लैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजेच एखाद्याकडे लैंगिक दृष्ट्या आकर्षित होणे.

एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे, तिच्या प्रेमात पडणे म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशन. पण आपल्याला असं वाटत असतं की, ह्यामध्ये केवळ पण दोनच प्रकार असतात.

तर असं नसून ह्यात एकूण १० प्रकार असतात. होमोसेक्शुअल आणि बायसेक्शुअल ह्याव्यतिरिक्त देखील आणखी काही प्रकार आहेत..

१. हेट्रोसेक्शुअल :


 

Love-Surprise-for-his-girlfriend-inmarathi
wallpaperclicker.com

ही सगळ्यात सामान्य अवस्था आहे. ह्यामध्ये एखदी व्यक्ती तिच्या अपोझिट जेन्डरच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. जगभरातील बहुतेक लोक हे हेट्रोसेक्शुअल असतात.

२. होमोसेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi
workouttrends.com

जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याच जेन्डरची व्यक्ती आवडायला लागते, किंवा तिला आपल्याच जेन्डरच्या व्याक्तीबाबत आकर्षण वाटत असेल तर ह्याला होमोसेक्शुअल असे म्हणतात.

जर कुठल्या पुरुषाला पुरुषा विषयी आकर्षण असेल तर त्याला गे म्हणतात, जर एखाद्या स्त्रीला स्त्री विषयी आकर्षण असेल तर त्यांना लेस्बियन असे म्हटल्या जाते.

३. बायसेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi01
abc.net.au

जर कोणाला स्त्री आणि पुरुष ह्या दोघांविषयी आकर्षण वाटत असेल तर ह्याला बायसेक्शुअल असे म्हणतात.

४. असेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi02
shutterstock.com

काही लोकांना स्त्री आणि पुरुष या दोन्हींविषयी आकर्षण नसतं, असे लोक असेक्शुअल प्रकारात मोडतात.

५. डेमिसेक्शुअल :

 

sexual-orientation-inmarathi03.jpg
travel.mapquest.com

काही लोक असे असतात जे भावनिक स्तरावर आकर्षित झाल्यावरच रिलेशनशिपमध्ये येतात. अश्या लोकांना डेमिसेक्शुअल असे म्हणतात.

६. सपो सेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi04
feedyeti.com

दिसणे किंवा नीटनेटके राहणे ह्यावर आकर्षित न होता जर कुणी एखाद्याच्या हुशारीवर, त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडवर आकर्षित होत असेल तर अश्या लोकांना सपो सेक्शुअल म्हणतात.

७. ग्रे सेक्सुअल :

 

sexual orientation-inmarathi05
theromantic.com

ग्रे सेक्शुअल ह्या प्रकारात ते लोक मोडतात ज्यांना संभोग करण्यात फार काही रुची नसते पण ते असेक्शुअल देखील नसतात.

म्हणजे अश्या प्रकारचे लक हे इतर कुठल्याही जेन्डरकडे कमी प्रमाणात पण आकर्षित होतात.

८. एंड्रोजिनसेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi06
aminoapps.com

एंड्रोजिनसेक्शुअल ह्या प्रकारात मोडणारे लोक हे केवळ त्या लोकांकडे आकर्षित होतात ज्यांच्यात स्त्री आणि पुरुष दोघांचीही लक्षणे असतील.

९. एंड्रोसेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi07
quora.com

एंड्रोसेक्शुअल लोक हे केवळ पुरुषी लक्षण असलेल्या व्यक्तींकडे आकर्षित होतात.

अश्या लोकांना पुरुषांची लक्षण असलेले पुरुष आणि स्त्रिया दोन्ही आवडतात.

१०. गायनोसेक्शुअल :

 

sexual orientation-inmarathi08
freeimages.com

काही लोकांना स्त्रियांचे भाव खूप आवडतात, ते लोक स्त्रियांच्या हावभावांकडे आकर्षित होतात. अश्या लोकांना गायनोसेक्शुअल म्हणतात.

अश्या लोकांना स्त्रियांची लक्षण असलेले पुरुष देखील आवडतात.

थोडक्यात – स्त्रीने पुरुषाकडे व पुरुषाने स्त्री कडे वा स्त्री ने स्त्रीकडे व पुरुषाने पुरुषाकडे आकर्षित होणे – इतकीच लैंगिक आकर्षण वाटण्याची मर्यादा नाही…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *