डॉलर (१ कोटी ६० लाख रुपये) आहे. एवढ्या मोठ्या किंमतीचे कारण हे आहे की, Berkshire Hathaway कंपनी आपल्या शेअरला डिव्हाईड करते आणि कोणताच डिविडेंड देत नाही.

 

१०) ४ जानेवारी २००१ मध्ये एका दिवसात सर्वात जास्त शेअरची खरेदी विक्री होण्याचा रेकॉर्ड बनला. त्या दिवशी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये २,१२९,४४५,६३७ शेअरची खरेदी-विक्री झाली. एका दिवसात सर्वात कमी शेअरचा व्यवसाय १६ मार्च १८३० ला झाला होता, त्या दिवशी फक्त ३१ शेअरची खरेदी-विक्री झाली होती.

 

share-market-marathipizza02
cbsnews.com

असं आहे हे शेअर मार्केटचं फसवं दिसणारं, पण नीट विचारपूर्वक खेळणाऱ्यासाठी पैसा कमावण्याचा सर्वोत्तम मग असणारं जग!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?