उदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“उदाहरणार्थ नेमाडे” हा चित्रपट हा २७ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. बहुतांश लोकांना माहिती देखील नसेल, अनेक जण प्रथमच या चित्रपटाचं नाव ऐकत असतील – कारण या चित्रपटाच प्रमोशन फार मोठ्या पातळीवर करण्यात आलं नव्हतं.

असो, आपण जाणून घेऊ नेमका काय आहे  ‘उदाहरणार्थ नेमाडे’

pg1---akshay-indekar1_145

नेमाडेंच्या मराठी साहित्य सृष्टीतलं आजवरच्या योगदानाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. त्यांचे समर्थक आणि चाहते स्वत:ला ‘नेमाडपंथी’ म्हणवतात ते काही उगीच नाही. त्यांच्या कोसला, चांगदेव चतुष्ठय हा त्यांचा चार कादंबऱ्यांचा संग्रह, हिंदू, देखणी, मेलडी या साहित्यकृती आजही वाचकाच्या मनावर गारुड करतात.

‘उदाहरणार्थ नेमाडे’ या चित्रपटामधून नेमाडेंच्या व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्यात आला आहे. अक्षय इंडीकर या २५ वर्षीय तरुण दिग्दर्शकाची ही संकल्पना.

5213420997713757167_Org

‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा डॉक्यू फिक्शन प्रकारात मोडणारा चित्रपट होता.

डॉक्यू फिक्शन म्हणजे प्रत्यक्ष वास्तव माहिती व काल्पनिकता या दोन्हींचा वापर करत बनलेला सिनेमा. यामध्ये माहितीपटाचे फुटेज व फिक्शन यांची सरमिसळ करत विषय उलगडला जातो.

डॉक्यू फिक्शन स्वरूपाच्या या चित्रपटामध्ये नेमाडेंची भाषणे, मुलाखती, त्यांच्या सोबतच्या गप्पा यांशिवाय त्यांच्या सहा कादंबऱ्यांमधील प्रसंग दिग्दर्शकाने उभे केले आहेत. त्यामुळे चित्रपटातून समग्र भालचंद्र नेमाडे पाहायला मिळतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व आणि साहित्य या दोन्हींचा उलगडा होतो. चित्रपटाचा अर्ध्याहून अधिक भाग हा नेमाडेंच्या कोसला पासून हिंदूपर्यंतच्या कादंबऱ्यांनी व्यापलेला आहे याशिवाय देखणी मधील कविताही यात आहेत.

 

maxresdefault

 

हा चित्रपट करताना संपूर्ण टीम नेमाडें सोबत चाळीस दिवस राहिली. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नेमाडे सरांनी तीन दिवस देण्याचे कबूल केले होते, परंतु नंतर त्यांनी सोबत ३० दिवस चित्रीकरण केले. यात एक मुलाखत तब्बल ८ तास सुरु होती. या काळात नेमाडे सरांनी त्यांचे स्वत:चे गावचे घर संपूर्ण टीमला राहायला खुले करून दिले होते.

दिग्दर्शकाने नेमाडेंवर अक्षरश: ३० दिवस कॅमेरा रोखून ठेवला होता!

त्यांनीही कोणतीच हरकत न घेतलं ते त्याला करू दिलं. दिग्दर्शक त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावत असताना देखील त्यांनी एक शब्दानेही त्याला नकार दिला नाही.

 

pg1---akshay-indekar4_145

 

Nemade1 marathipizza

 

तर असा हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट संधी मिळाल्यास नक्की पहा.

तोवर उत्सुकता लागली असेल तर चित्रपटाची झलक अर्थात ट्रेलर पाहून समाधान मानून घ्या…!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 55 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?